कर चुकवेगिरीवर चाप लावण्यासाठी ‘जनरल अॅन्टी अव्हॉयडन्स रुल’ अर्थात ‘गार’ या कायद्याची १ एप्रिल २०१७पासून अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे.
२०१७-१८ या आर्थिक वर्षापासून कायदा लागू होईल. भारताशिवाय ‘गार’ हा कायदा अन्य देशांमध्येही आधीपासूनच अस्तित्वात आहे.
ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन. दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये हा कायदा अस्तित्वात आहे.
मेघालयचे राज्यपाल व्ही. षण्मुगनाथन यांचा राजीनामा
लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर मेघालयचे राज्यपाल व्ही. षण्मुगनाथन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
राजभवनातील सुमारे १००हून अधिक कर्मचाऱ्यांनी षण्मुगनाथन यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे पत्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते.
राज्यपालांना हटवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वाक्षऱ्यांचे अभियानही सुरू केले होते. त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आले होते.
याचबरोबर, षण्मुगनाथन यांना हटविण्याच्या मागणीसाठी मेघालयमधील महिला कार्यकर्त्यांनीही मोहिम राबविण्यास सुरुवात केली होती.
रशियाचे भारतातील राजदूत कदाकिन यांचे निधन
दीर्घ कालावधीपासून भारतात रशियाचे राजदूत असलेले अलेक्झांडर कदाकिन यांचे २६ जानेवारी रोजी हृदयविकाराने निधन झाले.
अस्खलित हिंदी बोलणारे कदाकिन हे २००९पासून भारतात रशियाचे राजदूत म्हणून कार्यरत होते.
भारत आणि रशियामध्ये मजबूत संबंध निर्माण करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.
टॉप समितीच्या प्रमुखपदी अभिनव बिंद्रा
बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याची केंद्र सरकारने पुनर्गठित टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) समितीच्या प्रमुखपदी निवड केली आहे.
बिंद्रा हा यापूर्वीच्या टॉप समितीचादेखील प्रमुख होता पण त्याने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समितीचा राजीनामा दिला होता.
ही समिती खेळाडू निवडीची पद्धत स्वत: निश्चित करेल. गरज भासल्यास तज्ज्ञांना पाचारण करेल. समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.
२०२० आणि २०२४च्या ऑलिम्पिकसाठी पदक विजेत्यांचा शोध घेणे हा टॉपचा उद्देश आहे. ही योजना आधी २०१६ आणि २०२०च्या ऑलिम्पिकला डोळ्यापुढे ठेवून आखण्यात आली होती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा