प्रतिष्ठीत फोर्ब्स या मासिकाने २०१७च्या ‘सुपर अचिव्हर्स’च्या यादीत ३० भारतीय वंशाच्या नवउद्योजकांना स्थान दिले आहे.
आरोग्य, नवनिर्माण, क्रीडा, आर्थिक इत्यादी २० क्षेत्रांतील ३० भारतीय वंशाच्या व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
यात तीस वर्षांखालील तरुण उद्योजकांचा समावेश असून, विशेष म्हणजे यात महिलांचाही समावेश आहे.
रॉकफेलरच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे राजीव शहा
अमेरिकेतील सर्वांत मोठी आणि प्रभावशाली देणगीदार संस्था असलेल्या रॉकफेलर फाउंडेशनचे १३वे अध्यक्ष म्हणून राजीव जे. शहा यांची नियुक्ती झाली आहे.
शहा हे ज्युडीथ रॉडिन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. रॉडिन या मागील बारा वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.
सध्या शाह या संस्थेचे विश्वस्त आहेत. ते या संस्थेचे सर्वांत तरुण आणि भारतीय वंशाचे पहिले अध्यक्ष ठरले आहेत.
राजीव शहा २००९ ते २०१५ या काळात युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे (यूएसएआयडी) प्रमुख होते.
त्यांनी अमेरिकेच्या कृषी विभागात मुख्य शास्त्रज्ञ आणि कनिष्ठ सचिव या पदांवरही काम केले आहे.
बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेही ते आठ वर्ष कार्यरत होते.
२०११मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अनिवासी भारतीयांना देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
इलेक्ट्रॉनिक चीप असलेले ई-पासपोर्ट
केंद्र सरकारने पासपोर्टच्या गैरवापराला आळा बसविण्यासाठी बायोमेट्रीक माहितीने परिपूर्ण असलेले ई-पासपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
या ई-पासपोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप असणार आहे. पासपोर्टच्या डेटा पेजमध्ये जी माहिती असेल, तीच माहिती या चीपमध्ये असणार आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ई-पासपोर्टसाठी मंजुरी देण्यात आली आहे. ई-पासपोर्टमुळे संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती सुरक्षित राहू शकणार आहे.
धार्मिक अभ्यासाचे विद्वान ह्य़ूस्टन स्मिथ यांचे निधन
विविध धर्मग्रंथ आणि धर्मशास्त्राचा अफाट व्यासंग असलेले हे विद्वान प्रा. ह्य़ूस्टन स्मिथ यांचे ३० डिसेंबर २०१६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
स्मिथ यांचा जन्म १९१९मध्ये चीनमधील एका ख्रिश्चन परिवारात झाला. १७ वर्षे तेथे राहिल्यानंतर ते शिक्षणासाठी अमेरिकेत आले.
शिकागो विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी स्वामी सत्प्रकाशानंद यांच्या मार्गदर्शनाखाली वेदान्त तसेच बौद्ध आणि सूफी इस्लामचा अभ्यास केला.
डेन्व्हर विद्यापीठात स्मिथ यांनी १९४४ ते १९४९ या काळात अध्यापन केले. नंतर वॉशिंग्टन विद्यापीठात त्यांनी १० वर्षे शिकवण्याचे केले.
नंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
वॉशिंग्टन विद्यापीठात असताना त्यांनी तयार केलेल्या ‘रिलिजन्स ऑफ मॅन्स’ आणि ‘सर्च फॉर अमेरिका’ या दोन मालिकांची खूप प्रशंसा केली गेली.
पुढे त्यांना आर्थर क्रॉम्टन यांच्यासमवेत ‘सायन्स अॅण्ड ह्य़ूमन रिस्पॉन्सिबिलिटी’ या अन्य एका चित्रवाणी मालिकेची निर्मिती करण्याची संधी मिळाली.
हिंदू धर्म, तिबेटी बौद्ध आणि सूफी संप्रदायावर स्मिथ यांनी माहितीपट बनवले, त्यांसही विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
त्यांच्या ‘द वर्ल्ड्स रिलिजन्स’ या जगभर गाजलेल्या पुस्तकाच्या २० लाख प्रती विकल्या गेल्या होत्या.
१९९६मध्ये बिल मॉयर्स यांनी स्मिथ यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा गौरव करणारा माहितीपट बनवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा