चालू घडामोडी : २९ जानेवारी
रॉजर फेडररला ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद
- स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने मेलबर्न येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
- रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील अत्यंत चुरशीची झालेली ही अंतिम लढत ३ तास ३८ मिनिटे रंगली.
- स्पेनच्या राफेल नदाल याच्यावर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ अशी मात करत रॉजरने ऑस्ट्रेलियन ओपन २०१७चा किताब जिंकला.
- फेडररने पाचव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीताल हे १८वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
- २०१२च्या विम्बल्डन विजेतेपदानंतर फेडररने प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच त्याने यापूर्वी २०१०मध्ये शेवटचे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.
- ३५ वर्षीय फेडरर केन रोझवालनंतर ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा जास्त वयाचा दुसरा टेनिसपटू ठरला आहे.
- रोझवालने १९७४च्या अमेरिकन ओपनमध्ये ३९ वर्षे आणि ३१० दिवसांचा असताना अंतिम फेरी गाठली होती.
विमानतळावर अडकलेल्या निर्वासितांना मायदेशी पाठवण्यास स्थगिती
- अमेरिकेत येणाऱ्या मुस्लिम निर्वासितांना प्रवेशबंदी करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या न्यायालयाने धक्का दिला आहे.
- अमेरिकेतील विमानतळावर खोळंबलेल्या व्हिसाधारक निर्वासितांना पुन्हा मायदेशी पाठवण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
- सात मुस्लीमबहुल देशातील मूलतत्त्ववादी निर्वासितांना अमेरिकेत पुढील सूचनेपर्यंत प्रवेश न देण्याच्या आदेशावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली होती.
- मूलतत्त्ववादी मुस्लीम दहशतवाद्यांपासून अमेरिकेचे संरक्षण करण्यासाठी ‘प्रोटेक्शन ऑफ द नेशन फ्रॉम फॉरेन टेररिस्ट एंट्री इन टू द युनायटेड स्टेट्स’ हा आदेश जारी करण्यात आला होता.
- या आदेशाद्वारे इराण, इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या देशांमधील निर्वासितांना देशात बंदी घालण्यात आली.
- अनेक देशात युद्ध व संघर्ष, नागरी युद्ध सुरू आहे त्याचा फायदा घेऊन दहशतवादी अमेरिकेत घुसू शकतात अशी भीती आदेशात व्यक्त केली आहे.
- या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी झाल्याने अमेरिकेतील विमानतळांवर शेकडो प्रवासी अडकून पडले होते.
- यातील अनेक जण ट्रम्प यांनी निर्णयावर स्वाक्षरी करण्यापूर्वीच अमेरिकेच्या दिशेने निघाले होते. मात्र अमेरिकेत दाखल होताच त्यांना संबंधीत यंत्रणांनी ताब्यात घेतले होते.
- यातील इराक आणि येमेनमधील काही निर्वासितांना मायदेशी परतदेखील पाठवण्यात आले होते.
- याच्या निषेधार्थ अमेरिकेतील जेडब्ल्यूएफ विमानतळाबाहेर हजारो नागरिकांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले.
- अमेरिकेत निर्वासितांचे स्वागत आहे असे फलक हाती घेऊन या आंदोलकांनी ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
- या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमधील न्यायालयाने अमेरिकेचा व्हिसा असलेल्या पण विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली.
- हा निर्णय फक्त विमानतळावर खोळंबलेल्या प्रवाशांसाठीच हा निर्णय लागू असून त्यामुळे किमान १०० ते २०० प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सानिया मिर्झाला ऑस्ट्रेलियन ओपनचे उपविजेतेपद
- ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीमध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डॉडीग या जोडीचा पराभव झाला.
- कोलंबियाच्या ज्युआन सेबास्टियन कॅबल आणि अमेरिकेची अॅबिगेल स्पीअर्स या जोडीने सानिया-डॉडीग या जोडीचा ६-४, ६-४ असा पराभव करत विजेतेपद मिळविले.
- या पराभवामुळे सानिया मिर्झाचे कारकिर्दीतील सातवे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
- सानियाच्या नावावर मिश्र दुहेरी व महिला दुहेरीची प्रत्येकी तीन ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदे जमा आहेत.
- सानिया व डॉडीगने गेल्या वर्षीही फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण लिएंडर पेस व मार्टिना हिंगीस यांच्याविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेशबंदी
- डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या नव्या व्हिसा पॉलिसीद्वारे सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- विदेशी दहशतवाद्यांच्या अमेरिकेतील प्रवेशापासून देशाची सुरक्षा असे या आदेशाचे नाव आहे.
- या ७ देशांमध्ये इराणचाही समावेश आहे. अमेरिकेच्या या कारवाईला उत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेशबंदी केली आहे.
- अमेरिकेने घेतलेला निर्णय अवमानकारक असून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे इराणकडून सांगण्यात आले आहे.
- इराणवर अमेरिकेद्वारे घालण्यात आलेली बंदी जोपर्यंत हटवण्यात येत नाही, तोपर्यंत अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेश देणार नाही अशी भूमिका इराणने घेतली आहे.
- डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय धक्कादायक असून सर्व स्तरातून या निर्णयाचा विरोध केला जात आहे.
सिंधूला सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद
- भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले.
- सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्कावर २१-१३, २१-१४ अशी मात करत विजेतेपदावर नाव कोरले.
- एकतर्फी झालेल्या या लढतीत सिंधूने ग्रेगोरियाला कोणतीही संधी न देता सहज विजय प्राप्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा