चालू घडामोडी : ९ जानेवारी
प्रा. व्ही. कुमारन यांना इन्फोसिस पुरस्कार
- बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसच्या प्रा. व्ही. कुमारन यांना इन्फोसिस पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- त्यांनी संगणक व अभियांत्रिकीतील तंत्रज्ञानाचा वापर वैद्यकीय क्षेत्रातील काही सुविधांसाठी केला आहे.
- हायड्रोडायनॅमिक इन्स्टॅबिलिटी, ट्रान्झिशन टू टर्ब्यूलन्स, फ्लो अॅण्ड मिक्सिंग ऑफ मायक्रो फ्लुइडिक डिव्हाइसेस, डायनॅमिक्स ऑफ कॉम्प्लेक्स फ्लुईड्स, ग्रॅन्युलर फ्लोज हे त्यांचे संशोधनाचे खास विषय आहेत.
- सध्या ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेच्या रासायनिक अभियांत्रिकी शाखेत प्राध्यापक आहेत.
- इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, द इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी यांचे ते फेलो आहेत. अमेरिकन फिजिकल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची २०१५मध्ये निवड झाली.
- १९८७मध्ये त्यांनी आयआयटी मद्रास येथून बी-टेक पदवी घेतली. नंतर १९९२मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून पीएच डी झाले आहेत.
- लॅब ऑन चीप हे त्यांच्या प्रयोगांचे वैशिष्टय़ असून त्यांच्या संशोधनामुळे काही अभिक्रिया कमी वेळात तपासणे शक्य झाले आहे.
- पॉलिमर, पॉलिमर जेल, भारित पारपटले यातही त्यांनी उपयोजित संशोधन केले आहे. अन्न व सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या लॅमेलर लिक्विड क्रिस्टलाइन पदार्थाची निर्मिती करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
- त्यांना भारतात विज्ञानात सर्वोच्च मानला जाणारा भटनागर पुरस्कार व स्वर्णजयंती विद्यावृत्ती तसेच इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
रणदीप हुडा अग्निशमन सेवेचा ब्रँड अँबॅसेडर
- भारतातील अग्निशमन सेवेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अभिनेता रणदीप हुडा याची निवड करण्यात आली आहे.
- केंद्र सरकारची संस्था 'द स्टँडिंग फायर अॅडवायजरी काउन्सिल'ने (SFC) रणदीपची निवड केली आहे.
- अभिनेता रणदीप हुडा आधी मुंबई अग्निशामक दलाचा ब्रँड अँबॅसेडर राहिलेला आहे. तो भविष्यात अग्निसुरक्षा अभियानांमध्ये सहभागी होणार आहे.
मनरेगासाठी आधार कार्ड बंधनकारक
- ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला शंभर दिवस हक्काचे काम देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी (मनरेगा) एप्रिलपासून आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
- सरकारने आधार कायद्यातील कलम ७ लागू केले आहे. यानुसार सरकारी अंशदान व निधी मिळविताना आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक देणे बंधनकारक आहे.
- त्यामुळे मनरेगा योजनेत नाव नोंदविणाऱ्या व्यक्तींना आता आधार कार्डचा पुरावा द्यावा लागणार आहे.
- ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना ३१ मार्चपर्यंत ते काढून घ्यावे लागेल. आधारसाठी नाव नोंदणी केलेल्यांना त्याची पावती पुरावा म्हणून देता येईल.
- आधार कार्ड मिळेपर्यंत शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, मनरेगाचे ओळखपत्र, राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र इ. पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष रफसंजानी यांचे निधन
- इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अकबर हाशेमी रफसंजानी यांचे ८ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
- रफसंजानी हे इराणचे १९८९ ते १९९७ अशा दीर्घ काळापर्यंत राष्ट्राध्यक्ष होते. यानंतर २००५मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत ते महमूद अहमदिनेजाद यांच्याकडून पराभूत झाले होते.
- इराणमधील संसद व मार्गदर्शक मंडळामधील (गार्डियन कौन्सिल) वाद मिटविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संवेदनशील समितीचे अध्यक्ष म्हणूनही रफसंजानी यांनी काम पाहिले होते.
- याच समितीने २०१३मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत उतरलेल्या रफसंजानी यांना अपात्र ठरविले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा