·
१८८२
: ‘मराठी
भाषेचे
शिवाजी’ विष्णूशास्त्री
चिपळूणकर पुण्यतिथी.
|
·
महाराष्ट्रासह
देशभरातील ६२ टोल नाके
बंद
करण्याची
घोषणा केंद्रीय
परिवहन
मंत्री
नितीन गडकरी
यांनी संसदेत
दिली.
·
यामध्ये
विदर्भातील
४
टोलनाक्यांचा
समावेश आहे.
|
·
किदांबी
श्रीकांतने स्विस
ओपन ग्रा. प्रि.
गोल्ड
स्पर्धा
जिंकण्याचा
पराक्रम केला.
·
त्याने
या
स्पर्धेच्या
निर्णायक
लढतीत गतविजेत्या
व्हिक्टर
ऍक्सेलेसन
याला तीन
गेमच्या
लढतीत
हरविले.
·
जागतिक
क्रमवारीत
चौथा असलेल्या
श्रीकांतचे
वर्षातील हे
पहिले विजेतेपद आहे.
·
त्याच्या
कारकीर्दीमधील
हे
त्याचे
दुसरे
विजेतेपद.
त्याने २०१३ मध्ये
थायलंड ओपन
जिंकली होती.
|
·
३१ मार्च २०१५ पूर्वी संचालक
मंडळावर
किमान एकही
महिला
नसलेल्या कंपन्यांविरुद्ध
सेबी आवश्यक
ती कारवाई करणार आहे.
|
·
संचालक
मंडळाच्या
निवडीदरम्यान
केंद्रीय मनुष्यबळ
संसाधन
मंत्रालयाशी
मतभेद निर्माण
झाल्याने
अणुशास्त्रज्ञ
अनिल
काकोडकर
यांनी मुंबईतील
इंडियन
इन्स्टिट्युट
ऑफ टेक्नॉलॉजीच्या
(आयआयटी)
नियामक
मंडळाच्या
अध्यक्षपदाचा
राजीनामा दिला आहे.
|
·
देशातील
वाघांच्या
संख्येत ३०
टक्क्यांची
वाढ झाली
असून वाघांची
संख्या २२२६ वर
पोचल्याची
माहिती
केंद्रीय
पर्यावरणमंत्री
प्रकाश
जावडेकर
यांनी दिली.
|
·
१ एप्रिलपासून रेल्वे
आरक्षण
कालावधी
वाढवण्यात
आला असून ६०
दिवसांऐवजी १२०
दिवस अगोदर
तिकीट
आरक्षित
करता येणार आहे.
यामुळे
दलाली
टाळण्यास
मदत मिळणार
असून प्रत्यक्ष
प्रवाशांना
याचा फायदा
होणार आहे.
|
·
लाहोरमध्ये
रविवारी
झालेल्या
दहशतवादी हल्ल्यानंतर
क्रीडा
क्षेत्रातील
पाकिस्तानच्या
प्रतिमेला
आणखी धक्का
लागला आहे.
·
२०१८ मधील विश्वकरंडक
फुटबॉल
स्पर्धेच्या
पात्रता
फेरीमधील
लाहोर येथे
होणारा
सामना ‘फिफा’ने
तात्पुरता
रद्द केला आहे.
|
·
मुंबईवर
२००८ मध्ये
झालेल्या
हल्ल्यात
लष्करे
तैयबाचा म्होरक्या
झकीउर रहमान
लख्वी याचा
सहभाग
असल्याचा ‘विश्वसनीय
पुरावा’ अमेरिकेने
पाकिस्तानला
दिला आहे.
·
हे
पुरावे
डेविड
हेडलीच्या
चौकशीतून
मिळाले आहेत.
|
·
जमीन
आणि वाळू
माफियांवर
जोरदार
कारवाई केल्याने
नागरिकांच्या
कौतुकास
पात्र
ठरलेले आयएएस
अधिकारी डी.
के. रवी यांचा
मृतदेह
बंगळूर येथे
त्यांच्या
घरी
संशयास्पद
स्थितीत आढळून
आल्याने
खळबळ उडाली
आहे.
·
रवी
यांनी
आत्महत्या
केली
असल्याबाबत
संशय व्यक्त
होत आहे.
|
·
पंजाबमधील
घुमान (जि.
गुरदासपूर)
येथे तीन ते पाच
एप्रिलदरम्यान
होणाऱ्या
नियोजित अखिल
भारतीय
मराठी
साहित्य
संमेलनाचा
संपूर्ण
खर्च
उचलण्याबरोबरच
त्यास ‘स्टेट
फंक्शन’ म्हणून
विशेष दर्जा
देण्यात
येईल व
त्यासाठीच्या
सर्व
सोयीसुविधा
राज्य
सरकारतर्फे
पुरविण्यात
येतील, असे
पंजाबचे
मुख्यमंत्री
प्रकाशसिंग
बादल यांनी
राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे
अध्यक्ष शरद
पवार यांना
एका
पत्राद्वारे
कळविले आहे.
|
·
मायक्रोसॉफ्ट
या लोकप्रिय
ऑपरेटिंग
सिस्टीमने
मायक्रोसॉफ्ट
विंडोजच्या
दहाव्या
व्हर्जनमध्ये
‘हॅलो
विंडोज’ नावाची फेस
रिकगनेशन सुविधा
देण्याची
घोषणा केली.
|
·
फेसबुक
या सोशल
नेटवर्किंग
साइटने
मेसेंजरच्या
सहाय्याने
लवकरच पैसे
पाठविण्याची
सुविधा उपलब्ध
करून
देण्यात येणार
आहे.
·
या
सुविधेद्वारे
क्रेडिट
कार्ड आणि
बॅंक खात्याच्या
सहाय्याने
स्मार्टफोनच्या
माध्यमातून
फेसबुक
फ्रेंडच्या
खात्यात
पैसे पाठविता
येणार आहेत.
|
·
भारतीय
महिलांनी
दुसऱ्या
टप्प्यातील
वर्ल्ड हॉकी
लीगचे
विजेतेपद पटकाविले.
·
मेजर
ध्यानचंद
मैदानावर
रविवारी
झालेल्या
अंतिम लढतीत
भारताने पोलंडचा ३-१
असा पराभव केला.
·
या
विजेतेपदाने
भारताने वर्ल्ड
हॉकी
लीगच्या
उपांत्य
फेरीत
प्रवेश केला.
|
·
देशाची
प्रमुख
सॉफ्टवेयर
कंपनी विप्रो लिमिटेडने
आबिद
अली
नीमचवाला यांची समूह अध्यक्ष
आणि कंपनीचे
मुख्य संचालक
अधिकारी म्हणून
नियुक्ती
केली.
·
याआधी
आबिद टाटा
कंसल्टेंसी सर्विसेस
(टीसीएस) च्या
वैश्विक
बिजनेस
प्रोसेस
सर्विसेस
विभागाचे प्रमुख
होते.
|
·
क्रेडिट
रेटिंग
इनफॉर्मेशन
सर्विसेस
इंडिया
लिमिटेड (क्रिसिल) ने १६
मार्च २०१५
रोजी कंपनीचे
मॅनेजिंग
डायरेक्टर
(एमडी) आणि
मुख्य
कार्यकारी
अधिकारी
(सीईओ) म्हणून
आशु
सुयश यांची
नियुक्ती
केली.
|
·
स्वादुपिंडाच्या
कॅन्सरबाबत
बहुमोल संशोधनासाठी
ऑस्ट्रेलियातील
साऊथ वेल्स
युनिव्हर्सिटीतील
प्राध्यापक मिनोती
आपटे यांना
२०१५
वर्षासाठीच्या
‘न्यू साऊथ
वेल्स वुमन’ या
पुरस्काराने
सन्मानित करण्यात
आले.
·
स्वादुपिंडाचा
कॅन्सर
वेगाने का
पसरतो व त्याची
तीव्रता
अधिक का असते, याविषयी
वैद्यकीय
परिमाणाची
आखणी
केल्याबद्दल
आपटे यांचा
या
पुरस्काराने
गौरव झाला.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा