प्रश्नसंच १४१ - अर्थशास्त्र

MT Quiz [प्र.१] १४व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत?
१] डॉ. व्हाय. व्ही. रेड्डी
२] अभिजित सेन
३] अजय नारायण झा
४] सुदीप्तो मुंडले


३] अजय नारायण झा
----------------
[प्र.२] अनेक अंकी दारिद्र्य निर्देशांकाने १९९७ मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली?
१] ग्राहक निर्देशांक
२] भारतीय दारिद्र्य निर्देशांक
३] दारिद्र्याखालील निर्देशांक
४] मानवी दारिद्र्य निर्देशांक


४] मानवी दारिद्र्य निर्देशांक
----------------
[प्र.३] आर्थिक प्रगतीसाठी वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ होऊ निर्माण शकते?
१] अंतर्गत व बहिर्गत कर्ज
२] क्रमवर्धी करपद्धती
३] तुटीची अर्थव्यवस्था
४] सरकारी कर्जरोखे


३] तुटीची अर्थव्यवस्था
----------------
[प्र.४] कोणत्याही राष्ट्राचा विकास होत आहे किंवा नाही यांचे परीक्षण होण्यासाठी पुढीलपैकी कशाचे स्त्रोत उपलब्ध असणे जरुरी आहे?
१] GDP वृद्धी दर
२] दरडोई उत्पन्न दर
३] NDP दर
४] वरील सर्व


१] GDP वृद्धी दर
----------------
[प्र.५] भारताच्या नव्या विज्ञान धोरणाची उद्दिष्टे असलेल्या अयोग्य विधानांची निवड करा.
१] विज्ञानातील निवडक क्षेत्रांत जागतिक नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
२] २०३० पर्यंत जगातील पाच विज्ञान महासत्तांमध्ये स्थान मिळविणे.
३] समाजातील सर्व घटकांमध्ये विज्ञानविषयक जागृती निर्माण करणे.
४] विज्ञान क्षेत्रात करिअर व संशोधन कार्यास वाव देणे.


२] २०३० पर्यंत जगातील पाच विज्ञान महासत्तांमध्ये स्थान मिळविणे.
[२०२० पर्यंत जगातील पाच विज्ञान महासत्तांमध्ये स्थान मिळविणे.]

----------------
[प्र.६] जनगणना मोहीम यशस्वी करण्यासाठी मंत्रिपदाच्या कार्यकाळात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल खालीलपैकी कोणाचा ‘जनगणना २०११ सुवर्णपदक’ देऊन गौरव केला गेला?
१] सी. चंद्रमौली
२] गुरुदास कामत
३] पंतप्रधान मनमोहन सिंग
४] वरील सर्व


२] गुरुदास कामत
----------------
[प्र.७] २०१३ टे २०१८ साठीच्या महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणात कोणत्या घटकावर विशेष लक्ष दिले जाणार आहे?
१] अतिलघु व मोठे उद्योग
२] अतिलघु व मध्यम उद्योग फक्त
३] अतिलघु, लघु व मध्यम उद्योग
४] वरील सर्व


३] अतिलघु, लघु व मध्यम उद्योग
----------------
[प्र.८] बँकिंग कायदे विधेयक २०११ विषयी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ] विधेयकानुसार खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये गुंतवणूकदारांच्या मतदानाच्या अधिकारात कपात करण्यात आली.
ब] विधेयकानुसार खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये गुंतवणूकदारांच्या मतदानाच्या अधिकारात १०% वरून २६% एवढी वाढ करण्यात आली आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य


२] फक्त ब
----------------
[प्र.९] १९९६-९७ मध्ये नियोजन मंडळाने व्यक्त केलेल्या दारिद्र्याच्या अंदाजासाठी कोणता निकष वापरला होता?
१] ग्रामीण भागासाठी दरमहा दरडोई १२२.६० रु. उपभोग खर्च आणि शहरी भागासाठी दरमहा दरडोई १५८.३० रु. प्रत्येक महिन्याला
२] ग्रामीण भागासाठी दरमहा दरडोई १६०.३० रु. उपभोग खर्च आणि शहरी भागासाठी दरमहा दरडोई १६८.२० रु. प्रत्येक महिन्याला
३] ग्रामीण भागासाठी दरमहा दरडोई १६५.४५ रु. उपभोग खर्च आणि शहरी भागासाठी दरमहा दरडोई १४८.३० रु. प्रत्येक महिन्याला
४] ग्रामीण भागासाठी दरमहा दरडोई १७५.५५ रु. उपभोग खर्च आणि शहरी भागासाठी दरमहा दरडोई १८५.२० रु. प्रत्येक महिन्याला


१] ग्रामीण भागासाठी दरमहा दरडोई १२२.६० रु. उपभोग खर्च आणि शहरी भागासाठी दरमहा दरडोई १५८.३० रु. प्रत्येक महिन्याला
----------------
[प्र.१०] ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील लोकांचे जीवन उंचावण्यासाठी ‘नॅशनल रुरल लिव्हलीहूड मिशन’चे योगदान कसे आहे?
अ] ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कृषी व्यवसाय केंद्रे तसेच उत्पादन उद्योगाची निर्मिती करणे.
ब] स्व-मदत गट आणि कौशल्य विकास उपक्रमांचे दृढीकरण करणे.
क] बियाणे, खते, डीझेल पंपसेट व लघुसिंचन उपकरणे शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करणे.
ड] ग्रामीण विकासातील विविध योजनांत उपेक्षित घटकांसाठी ५०% आरक्षण ठेवणे.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त अ, ब आणि क
३] फक्त अ, ब आणि ड
४] वरील सर्व


२] फक्त अ, ब आणि क
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा