चालू घडामोडी : ४ जानेवारी
भारताला दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद
- उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवत भारताने बांगलादेशवर ३-१ अशी मात केली आणि महिलांच्या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले.
- दांगमेई ग्रेसने १२व्या मिनिटाला बांगलादेशची गोलरक्षक सबिना अख्तरला चकवत भारतासाठी पहिला गोल केला.
- उत्तरार्धात सामन्याच्या ६०व्या मिनिटाला पेनल्टी किकवर सस्मिता मलिकने गोल करीत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
- सामन्याची सात मिनिटे बाकी असताना भारताच्या इंदुमतीने गोल करीत संघाची आघाडी ३-१ अशी वाढवली. याच आघाडीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकत अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.
डॉ. आनन शेट्टी यांना हंटरियन प्रोफेसरपद
- ब्रिटनमधील भारतीय वंशाचे अस्थिशल्यविशारद डॉ. आनन शेट्टी यांना ‘हंटरियन प्रोफेसर’पद व पदक देऊन ब्रिटनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ने गौरवले आहे.
- जॉन हंटर हे ब्रिटनमधील प्रख्यात शल्यविशारद व वैज्ञानिक होते. त्यांच्या नावे दिले जाणारे हे प्राध्यापकपद शल्यविशारद क्षेत्रातील मोठा सन्मान आहे.
- मूलपेशींच्या साह्य़ाने कूर्चाची दुरुस्ती करण्याचे तंत्र डॉ. शेट्टी यांनी शोधून काढले. हे संशोधन त्यांनी कँटरबरी ख्राइस्ट चर्च युनिव्हर्सिटीत असताना केले.
- ब्रिटनमधील अस्थिशल्यविशारदांना प्रशिक्षण देण्याचे मोठे काम डॉ. शेट्टी यांनी केले असून गुडघ्याच्या शस्त्रक्रियेत त्यांचे जगात अव्वल स्थान आहे.
- अस्थिशल्यात त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना आणल्या. गुडघ्याच्या ऑथरेस्कोपिक शस्त्रक्रियेत ‘रोबो’चा वापर करणारे ते पहिले शल्यविशारद आहेत.
- जेलआधारित कूर्चा दुरुस्ती शस्त्रक्रियाही त्यांनीच प्रथम सुरू केल्या. स्पायर अॅलेक्झांड्रा हॉस्पिटल या इंग्लंडमधील रुग्णालयाचे ते संस्थापक संचालक आहेत.
- अनेकदा अपघातात लोकांचे हात-पाय कापावे लागतात तेव्हा ते अपंग होतात, पण अस्थिमज्जेतील मूलपेशींच्या मदतीने एक प्रकारचे जेल त्यात मिसळून लोकांना बरे करण्याचे तंत्र त्यांनी प्रा. पीटर किम यांच्यासमवेत शोधले. त्याला ‘शेट्टी-किम तंत्र’ असे म्हणतात.
- अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली असून, फ्रेड हिडली पुरस्कार व एल्सवियर पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
बुकर पुरस्कार विजेते जॉन बर्जर यांचे निधन
- कलात्मक समीक्षेची परंपरा सुरू करणारे बुकर पुरस्कार विजेते कांदबरीकार जॉन बर्जर यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
- मार्क्सवादी मर्मज्ञ म्हणून ओळखले जाणारे बर्जर यांच्या ‘वेज ऑफ सीईंग’ या बीबीसीवरील मालिकेतून कलात्मक समीक्षेमध्ये एक राजकीय दृष्टीकोन आणला.
- G हे एकाक्षरी शीर्षक असलेल्या कादंबरीसाठी त्यांना १९७२मध्ये मॅन बुकर पुरस्कार मिळाला होता.
- पुरस्काराच्या रकमेपैकी अर्धे मानधन ‘द ब्लॅक पँथर्स’ या आफ्रिकन-अमेरिकन चळवळीसाठी त्यांनी दिले.
- उत्तर लंडनमधील हॅकनी येथे जन्म झालेल्या बर्जर यांनी चित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांची चित्रकला १९४०मध्ये प्रदर्शनातून मांडल्यानंतर त्यांनी लेखनामध्ये नशीब अजमावले.
- कवितांपासून ते पटकथांपर्यंत, तसेच छायाचित्रणाविषयी, स्थलांतरित कामगारांचे शोषण, पॅलेस्टिनींचा संघर्ष अशा विविध विषयांवर, वेगवेगळ्या स्वरुपात त्यांनी लेखन केले.
बिलावल भुट्टो यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
- पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.
- याआधी खुर्शीद शहा यांच्याकडे ही जबाबदारी होती. आता ते २८ वर्षीय बिलावल भुट्टो यांचे सल्लागार म्हणून काम पाहतील.
- ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले बिलावल भुट्टो सध्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष आहेत.
- काही दिवसांपूर्वीच सिंध प्रांतातून निवडणूक लढविण्याचा निर्णय बिलावल यांनी घेतला होता.
ऑस्ट्रेलिया ट्वेंटी-२०च्या सहप्रशिक्षकपदी रिकी पाँटिंग
- ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी माजी कर्णधार रिकी पाँटिंग याची ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या सहप्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
- पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाँटिंगची सहप्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
- या संघाचा प्रमुख प्रशिक्षक माजी सलामीवीर जस्टिन लँगर असणार असून, जेसन गिलेस्पी सुद्धा सहप्रशिक्षक असणार आहे.
- पाँटिंगने यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा