प्रश्नसंच १३० - सामान्य विज्ञान

[प्र.१] अन्नपचन प्रक्रियेचा योग्य क्रम निवडा.
MT Quiz
१] अंतर्ग्रहण – अवशोषण – पचन – सात्मिकरण – बहिःक्षेपण
२] अंतर्ग्रहण – पचन – अवशोषण – बहिःक्षेपण
३] अंतर्ग्रहण – पचन – सात्मिकरण – बहिःक्षेपण
४] अंतर्ग्रहण – सात्मिकरण – अवशोषण – बहिःक्षेपण


२] अंतर्ग्रहण – पचन – अवशोषण – बहिःक्षेपण
----------------
[प्र.२] पर्यावरणातील बदलांनुसार सजीवांच्या संरचनेतील किंवा क्रियेतील अनुरूप बदलास काय म्हणतात?
१] परासरण
२] अनुकूलन
३] प्रकाश संश्लेषण
४] परिसंस्था


२] अनुकूलन
----------------
[प्र.३] विद्युत अपघटनी घटातील कॅथोडजवळ
१] विद्युत अपघटनी पदार्थ इलेक्ट्रॉन स्वीकारतो.
२] विद्युत अपघटनी पदार्थ इलेक्ट्रॉन सोडतो.
३] धातू विरघळतो.
४] २ व ३ दोन्ही बरोबर


१] विद्युत अपघटनी पदार्थ इलेक्ट्रॉन स्वीकारतो.
----------------
[प्र.४] कमी तापमानावर जर एक पदार्थ सावकाश थंड केला व त्याचा विद्युतरोध जर शून्य केला तर त्या पदार्थास काय म्हणतात?
१] संवाहक
२] अर्धवाहक
३] अतिसंवाहक
४] दुर्वाहक


३] अतिसंवाहक
----------------
[प्र.५] संगणकीय दळणवळणात ए.टी.एम. म्हणजे काय?
१] Active Transmission Machine
२] Automatic Teller Machine
३] Asynchronous Transfer Mode
४] Active Test Mode


३] Asynchronous Transfer Mode
----------------
[प्र.६] सामान्यतः अमोनिया वायू औद्योगिक पातळीवर तयार करतात कारण त्याचा उपयोग ...................
१] प्रथिने तयार करण्यासाठी होतो.
२] साबण तयार करण्यासाठी होतो.
३] रासायनिक खते तयार करण्यासाठी होतो.
४] कृत्रिम खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होतो.


३] रासायनिक खते तयार करण्यासाठी होतो.
----------------
[प्र.७] खालीलपैकी कोणाचे उपउत्पादन म्हणून विटामिन ब-१२ चे उत्पादन केले जाऊ शकते?
१] स्ट्रेप्टोमायसीन
२] टेट्रामायसीन
३] ट्रायकोमायसीन
४] नियोमायसीन


१] स्ट्रेप्टोमायसीन
----------------
[प्र.८] जनुक चिकित्सेमध्ये एका सदोष जनुकाचे कार्य व्यवस्थित करण्यासाठी ...............
१] सदोष जनुकाला काढून टाकले जाते.
२] दुसऱ्या योग्य जनुकाला प्रविष्ट केले जाते.
३] सदोष जानुकाला कार्यरत रहाण्यासाठी थांबवले जाते.
४] संपूर्ण सदोष जनुक योग्य जनुकाद्वारे पुनःस्थापित केले जातात.


४] संपूर्ण सदोष जनुक योग्य जनुकाद्वारे पुनःस्थापित केले जातात.
----------------
[प्र.९] आरोग्यक्षेत्रातील ‘Vision-२०२०’ म्हणजे कोणत्या विकाराची मुक्ती व नियंत्रण यासाठी घेतलेला पुढाकार होय? १] अंधत्व
२] क्षयरोग
३] मलेरिया
४] पोलिओ


१] अंधत्व
----------------
[प्र.१०] दुध म्हणजे पोषणतत्वांनी समृध्द असा स्त्रोत, परंतु खालीलपैकी कशाचा तो अत्यल्प स्त्रोत आहे?
१] कॅल्शियम
२] लोह
३] सोडियम
४] प्रथिने


२] लोह
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा