प्रगतीशील शहरांच्या यादीमध्ये बंगळुरू प्रथम स्थानी
जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) काहीर केलेल्या प्रगतीशील शहरांच्या यादीमध्ये बंगळुरू शहराने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
तंत्रज्ञानाचा आणि नाविण्यपूर्ण गोष्टींचा अंगिकार हे मुदे विचारात घेऊन प्रगतीशील शहरांची यादी तयार करण्यात आली आहे.
पाणी आणि विजेच्या समस्या असलेले बंगळुरू शहर देशाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी समजली जाते. याशिवाय नवउद्यमींसाठी (स्टार्ट अप) बंगळुरूतील वातावरण पोषक समजले जाते.
इन्फोसिससारख्या बड्या कंपन्यांची कार्यालये बंगळुरूत असल्याने देशभरातील हजारो तरुण-तरुणी बंगळुरूमध्ये नोकरीसाठी राहतात.
बंगळुरुसोबतच हैदराबाद शहरानेही पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. प्रगतीशील शहरांच्या यादीत हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे.
बंगळुरूनंतर प्रगतीशील शहरांच्या यादीत व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराने दुसरे स्थान पटकावले आहे. तर सिलिकॉन व्हॅली तिसऱ्या स्थानी आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या ३० प्रगतीशील शहरांच्या यादीत बंगळुरू, हैदराबादसह दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांनाही स्थान देण्यात आले आहे.
सीबीआय संचालकपदी अलोक वर्मा
दिल्लीचे पोलिस आयुक्त अलोक वर्मा यांची १९ जानेवारी रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वयोमानानुसार वर्मा येत्या जुलैमध्ये सेवानिवृत्त होणार होते. पण आता त्यांना सीबीआय संचालक म्हणून पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सरन्यायाधीश जगदीशसिंग खेहर व काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे या तीन सदस्यांच्या समितीने वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
याआधीचे संचालक अनिल सिन्हा डिसेंबर २०१६मध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते व गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हंगामी संचालक म्हणून काम पाहात होते.
वर्मा हे १९७९च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांच्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतील सीबीआय संचालक हे २४वे पद आहे.
गेल्या वर्षी २९ फेब्रुवारीला दिल्ली पोलिस आयुक्तपदी त्यांची नेमणूक झाली होती. त्यापूर्वी ते तिहार कारागृहाचे महासंचालक होते.
आलोक कुमार वर्मा यांच्या दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदाच्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात आम आदमी पक्षाच्या अनेक आमदारांना अटक झाली होती.
पटेल ‘फिफा’च्या अर्थ समितीचे सदस्य
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष (एआयएफएफ) प्रफुल्ल पटेल यांची चार वर्षांसाठी फिफाच्या अर्थ समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
डिसेंबर २०१६मध्ये पटेल यांची आशियाई फुटबॉल परिसंघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
पटेल यांच्या प्रमुखपदाच्या काळात भारतात पहिल्यांदा पुढील वर्षी १७ वर्षे गटाच्या फिफा वर्ल्डकपचे आयोजन करण्यात येत आहे.
याशिवाय मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एआयएफएफने एएफसी १६ वर्षे गटाच्या स्पर्धेचे यजमानपददेखील भूषविले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा