·
२०
मार्च १९५६ : कवी बा.सी.
मर्ढेकर
स्मृतिदिन.
|
·
राष्ट्रवादी
काँग्रेसचे
ज्येष्ठ
नेते रामराजे
नाईक-निंबाळकर
यांची
विधानपरिषदेच्या
सभापतिपदी
एकमताने
बिनविरोध
निवड करण्यात
आली.
·
त्याआधी
विधान
परिषदेचे
सभापती
शिवाजीराव
देशमुख
यांच्यावरील
अविश्वास
ठराव विधान
परिषदेत
चर्चेअंती
बहुमताने मंजूर
झाला. प्रस्तावाच्या
बाजूने
राष्ट्रवादी
काँग्रेस, भाजपसह इतर
छोटे पक्ष
आणि अपक्ष
अशा ४५ सदस्यांनी
मतदान केले, तर विरोधात
२२ मते पडली.
·
अनुच्छेद
१८३ (ग) आणि
विधान परिषद
नियम ११ अन्वये
अविश्वासाचा
प्रस्ताव
दाखल करण्यात
आला
होता.
·
अविश्वास
प्रस्ताव
मंजूर
होण्यासाठी
किमान ४०
मतांची आवश्यकता
होती.
प्रत्यक्षात
ठरावाच्या
बाजूने ४५
मते पडल्याने
ठराव मंजूर
झाल्याचे
उपसभापती वसंत
डावखरे
यांनी जाहीर
केले.
शिवसेनेच्या
सदस्यांनी
मात्र तटस्थ
राहण्याची
भूमिका
घेतली.
·
आवाजी
मतदानाने ही
प्रक्रिया
पार पडली. सभापतींविरोधात
अशा प्रकारे
अविश्वास
प्रस्ताव
मंजूर
होण्याची ही
इतिहासातील
पहिलीच घटना आहे.
|
·
जागतिक
आरोग्य
संघटनेने
दिलेल्या
मर्यादेपेक्षा
राजधानी दिल्लीमध्ये
अधिक
प्रदूषण असल्याची
माहिती
केंद्रीय
प्रदूषण
नियंत्रण
मंडळाने
दिलेल्या
आकडेवारीवरून
दिसून येत
आहे,
अशी माहिती राज्यसभेत
केंद्रीय
पर्यावरण
मंत्री प्रकाश
जावडेकर
यांनी दिली
आहे.
·
डब्ल्यूएचओने
१९८७ आणि २००० मध्ये
प्रदूषणाची
मर्यादा
तसेच
धोकादायक पातळी
निश्चित
केली होती. २००५ मध्ये
डब्ल्यूएचओने
जगातील
माहिती
अद्ययावत
केली होती.
·
त्यावरून
दिल्लीतील
हवेच्या
गुणवत्तेची
भेट देऊन
माहिती
घेतली होती.
त्यामध्ये दिल्लीच्या
हवेत १२ धोकादायक
प्रदूषणाची
घटके
असल्याचे आढळून
आले होते.
|
·
आपल्या
संगणकात
मायक्रोसॉफ्ट
ऑपरेटिंग सिस्टिम
वापरत
असलेल्या
ग्राहकांना, तसेच पायरेटेड
व्हर्जन
वापरत
असलेल्या
ग्राहकांनाही
मायक्रोसॉफ्ट
विंडोज
टेनचे
अपडेट्स
विनामूल्य
उपलब्ध करून
देणार आहे.
·
मायक्रोसॉफ्टचे
प्रवक्ते
टेरी मायरसन
यांनी
चीनमध्ये झालेल्या
एका
परिषदेमध्ये
याबाबतची
घोषणा केली
आहे.
|
·
राज्यातील
महानगरपालिका
आणि
नगरपालिकांमध्ये
२०११ मध्ये आघाडी
सरकारने
सुरू केलेली बहुसदस्यीय
प्रभाग
पद्धती रद्द करून
पूर्वीप्रमाणेच
“एक
प्रभाग-एक
नगरसेवक” ही पद्धत
सुरू करणारे
विधेयक
भाजप-शिवसेना
युतीने विधानसभेत
मंजूर केले.
·
बहुसदस्यीय
प्रभाग
पद्धतीमुळे
एका प्रभागात
दोन-तीन
नगरसेवक
निवडून येत
होते.
त्यामुळे
विकासकामांवर
परिणाम होत
असल्याचे
निदर्शनास
आल्यामुळे
एक सदस्यीय
प्रभाग पद्धती
सुरू
ठेवण्याचा
निर्णय घेण्यात आला.
|
·
गुगल
या लोकप्रिय
सर्चइंजिनने
आपल्या ‘गुगल
मॅप’ या
सेवेत
भारतातील ३१
जागतिक
वारसा
स्थळांचा
समावेश केला असून
या स्थळांना
जगातून
ऑनलाईन भेट
देता येणार
आहे.
·
भारतीय
पुरातत्व
विभाग, दिल्ली
पर्यटन आणि
वाहतूक
विभाग तसेच
महाराष्ट्र
आणि
कर्नाटकमधील
पुरातत्व
विभागाच्या
सहाय्याने
गुगलने हा
प्रकल्प
राबविला आहे.
·
या
प्रकल्पांतर्गत
भारतातील ३१ जागतिक
वारसा
स्थळांची ३६० अंशातील
छायाचित्रे ‘गुगल
मॅप’ वर ऑनलाईन
पाहता येणार
आहेत.
·
या
स्थळांमध्ये
गेटवे ऑफ
इंडिया, म्हैसूर
पॅलेस, नालंदा
विद्यापीठ, थांजावूर
मंदिर यासह
एकूण ३१
स्थळांचा
समावेश आहे.
|
·
खाणीच्या
लिलावाचे
व्यवहार
अधिक
पारदर्शकपणाने
होण्यासाठी
तयार
करण्यात
आलेले खाण आणि
खनिज (विकास
आणि नियमन)
सुधारणा
विधेयक २०१५ राज्यसभेत
मंजूर करण्यात
आले आहे.
·
लोकसभेत
मान्य
झालेले हे
विधेयक आज
राज्यसभेतही
मंजूर झाले.
यानंतर हे
विधेयक
राष्ट्रपतींच्या
मान्यतेसाठी
पाठविण्यात
येईल.
·
या
विधेयकात
खाण
असलेल्या
परिसराच्या
विकासासाठी खाणीतून
मिळणाऱ्या
महसूलापैकी
निश्चित
टक्केवारी
ठरविण्यात
आली आहे.
·
लिलावासाठी
देण्यात येणाऱ्या
परवान्याचा
कालावधी ५०
वर्षे असेल. तसेच
सर्व खाणी या
लिलाव
पद्धतीनेच
दिल्या
जातील.
|
·
जम्मू-काश्मीरमधील
कथुआ
जिल्ह्यात
दहशतवाद्यांनी
केलेल्या
हल्ल्यात सूरज
सर्जेराव
मोहिते (वय २४)
हे हुतात्मा झाले आहेत.
·
सूरज
हे
सिद्धनाथवाडी
(ता. वाई, जि.
सातारा)
येथील
रहिवासी होते. सीआरपीएफच्या
१२१व्या
बटालियनमधील
ई कंपनीत
कॉन्स्टेबलच्या
हुद्द्यावर ते कार्यरत
होते.
·
दहशतवाद्यांच्या
आत्मघातकी
पथकाने
केलेल्या
हल्ल्यात
तीन जणांचा मृत्यू झाला.
यामध्ये सूरज
मोहिते
यांच्यासह
स्थानिक
पोलिस कर्मचारी
व एका नागरिकाचा समावेश
आहे.
|
·
एक
एप्रिलपासून
देशभरातील केंद्र
सरकारचे
कर्मचारी व
त्यांच्यावर
अवलंबून
असणाऱ्यांसाठी
योग वर्ग सुरू
करण्यात
येणार आहेत.
·
एक
एप्रिलपासून
मनुष्यबळ व
प्रशिक्षण
विभागाने
योग वर्गाचे
आयोजन केले
आहे.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा