· ४ मार्च : जागतिक औद्योगिक सुरक्षा दिन. |
· आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘फोर्ब्ज’ नियतकालिकाने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. · जगातील ‘टॉप टेन’ श्रीमंत उद्योजकांच्या क्रमवारीमध्ये बिल गेट्स प्रथमस्थानी असून श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. · जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक १. बिल गेट्स (अमेरिका) - ७९.२ अब्ज डॉलर २. कार्लोस स्लिम हेलू (मेक्सिको) - ७७.१ अब्ज डॉलर ३. वॉरन बफे (अमेरिका) - ७२.७ अब्ज डॉलर · भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक १. मुकेश अंबानी - २१ अब्ज डॉलर (जागतिक क्रमवारीत ३९वे) २. दिलीप संघवी - २० अब्ज डॉलर (जागतिक क्रमवारीत ४४वे) ३. अझीम प्रेमजी – १९.१ अब्ज डॉलर (जागतिक क्रमवारीत ४८वे) |
· शहरी भागात राहणाऱ्या गरिबांना माफक दरामध्ये जेवणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ओडिशा राज्य सरकार १ एप्रिलपासून ‘आहार’ योजना सुरू करणार आहे. · या योजनेअन्वये कटक, भुवनेश्वर, संभळपूर, बेहरामपूर आणि राऊरकेला पाच जिल्ह्यांमधील नागरिकांना पाच रुपयांमध्ये डाळ-भात उपलब्ध करून दिला जाईल. · अशा प्रकारची योजना सुरू करणारे ओडिशा हे देशातील चौथे राज्य ठरले आहे. · ओडिशाचे मुख्यमंत्री : नवीन पटनाईक |
· आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. · त्यामुळे नुकतेच प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले अशोक चव्हाण या प्रकरणात आरोपींच्या यादीत असणार आहेत. |
· विराट कोहलीने मंगळवारी एका पत्रकाराला शिवीगाळ केल्याच्याविरुद्ध त्या पत्रकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडे तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाने विराट कोहलीच्या कृत्याचा विरोध केला आहे. |
· अवैध संपत्ती बाळगल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे गटनेते सुभाष जगताप यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. · जगताप आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर ज्ञात संपत्तीपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप असून यासंदर्भात एसीबीकडे आलेल्या तक्रारीनंतर आज हा छापा टाकण्यात आला. |
· भारतात इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक उत्सुक असून त्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे विमानेही सोडण्यात येणार असल्याची माहिती फेसबुकच्या इंटरनेट डॉट ओआरजी प्रकल्पाचे उपाध्यक्ष चॅरिस डॅनियल यांनी दिली. |
· केनियामध्ये जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हस्तीदंतांची तस्करी व चोरटा व्यापार रोखण्याच्या उद्देशार्थ १५ टन हस्तिदंतांची होळी करण्यात आली. · केनियाचे राष्ट्राध्यक्ष : उहुरु केन्याट्टा |
· चीनने आपल्या अर्थसंकल्पात संरक्षणावरील खर्चात २०१४ च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत १० टक्के वाढ केली. गतवर्षीच्या अर्थसंकल्पानुसार अमेरिकेनंतर सुरक्षेवर सर्वाधिक खर्च करणारा चीन हा दुसरा देश ठरला होता. |
· आघाडीचे सर्चइंजिन गुगल दूरसंचार क्षेत्रात येण्यास उत्सुक असून त्यासंबंधी दूरसंचार कंपन्यांशी चर्चा करण्यात येत असल्याची माहिती गुगलने उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे. |
· दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेशसिंह याची तिहार तुरुंगात एका ब्रिटिश चित्रपट निर्मात्याने घेतलेल्या मुलाखतीस गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी तुरुंग प्रमुखांकडून तातडीने सविस्तर अहवाल मागविला आहे. |
· राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्ताव एकमताने व सर्वसंमतीने मंजूर करण्याच्या संसदीय परंपरेला राज्यसभेत छेद गेला. · या प्रस्तावाला दुरुस्ती देण्यासाठी झालेल्या मतविभाजनात केंद्र सरकारचा खळबळजनक पराभव झाला. · विरोधी खासदारांच्या स्पष्टीकरणांना उत्तरे देण्याची प्रथा न पाळता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणानंतर निघून गेल्याने संतप्त विरोधकांनी या प्रस्तावावर मतविभाजन मागितले व त्यात १५८ विरुद्ध ५७ अशा मतांनी पराभव होण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. · एप्रिल १९५२मध्ये अस्तित्वात आलेल्या राज्यसभेच्याच नव्हे तर संसदेच्याही जवळपास साडेसहा दशकांच्या इतिहासात राष्ट्रपती अभिभाषणावरील प्रस्ताव एकमताने मंजूर न होता त्याला दुरुस्ती जोडली जाणे, ही अभूतपूर्व व दुर्मिळ घटना मानली जाते. |
· काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह, मध्य प्रदेश विधानसभेचे माजी सभापती श्रीनिवास तिवारी यांच्यासह १७ जणांवर शनिवारी ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला. · १९९३ ते २००३ या काळामध्ये राज्यात विविध पदांच्या केलेल्या अवैध नियुक्तीप्रकरणी हा ‘एफआयआर’ दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. |
· पाकिस्तानी गायक अदनान सामी याने भारतीय नागरिकत्वासाठी पुन्हा एकदा अर्ज सादर केला आहे. त्याने या आधी दोन वर्षांपूर्वी केलेला अर्ज केंद्र सरकारने फेटाळला होता. सामी याच्या नव्या अर्जावर विचारविनिमय सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा