चालू घडामोडी : १४ जानेवारी

गुजरातला रणजी स्पर्धेचे पहिले विजेतेपद

  • रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरातने मुंबईवर पाच गडी राखून विजय मिळवत पहिल्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आहे.
  • कर्णधार पार्थिव पटेलच्या १४३ धावांच्या जोरावर गुजरातने मुंबईच्या ३१२ धावांचा यशस्वी पाठलाग करत ८३ वर्षांत प्रथमच रणजी करंडक जिंकला.
  • रणजी स्पर्धेच्या इतिहासात इतकी मोठी धावसंख्या आतापर्यत तीन फक्त वेळा पार करण्यात प्रतिस्पर्धी संघ यशस्वी ठरला होता.
  • मुंबईने आतापर्यंत ४०वेळा रणजी करंडक जिंकला असून ४१व्यांदा रणजी करंडक जिंकण्याची संधी त्यांच्याकडे होती.
 गतविजेते रणजी संघ 
  • २०१५-१६: मुंबई
  • २०१४-१५: कर्नाटक
  • २०१३-१४: कर्नाटक
 रणजी करंडक सांघिक विक्रम 
  • सर्वात जास्त विजय: ४० (मुंबई)
  • सर्वात जास्त धावा: ९४४/६ (घोषित) - हैद्राबाद वि. आंध्र (१९९३-९४)
  • सर्वात कमी धावा: २१/१० - हैद्राबाद वि. राजस्थान (२०१०-११)
 खेळाडूंचे विक्रम 
  • सर्वात जास्त धावा: बी.बी.निंबाळकर (४४३ नाबाद) महाराष्ट्र वि. काठेवाड (सौराष्ट्र) (१९४८-४९)
  • सर्वात चांगली गोलंदाजी (डाव): प्रेमांशू चटर्जी (१०/२०) बंगाल वि. आसाम (१९५६-५७)
  • सर्वात चांगली गोलंदाजी (सामना): अनिल कुंबळे (१६/९९) कर्नाटक वि. केरळ (१९९४-९५)

आमिर सूफी यांना फिशर ब्लॅक पुरस्कार

  • अमेरिकन फायनान्स असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा फिशर ब्लॅक पुरस्कार आमिर सूफी यांना मिळाला आहे. अर्थशास्त्रात मूलभूत संशोधन करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
  • सूफी सध्या शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझिनेसमधील अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण विषयाचे प्राध्यापक आहेत.
  • या संस्थेच्या प्राध्यापकास हा पुरस्कार मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी टोबियास मोसकोवित्झ आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.
  • चाळीस वर्षांखालील अर्थशास्त्रज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. तरुण अर्थतज्ज्ञांना संशोधनास प्रेरणा मिळावी हा फिशर पुरस्कारामागचा हेतू आहे.
  • ज्या फिशर ब्लॅक यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते गोल्डमन सॅशचे माजी भागीदार होते व शिकागो बूथ स्कूल तसेच एमआयटीत प्राध्यापक होते.
  • ‘घरांसाठीचे कर्ज व आर्थिक पेचप्रसंग’ या विषयावरील संशोधनासाठी सूफी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
  • सूफी यांनी जार्जटाऊन विद्यापीठाच्या वॉल्श स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिस या संस्थेतून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.
  • नंतर त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून याच विषयात पीएच.डी. केली. नंतर २००५मध्ये ते शिकागोच्या बूथ स्कूलमध्ये प्राध्यापक झाले.
  • महामंदी, ग्राहकांचा वस्तू वापर, कर्ज बाजारपेठा व त्यात घरकर्जाची भूमिका हे सूफी यांच्या संशोधनाचे मुख्य विषय आहेत.
  • त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह, गृहनिर्माण व शहर विकासावरील सिनेट समिती, व्हाइट हाऊसचे आर्थिक सल्लागार मंडळ यांनाही सादर करण्यात आले.
  • अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेत त्यांनी सहायक अर्थतज्ज्ञ म्हणूनही काम केले आहे.
  • सूफी हे नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रीसर्च या संस्थेचे संशोधन सहायक तसेच अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्य़ू व जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स या नियतकालिकांचे सहायक संपादकही आहेत.
  • त्यांनी अतिफ मियाँ यांच्यासमवेत ‘हाऊस ऑफ डेब्ट- हाऊ दे (अ‍ॅण्ड यू) कॉज्ड द ग्रेट रेसेशन अ‍ॅण्ड हाऊ वुई कॅन प्रिव्हेन्ट इट फ्रॉम हॅपनिंग अगेन’ हे पुस्तक लिहिले आहे.
  • ‘फायनान्शियल टाइम्स’च्या यादीत २०१४मध्ये उद्योग व अर्थशास्त्रातील सर्वोत्तम पुस्तक म्हणून ते नावाजले गेले होते.

रशियामध्ये धूम्रपान आणि तंबाखू मुक्तीसाठी कायदा

  • धूम्रपानावर नियंत्रण आणण्यासाठी २०१५नंतर जन्मलेल्या व्यक्तींना सिगारेटची विक्री करण्यात येणार नसल्याचा निर्णय रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे.
  • रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या या प्रस्तावाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही मंजुरी दिली आहे.
  • त्यामुळे तंबाखूवर पूर्णपणे बंदी आणणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.
  • रशियाने धूम्रपान आणि तंबाखू मुक्तीसाठी आणलेल्या या कायद्याचे परिणाम २०३३मध्ये दिसायला सुरुवात होईल. कारण २०१५नंतर जन्मलेली मुले तेव्हा १८ वर्षांची होतील.
  • २०१६च्या आकडेवारीनुसार रशियातील धूम्रपान करणाऱ्यांची संख्या १० टक्क्यांनी कमी झाली आहे.
  • मात्र रशियातील धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि कालांतराने ते शून्यावर आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण विकासासाठी अनोखा प्रकल्प

  • ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शिक्षण संस्थांना जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक अनोखा प्रकल्प आखला आहे.
  • यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय व ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालय यांच्यामध्ये ‘उन्नत भारत’ कार्यक्रमाअंतर्गत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • या सामंजस्य करारानुसार, मानव संसाधन विकास मंत्रालय सर्व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना ग्रामपंचायती दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देईल.
  • या संस्था ग्रामपंचायतींचा प्रत्यक्षस्थळी जाऊन अभ्यास करतील आणि या ग्रामपंचायतींच्या विकासासाठी आवश्यक नावीन्यपूर्ण उपाय सूचित करतील. 
  • त्यानंतर योग्य मूल्यांकन करून जिल्हा प्रशासनाकडून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.
  • पंचायत राज मंत्रालय ‘ग्राम पंचायत विकास आराखडा’मध्ये शिक्षण संस्थांना सहभागी करून घेईल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षण संस्था यांच्यामध्ये दुवा म्हणून हे मंत्रालय कार्य करेल.
  • हा कार्यक्रम प्राथमिक टप्प्यामध्ये ९२ जिल्हय़ात राबविण्यात येणार असून, तो यशस्वी झाल्यानंतर देशभरात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

प्रयोगशील कंपन्यांच्या यादीतून टाटांच्या कंपन्या बाद

  • बोस्टन कन्सलिंग ग्रुप या समूहाने प्रकाशित केलेल्या जगातल्या ५० सर्वात प्रयोगशील कंपन्यांच्या यादीतून टाटा समूहातल्या कंपन्या बाद झाल्या आहेत.
  • ही यादी दरवर्षी प्रकाशित करण्यात येते. या यादीत २०१५मध्ये टाटा मोटर्सने २६वे तर २०१४मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने ४३वे स्थान मिळविले होते.
  • भारतीय उद्योगजगतात टाटा समूहाला अतिशय मनाचे स्थान आहे. परंतु तरीही यावर्षीच्या यादीत टॉप ५०मध्ये टाटा समूहातली एकही कंपनी नाही.
  • एक शतकापासूनही जास्त काळ उद्योगक्षेत्रात असलेल्या टाटा समूहाचा भारतीय अर्थव्यवस्थेची अनेक क्षेत्रे विकसित करायला मोठा हातभार लागला आहे.
  • मिठापासून स्टील उद्योगापर्यंत टाटांनी आपल्या समूहाचे जाळे पसरवले. असे असूनही टाटा समूह जगातल्या ५० सर्वात प्रयोगशील कंपन्या यादीतून बाद झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा