चालू घडामोडी : २८ फेब्रुवारी

भारतातील व्याघ्र अभयारण्यात बीबीसीवर बंदी

  • राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणने (एनटीसीए) बीबीसी नेटवर्कवर आणि त्यांचा पत्रकार जस्टिन रॉलेटवर देशातील सर्व व्याघ्र अभयारण्यात प्रवेश करण्यास पाच वर्षांची बंदी घातली आहे.
  • शिकाऱ्यांविरोधात उचललेल्या पावलांविरोधात प्रश्नचिन्ह निर्माण करणारा बीबीसीचा माहितीपट समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
  • बीबीसीचे दक्षिण आशिया प्रतिनिधी असलेले रॉलेट यांनी आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात गेंड्यावर ‘वन वर्ल्ड: किलिंग फॉर कंजर्व्हेशन’ नावाने एक माहितीपट बनवला होता.
  • यामध्ये गेंड्यांच्या संवर्धनासाठी शिकाऱ्यांविरोधात अवलंबवण्यात येणाऱ्या कठोर कारवाईवर शंका उपस्थित करण्यात आली होती.
  • जर अभयारण्यात कोणी गेंड्याला नुकसान पोहोचवताना दिसला तर त्याला गोळी मारण्याचे अधिकार फॉरेस्ट गार्डला देण्यात आल्याचा दावा या माहितीपटात करण्यात आला आहे.
  • फॉरेस्ट अधिकाऱ्याला मिळालेल्या या अधिकारामुळे जंगलात गेंड्यापेक्षा मनुष्यच जास्त मारले गेल्याचा दावा रॉलेटने माहितीपटात केला होता.
  • गेल्यावर्षी १७ गेंड्यांची हत्या झाली पण २३ लोकही मारले गेल्याचे त्यांनी म्हटले. या माहितीपटात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयावर टीका करण्यात आली आहे.
  • मात्र काझिरंगा व्याघ्र अभयारण्याच्या संचालकांनी गोळी मारण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे म्हटले आहे.
  • तसेच बीबीसीने जुने फुटे्ज आणि मुलाखतीत नाटकीय बदल करून ते चुकीच्या पद्धतीने ते दाखवले आहे असाही दावा त्यांनी केला आहे.
  • बीबीसी आणि जस्टिन रॉलेट यांनी पर्यावरण मंत्रालयाला न दाखवता या माहितीपटाचे प्रसारण केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत जितू रायला कांस्यपदक

  • दिल्लीत सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत नेमबाज जितू रायने १० मी एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताचे हे तिसरे पदक ठरले.
  • जितू रायने २१६.७ गुणांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. व्हिएतनामचा सुआन विन होआंग २३६.६ गुणांसह रौप्य पदकाचा तर जपानचा टोमोयुकी मत्सुदा २४०.१ गुणांसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
  • भारताकडून जितूसह ओमकार सिंग आणि अमनप्रीत सिंग देखील स्पर्धेत सहभागी होते. मात्र, त्यांना पहिल्या आठ खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त करण्यात अपयश आले.
  • जितू रायने २७ फेब्रुवारी रोजी महिला नेमबाज हिना सिंधू हिच्यासोबत मिश्र प्रकारातील १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम लढतीत जपानच्या जोडीचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
  • तसेच भारताच्या अंकुर मित्तलने मॅरेथॉन डबल ट्रॅप फायनलमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. सुवर्णपदकविजेता ऑस्ट्रेलियाच्या जेम्स विलेटच्या तुलनेत तो एका गुणाने पिछाडीवर होता.

सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा

  • राजिंदर गोयल, पद्माकर शिवलकर आणि शांता रंगास्वामी या दिग्गजांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • स्थानिक क्रिकेटमध्ये दिमाखदार कारकीर्द घडवणाऱ्या राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर या दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांचा भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मात्र मिळाली नाही.
  • मुंबईसाठी खेळताना शिवलकर यांनी १२४ सामन्यांमध्ये ५८९ बळी मिळवले. प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी ४२ वेळा डावात पाच बळी घेण्याची तर १३ वेळा सामन्यात १० बळी घेण्याची किमया साधली.
  • हरयाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोयल यांच्या नावावर ७५० बळी आहेत. यापैकी ६३७ रणजी क्रिकेट स्पर्धेत आहेत. रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळींचा विक्रम आजही गोएल यांच्याच नावावर आहे.
  • गोयल यांनी कारकिर्दीत ५९ वेळा डावात पाच किंवा त्याहून अधिक गडी बाद केले. त्याचबरोबर १८वेळा त्यांनी दहा किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले.
  • या दोघांच्या बरोबरीने सन्मानित करण्यात येणाऱ्या माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी या पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी १२ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामन्यांत भारताचे नेतृत्व केले.
  • त्याचबरोबर भारतीय क्रिकेटला दिलेल्या अमूल्य योगदानासाठी वामन कुमार आणि (दिवंगत) रमाकांत देसाई यांना बीसीसीआयतर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • एन. राम, रामचंद्र गुहा आणि डायना एडल्जी यांचा समावेश असलेल्या समितीने या सर्व पुरस्कार्थीची निवड केली आहे.

विराट कोहलीला वर्षांतील सर्वोत्तम कर्णधाराचा पुरस्कार

  • भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची १०व्या ईएसपीएन क्रिकइन्फो वार्षिक पुरस्कारांमध्ये वर्षांतील सर्वोत्तम कर्णधार या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
  • मागील वर्षांत कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताने १२ कसोटी सामन्यांपैकी ९ सामने जिंकण्याची किमया साधली असल्यामुळे त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • इंग्लंडच्या बेन स्टोक्सने सर्वोत्तम कसोटी फलंदाजाचा पुरस्कार पटकावला आहे. तर इंग्लंडच्याच स्टुअर्ट ब्रॉडने सर्वोत्तम कसोटी गोलंदाजाचा पुरस्कार मिळवला आहे.
  • दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकची सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज या पुरस्कारासाठी निवड झाली. तर वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरिन सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाज ठरला.
  • विंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटला सर्वोत्तम ट्वेन्टी-२० फलंदाजाचा व बांगलादेशच्या मुस्ताफिझूर रेहमानला सर्वोत्तम ट्वेन्टी-२० गोलंदाजाचा पुरस्कार जाहीर झाला.

सिमीच्या कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा

  • बंदी घातलेल्या सिमी संघटनेचा प्रमुख सफदर हुसेन नागोरी याच्यासह अन्य १० जणांना इंदोर येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
  • सिमीच्या कार्यकर्त्यांना भारतीय दंडसंहितेअंतर्गत देशद्रोह आणि धर्माच्या नावावर दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे तसेच बेकायदा कृत्य (प्रतिबंधक) कायदा या अंतर्गत दोषी ठरवले.
  • या ११ दोषींपैकी १० गुजरातमधील साबरमती तुरुंगात असून त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाचा आदेश कळवण्यात आला.
  • सन २००८मध्ये देशद्रोहाच्या एका खटल्यात ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती.

चालू घडामोडी : २७ फेब्रुवारी

यूपीएससीची गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी भरती

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकार यावर्षी फक्त ९८० अधिकाऱ्यांची भरती करणार आहे. मागील पाच वर्षातील ही सर्वात कमी संख्या आहे.
  • भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवासारख्या (आयपीएस) इत्यादी प्रतिष्ठित सेवांमध्ये ही भरती करण्यात येईल.
  • वर्ष २०१६मध्ये १०७९ तर २०१५मध्ये ११६४ पदांच्या भरतीच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर २०१४ आणि २०१३मध्ये अनुक्रमे १३६४ आणि १२२८ अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली होती.
  • २०१७मध्ये लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या ही ९८० इतकी आहे. यातील २७ पदे हे दिव्यांग श्रेणीसाठी आरक्षित असतील.
  • यावर्षीची पूर्व परीक्षा ही १८ जून रोजी होईल. ही पूर्व परीक्षा देण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १८ मार्चपर्यंत आहे.

भारताचा ट्रॉपेक्स युद्धसराव

  • भारतीय नौदलाने अरबी समुद्र आणि उत्तर मध्य हिंदी महासागर अशा विस्तीर्ण टापूमध्ये ‘थिएटर लेव्हल रेडिनेस अँड ऑपरेशनल एक्झरसाइज’ (ट्रॉपेक्स) या मोठ्या युद्धसरावाचे आयोजन केले होते.
  • लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल यांनी संयुक्तपणे युद्धसरावात भाग घेऊन युद्धाच्या तयारीची चाचपणी केली.
  • २३ जानेवारी ते २३ फेब्रुवारीपर्यंत हा युद्धसराव चालला होता. संभाव्य धोक्यांना सामोरे जाता यावे, याकरिता सुरक्षा दलांच्या युद्धाच्या तयारीची चाचणी या सरावाद्वारे करण्यात आली.
  • या युद्धसरावात आण्विक पाणबुडी ‘चक्र’, आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू नौका, सुखोई-३०, जॅग्वार अशा देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या सामरिक आयुधांनी सहभाग घेतला होता.
  • याशिवाय या युद्धसरावात पश्चिम आणि पूर्व नौदल कमांडच्या ४५हून अधिक नौका, पाच पाणबुड्या, नौदलाची ५० लढाऊ विमाने, तटरक्षक दलाच्या ११ नौका, हवाई दलाची २० लढाऊ विमानेही सहभागी झाली होती.

जितू राय आणि हिना सिंधू या जोडीला सुवर्णपदक

  • दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत जितू राय आणि हिना सिंधू या जोडीने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
  • जितू राय आणि हिना सिंधू यांनी मिश्र प्रकारातील १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम लढतीत जपानच्या जोडीचा पराभव केला.
  • मात्र, मिश्र प्रकार प्रायोगिक तत्त्वावर खेळवण्यात येत असल्याने या दोन्ही खेळाडूंच्या गुणांमध्ये त्यामुळे कोणताही फरक पडणार नाही.
  • काही दिवसांपूर्वी भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकाराऐवजी मिश्र लढती आयोजित करण्याची सूचना केली होती.
  • या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात प्रायोगिक तत्वावर मिश्र लढती खेळविण्यात येत आहेत.
  • आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या मान्यतेनंतर हा बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे सादर होईल.
  • ऑलिम्पिक समितीने मंजुरी दिल्यास २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५० मी. पिस्तूल, ५० मीटर रायफल प्रोन आणि डबल ट्रॅप प्रकारात फक्त पुरुषांसाठीच्या लढती न होता मिश्र प्रकारातही लढती होतील.

हरिकाला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक

  • भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाला सलग तिसऱ्यांदा महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • उपांत्य टायब्रेकर लढतीत चीनच्या टॅन झोंगयीला सरस वेळेच्या जोरावर विजयी घोषित करण्यात आले. अंतिम फेरीत टॅनसमोर युक्रेनच्या अ‍ॅना मुझीचुकचे आव्हान आहे.
  • हरिकाने टायब्रेकरमध्ये पहिल्या डावात विजयाने सुरुवात केली होती. तिने फक्त १७व्या चालीतच विजय नोंदवला होता.
  • मात्र, दुसऱ्या डावात हरिकाकडून झालेल्या चुकांचा फायदा टॅनने उचलला आणि विजयासह १-१ अशी बरोबरी साधली.
  • त्यानंतर बिल्ट्स गेममध्ये झ्योंगीने हरिकाला ५ -४ ने पराभूत केले. हरिकाचे या स्पर्धेतील हे तिसरे कांस्य पदक आहे. तिने २०१२ आणि २०१५मध्ये कांस्यपदकाची कमाई केली.

एफडीआयमध्ये १८ टक्क्यांची वाढ

  • देशात २०१६मध्ये थेट विदेशी गुंतवणूक १८ टक्क्यांनी वाढून ४६ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. आधीच्या वर्षांत ती ३९.३२ अब्ज डॉलर होती.
  • भारतातील सेवा, दूरसंचार, व्यापार, माहिती तंत्रज्ञान, वाहन क्षेत्राला विदेशी गुंतवणूकदारांनी पसंती दिल्याने यंदा थेट विदेशी गुंतवणूक वाढली आहे.
  • थेट विदेशी गुंतवणुकीबाबतचे काही नियम केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये शिथिल केले आहेत.
  • त्यामुळे सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड, जपान आदी देशांतून जास्त विदेशी निधीचा ओघ आला आहे.
  • २०१६ मध्ये ऑक्टोबर महिन्यात थेट विदेशी गुंतवणूक सर्वाधिक, तर मेमध्ये ती वर्षांतील किमान राहिली आहे.

मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर

  • न्यू वर्ल्ड वेल्थच्या ने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे. संपत्तीमध्ये मुंबई पाठोपाठ दिल्ली दुसऱ्या तर, बंगळुरु तिसऱ्या स्थानावर आहे.
  • सध्याच्या घडीला मुंबईमध्ये ८२० अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती आहे. मुंबईमध्ये ४६ हजार कोटयधीश आणि २८ अब्जाधीश राहतात.
  • दिल्लीची एकूण संपत्ती ४५० अब्ज डॉलर असून, २३ हजार कोटयधीश आणि १८ अब्जाधीश दिल्लीमध्ये राहतात.
  • बंगळुरुची एकूण संपत्ती ३२० अब्ज डॉलर्स असून बंगळुरुमध्ये ७,७०० कोटयधीश आणि ८ अब्जाधीश राहतात.
  • त्याखालोखाल या यादीमध्ये हैदराबाद (३१० अब्ज डॉलर), कोलकाता (२९० अब्ज डॉलर), पुणे (१८० अब्ज डॉलर), चेन्नई (१५० अब्ज डॉलर) व गुरगाव (११० अब्ज डॉलर) या शहरांचाही समावेश आहे.
  • डिसेंबर २०१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एकूण २.६४ लाख कोटयधीश आणि ९५ अब्जाधीश असून देशातील एकूण संपत्ती ६.२ लाख कोटी डॉलर आहे.

चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी

डॉ. अभय बंग यांना जनसेवा पुरस्कार

  • ‘श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट’च्यावतीने देण्यात येणारा ‘नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शोधग्राम संस्थेचे संस्थापक महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग यांना जाहीर झाला आहे.
  • २८ फेब्रुवारी रोजी बंग यांना हा पुस्कार रयत शिक्षण संस्था, साताऱ्याचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते प्रदान केला जाणार आहे. 
  • २१ हजार रुपये रोख व मानपत्र, सन्माचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • याशिवाय रुग्णांना मदत करणाऱ्या दानोळी (ता. शिरोळ) येथील सुकुमार पाटील यांनाही विशेष सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 डॉ. अभय बंग यांच्याबद्दल 
  • अभय बंग यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० रोजी वर्धा येथे झाला. त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली.
  • १९८४मध्ये त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी सुवर्णपदकासह मिळवली.
  • त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
  • डॉ. अभय बंग हे त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांच्यासमवेत सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात.
  • विचारी आणि शांत स्वभाव हे अभय बंग यांचे वैशिष्ट्य आहे आणि कामाचा झपाटा हे राणी बंग यांचे वैशिष्ट्य आहे.
  • त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी, स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न, नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना या विषयांवर कार्य व संशोधन केले आहे.
  • बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरले जाते.
  • अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला आहे. यामुळे ग्रामीण स्त्रिया देखील न्युमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उपचार करू शकतात.
  • नवजात बालकाच्या श्वासांची वारंवारता या उपकरणाच्या साहाय्याने बालक धोकादायक अवस्थेत आहे का हे शोधता येते.
  • त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
  • गडचिरोली जिल्ह्याच्या कुपोषणावर व नवजात अर्भकांच्या मृत्यूवर डॉ. अभय बंग व डॉ.राणी बंग यांनी लिहिलेला ‘कोवळी पानगळ’ हा शोधप्रबंध खूप गाजला होता. हा शोधप्रबंध ‘लॅन्सेट’ या मानाच्या वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाला होता.
  • या शोधप्रबंधामुळे केवळ राज्य व देशाच्याच शासनाला नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यू.एच.ओ) आपले आरोग्याविषयी धोरण बदलावे लागले होते.
  • डॉ. अभय बंग व राणी बंग यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी देण्यात आली असून महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत.

    व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत निवडक प्रसारमाध्यमांना बंदी

    • अमेरिकेच्या व्हाइट हाऊसने अनौपचारिक (ऑफ कॅमेरा) घडामोडींच्या वार्तांकनास काही प्रमुख वृत्तपत्रे, वाहिन्या व वृत्तसंस्था यांना बंदी घातली आहे.
    • व्हाइट हाऊसने आमंत्रित केलेल्या निवडक गटांच्या पत्रकारांमध्ये बीबीसी, दि न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, दि गार्डियन, दि लॉसएंजल्स टाइम्स, पॉलिटिको ई. यांना मनाई करण्यात आली होती.
    • व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव सीन स्पायसर यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. अनौपचारिक पत्रकार परिषद व्हाइट हाऊसच्या ब्रीफिंग रूममध्ये घेण्यात आली.
    • प्रतिबंधित वृत्तपत्रे व वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा समावेश निमंत्रितात नाही असे सांगून त्यांना बाहेरच रोखण्यात आले.
    • निमंत्रित करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये केवळ एबीसी, फॉक्स न्यूज, ब्रेटबार्ट न्यूज, रॉयटर्स आणि वॉशिंग्टन टाईम्स या वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
    • अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्सच्या वार्षिक कार्यक्रमात प्रसारमाध्यमांवर टीका करताना, प्रसारमाध्यमेच अमेरिकी जनतेची खरी शत्रू असल्याचा आरोप केला होता.
    • विशेषत: अध्यक्षीय निवडणुकीमधील प्रचारादरम्यान ट्रम्प यांचे सहकारी हे रशियन गुप्तचर खात्याच्या संपर्कात होते, अशा आशयाच्या देण्यात आलेल्या वृत्तामुळे ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
    • ट्रम्प प्रशासन व प्रसारमाध्यमे यांच्यातील तणाव टोकाला गेला असून व्हाईट हाऊसकडून घेण्यात आलेला हा निर्णय नव्या वादळाचे लक्षण मानले जात आहे.

    शाहरुख खानला नॅशनल यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड

    • प्रसिध्द अभिनेता शाहरुख खानला जेष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या हस्ते नॅशनल यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.
    • सिनेसृष्टीतील असामान्य योगादानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. १० लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
    • टी. सुब्बरामी रेड्डी फाउंडेशन, अनु आणि शशी रंजन यांच्या सहकार्याने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
    • अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि रेखा नंतर ह्या पुरस्काराचा मानकरी ठरणारा शाहरुख चौथा बॉलिवूड कलाकार झाला आहे. 
    • शाहरूख खान यांच्या करिअरला आकार देण्यात यश चोप्रा यांचा मोठा वाटा आहे. यश चोप्रा यांच्या यांनी दिग्दर्शित केलेल्या जब तक है जान या शेवटच्या चित्रपटात शाहरुख खानने मुख्य कलाकार म्हणून भूमिका केली होती.
    • यशजींच्या डर, दिल तो पागल है, वीर-झारा या सिनेमांतही शाहरुख खानने काम केलेले आहे.

    चालू घडामोडी : २५ फेब्रुवारी

    ‘रायरंद’चा नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरव

    • दिग्दर्शक रमेश पोपट ननावरे व लेखक आशिष अशोक निनगुरकर यांच्या ‘रायरंद’ या चित्रपटाला नोएडा येथे संप्पन झालेल्या चौथ्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक्सलन्स पुरस्कार मिळाला.
    • या चित्रपटाचे खास स्क्रीनिंगही नोएडा येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. चित्रपटाला नोएडा रसिकांची प्रचंड दाद मिळाली.
    • न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या ‘रायरंद’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नगर जिल्ह्यात झाले असून जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी या चित्रपटात अभिनय केला आहे.
    • ‘रायरंद’ या चित्रपटात बहुरूपी बालमजुरांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात एका लोककलावंत बहुरूपी माणसाची गोष्ट मांडण्यात आलेली आहे.
    • श्रीरामपूरचे कलावंत श्यामकुमार श्रीवास्तव यांनी मुख्य ‘रायरंद’ची भूमिका साकारली आहे. अभिनेता आनंद वाघ यांनी या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे.
    • आशिष निनगुरकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. गीतलेखन भावेश लोंढे व आशिष निनगुरकर यांचे आहे. लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

    शंकराच्या ११२ फुटांच्या मूर्तीचे अनावरण

    • महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोईम्बतूरमध्ये ११२ फुटांच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण केले आहे. ‘आदियोगी’ असे या शिवप्रतिमेचे नाव आहे.
    • ईशा फाउंडेशनतर्फे भगवान शंकराच्या ११२ फूट उंच मूर्तीची उभारणी करण्यात आली आहे. ही मूर्ती स्टीलचे तुकडे जोडून तयार करण्यात आली आहे.
    • तसेच, येथील नंदीची मूर्ती तिळाचे बी, हळद, भस्म आणि रेती तसेच मातीपासून बनविण्यात आली आहे.
    • भगवान शंकराच्या भव्यदिव्य मूर्तीचे अनावरण करताना पंतप्रधान मोदींनी योग करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
    • ईशा फाऊंडेशनकडून लवकरच देशाच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या मूर्ती उभारण्यात येणार आहेत.
    • कोईम्बतूरमधील शंकराची मूर्तीचे डिझाईन तयार करण्यात अडीच वर्षांचा कालावधी लागला आहे. आठ महिन्यांमध्ये या मूर्तीची उभारणी करण्यात आली.
    • या मूर्तीचा भगवान शंकराचा चेहरा स्टिलच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. या मूर्तीचे वजन ५०० टन इतके आहे.
    • ईशा फाउंडेशनचे संस्थापक: योगगुरु जग्गी वासुदेव

    नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ केनेथ अ‍ॅरो यांचे निधन

    • आपल्या सिद्धांतांनी विमा, वैद्यकीय सुविधा, शेअर बाजार या संकल्पनांतील अर्थकारण बदलून टाकणारे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ केनेथ जोसेफ अ‍ॅरो यांचे २१ फेब्रुवारी २०१७ रोजी निधन झाले.
    • त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९२१ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून गणितात एम.ए. पदवी घेतली.
    • १९५१मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली, त्यात त्यांनी समाजाने निवडलेले पर्याय व व्यक्ती निवडत असलेले पर्याय यांचा संबंध दाखवला आहे.
    • अर्थशास्त्रात संशोधन करताना त्यांनी सामाजिक न्याय व त्याबाबतचे पर्यायी मार्ग यावर भर दिला.
    • पदवी अभ्यास करीत असताना त्यांनी युद्धकाळात हवामान संशोधक म्हणून व एअर कोअर कॅप्टन म्हणून काम केले.
    • नंतर त्यांनी रॅण्ड कॉर्पोरेशनमध्ये व हार्वर्ड विद्यापीठात अध्यापक म्हणूनही काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठात त्यांनी ११ वर्षे अध्यापनाचे काम केले. 
    • दैनंदिन व्यवहारातील आर्थिक समस्यांवर त्यांनी मोठे योगदान दिले. त्यात विमा, आरोग्यसेवा व हवामान बदल यांचा समावेश होता.
    • त्यांनी इकॉनॉमिस्टस स्टेटमेंट ऑन क्लायमेंट चेंज पुस्तकाचे सहलेखन केले होते, त्यात त्यांनी हवामान बदलांच्या धोक्याबाबत इशारा दिला होता.
    • सोशल चॉइस अ‍ॅण्ड इंडिव्हिज्युअल व्हॅल्युज या पुस्तकात त्यांनी बहुमताच्या मतदान नियमांतील फोलपणा दाखवून दिला होता, त्यात शेवटी अनपेक्षित निकाल कसा लागतो याचे विवेचन केले.
    • अ‍ॅरो यांना १९७२मध्ये ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन हिक्स यांच्यासमवेत नोबेल मिळाले होते. बाजारपेठ अर्थशास्त्रातील सर्वसाधारण समतोलाचे विवेचन त्यांनी ग्राहक व उत्पादक यांच्यातील अन्योन्यसंबंधातून दाखवले होते.
    • अर्थशास्त्रातील अमेरिकेचे पहिले नोबेल विजेते पॉल सॅम्युअलसन यांनी अ‍ॅरो हे विसाव्या शतकातील महान अर्थशास्त्रज्ञ असल्याचे म्हटले होते.

    महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक २०१७

    • महाराष्ट्रात १० महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये झालेल्या आणि ‘मिनी विधानसभा’ म्हणून गणल्या जाणाऱ्या निवडणुकांचे निकाल २३ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले.
    • लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आलेली राजकीय परिवर्तनाची लाट दोन अडीच वर्षानंतरही कायम असल्याचे राज्यातील निवडणूक निकालावरून दिसून आले.
    • यामध्ये सर्वाधिक ४११ जागा जिंकून भाजप राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून गतवेळी क्रमांक एकवर असलेल्या राष्ट्रवादीला ३५९ जागांवर समाधान मानावे लागले.
    • राज्यातील दहापैकी बहुतांश महापालिकांमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून उर्वरित महापालिकांमध्ये भाजप निर्णायक भूमिकेत आहे. 
    • जिल्हा परिषदांमध्ये संख्याबळाचा विचार करता काँग्रेस-राष्ट्रवादीला २५ पैकी ११ तर शिवसेना-भाजपाला १३ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी आहे.
    • गतवेळी जिल्हा परिषदांमध्ये क्रमांक एकवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बीड, पुणे आणि सातारा या तीनच जिल्हा परिषदांमध्ये सत्ता राखता आली.
     निवडणूक निकाल २०१७ 
    महानगरपालिका
    महापालिका शिवसेना भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी मनसे इतर
    मुंबई (२२७) ८४ ८२ ३१ १४
    ठाणे (१३१) ६७ २३ ३४
    पुणे (१६२) १० ९८ ११ ४०
    पिंपरी चिंचवड (१२८) ०९ ७६ ३७ ०१
    नागपूर (१५१) १०८ २९ ११
    नाशिक (१२२) ३५ ६६ ०६ ०६ ०५
    सोलापूर (१०२) २१ ४९ १४ ०४ १४
    अमरावती (८७) ४५ १५ २०
    उल्हासनगर (७८) २५ ३३ १५
    अकोला (८०) ४८ १३

    जिल्हा परिषदा
    जिल्हा परिषद शिवसेना भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी मनसे इतर
    पुणे (७५) १३ ४४
    अहमदनगर (७२) १४ २३ १८ १०
    औरंगाबाद (६२) १९ २३ १६
    जालना (५६) १४ २२ १३
    परभणी (५४) १३ २४
    बीड (६०) १९ २५
    हिंगोली (५२) १५ १० १२ १२
    नांदेड (६३) १० १३ २८ १०
    उस्मानाबाद (५५) ११ १३ २६
    लातूर (५८) ३६ १५
    जळगांव (६७) १४ ३३ १६
    नाशिक (७३) २५ १५ १९
    कोल्हापूर (६७) १० १४ १४ ११ १८
    सांगली (६०) २५ १० १४
    सातारा (६४) ३९
    रत्नागिरी (५५) ३९ १५
    सिंधुदूर्ग (५०) १६ २७
    रायगड (५९) १८ १२ २३
    अमरावती (५९) १४ २७ ११
    बुलडाणा (६०) १० २४ १३
    यवतमाळ (६१) २० १८ ११ ११
    वर्धा (५२) ३१ १३
    चंद्रपूर (५६) ३३ २०
    गडचिरोली (५१) २० १५ ११
    सोलापूर (६८) १५ २३ २३

    चालू घडामोडी : २४ फेब्रुवारी

    शस्त्र आयातदारांच्या यादीत भारत प्रथम स्थानी

    • स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मागील पाच वर्षांमध्ये जगभरात शस्त्र व्यापारात मोठी वाढ झाली असून, प्रमुख शस्त्र आयातदारांच्या यादीत भारत प्रथम क्रमांकावर आहे.
    • २०१२ ते २०१६ या कालावधीत झालेल्या शस्त्र आयातीमध्ये एकट्या भारताचा वाटा १३ टक्के होता.
    • चीन आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांबरोबर तणावाचे संबंध असल्याने भारताने आपली लष्करी ताकद वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.
    • भारतानंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, चीन आणि अल्जेरिया या देशांचा क्रमांक लागतो.
    • २००७ ते २०११ या काळातही या यादीत भारतच प्रथम क्रमांकावर होता. त्या वेळी एकूण शस्त्र आयातीमध्ये भारताचा वाटा ९.७ टक्के होता.
    • बहुतेक आखाती देश येमेन, सीरिया आणि इराकमधील संघर्षामध्ये गुंतले असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र आयात केली जाते.
    • गेल्या पाच वर्षांमध्ये सौदी अरेबियाच्या शस्त्र आयातीमध्ये सुमारे २१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण आयातीमध्ये त्यांचा वाटा ८.२ टक्के आहे.
    • ‘मेक इन इंडिया’ स्थानिक पातळीवरच शस्त्रनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला, तरी लष्कराच्या गरजा तातडीने पुरविण्याची स्थानिक बाजारामध्ये तूर्त क्षमता नाही. त्यामुळे अत्याधुनिक शस्त्रांच्या गरजांसाठी भारताला अजूनही आयातीवर भर द्यावा लागत आहे.

    भारती एअरटेलकडून टेलिनॉरचे अधिग्रहण

    • दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेलने २४ फेब्रुवारी रोजी याच क्षेत्रातील छोट्या गटातील टेलिनॉरच्या भारतातील व्यवसाय खरेदीचा व्यवहार पूर्ण केला आहे.
    • लूप (पूर्वाश्रमीची बीपीएल मोबाइल) खरेदीनंतरचा भारती एअरटेलचा हा व्यवहार दूरसंचार क्षेत्रातील दुसरे मोठे अधिग्रहण आहे.
    • नॉर्वेस्थित टेलिनॉर समूहाने २००८मध्ये उत्तर भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील युनिटेकच्या सहकार्याने भारतीय दूरसंचार क्षेत्रात शिरकाव केला होता.
    • नंतर २जी ध्वनिहरी घोटाळ्यामुळे टेलिनॉर कालांतराने मर्यादित व्यवसायासह स्वतंत्र कंपनी म्हणून दूरसंचार व्यवसाय करू लागली.
    • भारती एअरटेलची भारती एंटरप्राईजेस व टेलिनॉर इंडिया कम्युनिकेशन्स यांच्या दरम्यान हा करार नवी दिल्लीत झाला आहे. यानुसार टेलिनॉरकडे असलेले ध्वनिलहरी परवाने, कर्मचारी आता भारती एअरटेलच्या ताब्यात येणार आहेत.
    • भारती एअरटेलची स्पर्धक असेलेल्या व्होडोफोनचे आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलरमध्ये विलीनीकरण होण्याची प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे.
    • तसेच अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्सने काही दिवसांपूर्वीच एअरसेलचा दूरसंचार व्यवसाय खरेदी केला.

    पूजा घाटकरला नेमबाजी वर्ल्डकपमध्ये कांस्यपदक

    • भारताची नेमबाज पूजा घाटकर हिने नेमबाजीच्या वर्ल्डकपमध्ये दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे.
    • गगन नारंगच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या पुजाने स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत २२८.८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
    • तर चीनच्या मेंगयावो शी हिने २५२.१ गुणांसह नव्या विक्रमाची नोंद करत सुवर्णपदकाची कमाई केली. तिची सहकारी डोंलिजी हिने २४८.९ गुणांसह रौप्यपदक पटकविले.
    • आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केलेल्या पूजा घाटकर हिचे वर्ल्डकप स्पर्धेतील हे पहिले पदक आहे.

    स्कॉटलंड यार्डच्या प्रमुखपदी क्रेसिडा डिक

    • स्कॉटलंड यार्ड अर्थात लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलीस सर्व्हिस या जगद्विख्यात पथकाच्या प्रमुखपदी क्रेसिडा डिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    • सुमारे १८७ वर्षांनंतर क्रेसिडा डिक यांच्या रूपाने स्कॉटलंड यार्डचे नेतृत्व एका महिलेकडे आले आहे. सध्या परराष्ट्र आणि राष्ट्रकुल खात्यात त्या अधिकारी होत्या.
    • स्कॉटलंड यार्डमध्ये १९८३ साली वयाच्या २३व्या वर्षी  क्रेसिडा यांचा समावेश ऑफिसर म्हणून झाला, तोवर या पथकात एकही महिला अधिकारी नव्हती.
    • ऑक्सफर्डमध्येच शिक्षण झालेल्या क्रेसिडा यांनी केम्ब्रिजमध्ये गुन्हेशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास पूर्ण करून २००१मध्ये त्यांनी आणखी मोठी पदे मिळविली.
    • दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखपद (२०१४पर्यंत) सांभाळताना त्यांनी गुन्हे उकलून काढणे, पुरावे जमा करणे आणि गुन्हेगारांना पकडून कायद्यानुसार शिक्षा भोगण्यास भाग पाडणे, ही पोलिसी कौशल्ये त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहेत.

    आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन पुरस्कार २०१६

    • आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात हॉकीच्या इतिहासात प्रथमच सर्वोत्तम खेळाडू, गोलरक्षक, उदयोन्मुख खेळाडू, प्रशिक्षक व पंच यांचा गौरव करण्यात आला.
    • यावेळी बेल्जियमचा कर्णधार व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जॉन डोहमेन आणि नेदरलँडसची नाओमी वॅन अस यांना २०१६ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
    • भारताचा कर्णधार व गोलरक्षक पी आर श्रीजेश व हरमनप्रीत सिंग यांची नावे अनुक्रमे वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक व उदयोन्मुख खेळाडू या पुरस्कारांसाठी नामनिर्देशित करण्यात आली होती. पण दोघांनाही हे पुरस्कार मिळाले नाहीत.
    • आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष: नरिंदर बात्रा (भारत)
    पुरस्कारांची यादी
    पुरस्कार खेळाडू (देश)
    सर्वोत्तम खेळाडू (पुरुष) जॉन डोहमेन (बेल्जियम)
    सर्वोत्तम खेळाडू (महिला) नाओमी वॅन अस (नेदरलँडस)
    सर्वोत्तम गोलरक्षक (पुरुष) डेव्हिड हर्टे (आयर्लंड)
    सर्वोत्तम गोलरक्षक (महिला) मॅडी हिन्च (ग्रेट ब्रिटन)
    उदयोन्मुख खेळाडू (पुरुष) आर्थर वॅन डोरेन (बेल्जियम)
    उदयोन्मुख खेळाडू (महिला) मारिया ग्रॅनाटो (अर्जेंटिना)
    सर्वोत्तम प्रशिक्षक (पुरुष) डॅनी केरी (ग्रेट ब्रिटन)
    सर्वोत्तम प्रशिक्षक (महिला) कॅरेन ब्राऊन (ग्रेट ब्रिटन)
    सर्वोत्कृष्ट पंच (पुरुष) ख्रिस्टियन ब्लाश (जर्मनी)
    सर्वोत्कृष्ट पंच (महिला) लॉरिन डेन फोर्ज (बेल्जियम)

    उसेन बोल्टला चौथ्यांदा लॉरियस पुरस्कार

    • जमैकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्टने ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकून ‘लॉरियस स्पोर्टसमन ऑफ द इअर’ पुरस्कार पटकावला.
    • बोल्टला चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाला असून, महिला गटात जिम्नॅस्ट सिमोन बिल्सला हा पुरस्कार मिळाला.
    • रिओ ऑलिम्पिकमध्ये बोल्टने तीन सुवर्णपदके मिळवली. या कामगिरीची दखल घेऊन त्याला चौथ्यांदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    • क्रीडा क्षेत्रातील ऑस्कर म्हणून लॉरियस पुरस्कार ओळखले जातात. याआधी बोल्टने २००९, २०१० आणि २०१३साली हा पुरस्कार मिळवला आहे.
    • याबरोबरच चार पुरस्कार मिळवणारे रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स आणि केली स्लॅटर यांच्या पंक्तीत बोल्ट जाऊन बसला आहे.
     इतर पुरस्कार विजेते 
    • स्पोर्टसवूमन ऑफ द इअर: सिमोन बिल्स (१९ वर्षीय जिम्नॅस्ट सिमोनने रिओ ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदके आणि एक ब्राँझपदक मिळवले.)
    • कमबॅक ऑफ द इअर: मायकेल फेल्प्स (जलतरणपटू फेल्प्सने २०१२च्या ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेतली होती. पण २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करून पाच सुवर्णपदके मिळवली.)
    • ब्रेकथ्रू ऑफ द इअर: निको रॉसबर्ग (फॉर्म्युला वन चॅम्पियन रॉसबर्गला २०१४ आणि २०१५मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अखेर गेल्या वर्षी त्याने विजेतेपद पटकावले.)
    • लॉरियस स्पोर्टस फॉर गूड अवार्ड: ऑलिम्पिक रेफ्यूजी संघ.

    चालू घडामोडी : २३ फेब्रुवारी

    सामान्य लोकांसाठीच्या अंत्योदय एक्स्प्रेसचे अनावरण

    • कुशनयुक्त खुर्च्या व एलईडी दिवे अशा सुविधा असलेली ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ या सामान्य लोकांसाठीच्या नव्या संपूर्णपणे अनारक्षित गाडीचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २२ फेब्रुवारी रोजी अनावरण केले.
    • खास करून तयार करण्यात आलेले रंगीत डबे असलेली ही गाडी वर्दळीच्या मार्गावर चालवली जाणार आहे.
    • पहिली अंत्योदय एक्स्प्रेस मुंबई ते टाटानगर आणि दुसरी गाडी एर्नाकुलम व हावडादरम्यान धावणार आहे.
    • चार प्रकारच्या नव्या प्रवासी गाड्या सुरू करण्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात (२०१६-१७) करण्यात आली होती. यापैकी हमसफर एक्स्प्रेस सुरू झाली असून आता अंत्योदय सुरू होत आहे.
    • या गाडीतील डब्यांमध्ये वॉटर प्युरिफायर, मोबाइल फोनसाठी चार्जिग पॉइंट्स आणि अग्निशमन उपकरणे यांसारख्या अनेक सोयी आहेत.
    • ‘अंत्योदय’ ही ‘आम आदमी’करिता (सामान्य माणूस) असलेली गाडी आहे. तिच्या डब्यांमध्ये देण्यात आलेल्या सोयी प्रथम श्रेणीच्या डब्यासारख्या आहेत.
    • या नव्या अनारक्षित गाडीचे भाडे मेल/एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

    राजेश गोपीनाथन टीसीएसचे नवे सीईओ आणि एमडी

    • टाटा समूहाची ‘ब्ल्यू आईड’ कंपनी टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदी राजेश गोपीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    • टीसीएसचे माजी सीईओ नटराजन चंद्रशेखरन ऊर्फ एन चंद्रा यांनी २१ फेब्रुवारी रोजी टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या टीसीएसच्या सीईओपदी गोपीनाथन यांची निवड झाली.
    • गोपीनाथन यांनी १६ वर्षांपूर्वी २००१मध्ये टीसीएसमधील आपली कारकीर्द सुरू यावेळी टीसीएस अन्य कंपन्यांकरिता इंटरनेट ब्राऊजिंगकरिता सोफ्टवेअर तयार करून देत होती.
    • अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेतून (आयआयएम) त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण, एनआयटीमधून इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्सची अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे.
    • गोपीनाथन २०१३मध्ये कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी झाले. प्रकल्प, धोरण, विपणन, विदेशातील व्यवसाय असे सारे व्यवहार त्यांनी टीसीएसमध्ये हाताळले आहेत.
    • १६.५ अब्ज डॉलरची टीसीएस ही देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. लाभांशरूपात मुख्य प्रवर्तक टाटा सन्सला मोठा लाभ मिळवून देणारी ही कंपनी आहे.

    आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

    • ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या लघुकथा संग्रहासाठी २०१६चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    • त्यांच्या ‘आलोक’ या लघुकथा साहित्याला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.
    • या लघुकथेमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली त्यामध्ये आलेले व्यापक परिवर्तन हे सशक्त तसेच वस्तुनिष्ठरीत्या प्रस्तुत केलेले आहे.
    • यामध्ये गावातील लोकभाषा, स्थानिक परपंरा अतिशय अलगदपणे मांडली आहे. यासह ग्रामीण लोकांना येणाऱ्या जटीलतेविषयीही सांगण्यात आले आहे.
    • आसाराम लोमटे यांनी मराठी साहित्यात डॉक्टरेट केले आहे. लोमटे यांचे ‘इडा पिडा टळो’, ‘आलोक’, ‘धूळपेर’ हे तीन लघुकथा संग्रह प्रकाशित झाले आहेत.
    • त्यांच्या लिहिलेल्या कथा या पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अभ्यासक्रमात आहेत.
     मिलिंद चंपानेरकर यांना साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 
    • याव्यतिरिक्त ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला २०१६चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला.
    • सईद अख्तर मिर्झा यांच्या ‘एम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर’ या इंग्रजीतील आत्मकथेचा चंपानेरकर यांनी मराठीत अनुवाद केला आहे.
    • जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१४ दरम्यानच्या काळात अनुवाद झालेल्या पुस्तकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.

    पृथ्वीच्या आकाराच्या सात ग्रहांचा शोध

    • सूर्यमालेबाहेर पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रहांचा समूह असण्याचा दावा अमेरिकेच्या नासातील खगोलशास्त्रज्ञांनी केला असून, या ग्रहांवर पाणी आणि त्यामुळे जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
    • या दाव्यामुळे खगोल शास्त्रातील संशोधनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. सौरमालेबाहेरील संशोधनालाही यामुळे गती मिळू शकते.
    • स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे नासाने हा शोध लावला असून, सूर्यमालेबाहेर एकाच वेळी एवढ्या संख्येने ग्रह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
    • सूर्यमालेबाहेर असल्याने या ग्रहांना एक्सोप्लॅनेट्स असे नाव दिले गेले आहे. याआधी अशा पद्धतीने पृथ्वी आणि भोवतीच्या ग्रहांसारखीच रचना असलेला ग्रहांचा समूह आढळून आला नव्हता.
    • सौरमालेपासून या नव्या ग्रहांच्या समूहाचे अंतर ४० प्रकाशवर्षे दूर असून, या ग्रहांची रचनाही पृथ्वीसारखीच असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
    • या सात ग्रहांपैकी तीन ग्रहांवर पाण्याची स्रोत आढळून आले आहेत. या सहाही ग्रहांवरील तापमान अत्यंत थंड किंवा अत्यंत उष्ण नाही. त्यामुळे तिथे पाण्याचे अस्तित्व असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
    • सात पैकी पाच ग्रहांचा आकार अगदी पृथ्वी इतकाच आहे. तर उर्वरित दोन ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहेत.

    चालू घडामोडी : २२ फेब्रुवारी

    प्रदूषित शहरांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर

    • देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर आणि पुणे यांच्यासह एकूण सतरा शहरांचा समावेश आहे.
    • २०११ ते २०१५ दरम्यानच्या कालावधीमध्ये केलेले सर्वेक्षण आणि चाचण्यांमधून राज्यातील सतरा शहरांमधील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर (पीएम १०) या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा किती तरी अधिक असल्याचे आढळून आले आहे.
    • याशिवाय पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये पीएम १० बरोबरच नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ२) याही प्रदूषक घटकाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक आहे.
    • केंद्रीय प्रदूषण नियत्रंण मंडळाने हे सर्वेक्षण केले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पावले टाकण्याच्या सूचना या शहरांना करण्यात आल्या आहेत.
    • केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’चे वार्षिक सरासरी प्रमाण ६० आणि नायट्रोजन डॉयऑक्साइडचे वार्षिक सरासरी प्रमाण ४०पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहरे म्हटले जाते.
    • राज्यातील सतरा शहरांमध्ये २०११ ते २०१५ या कालावधीमध्ये पीएम १० आणि एनओ२चे प्रमाण सातत्याने या पातळीपेक्षा अधिक राहिले आहे.
     इतर राज्यांची परिस्थिती 
    • यात महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातील पंधरा, पंजाबमधील आठ, हिमाचल प्रदेशामधील सात शहरांचा समावेश आहे.
    • याउलट औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामध्ये महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या गुजरातमधील फक्त सूरत, तामिळनाडूमधील फक्त तुतीकोरीन या शहरांचा यात समावेश आहे.
    • कर्नाटकातील चार (बंगळुरू, गुलबर्गा, दावणगिरी, हुबळी- धारवाड) आणि आंध्र प्रदेशातील पाच शहरे (गुंटूर, कर्नूल, नेल्लोर, विजयवाडा आणि विशाखापट्टणम) प्रदूषित आहेत.
    • महाराष्ट्रातील सतरा प्रदूषित शहरे : अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, उल्हासनगर

    भारतासाठी मायक्रोसॉफ्टचे स्काईप लाईट व प्रोजेक्ट संगम उपक्रम

    • मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी भारतीयांसाठी आधारशी संलग्न स्काईप लाईट सेवा तसेच प्रोजेक्ट संगम हा उपक्रम सुरु करण्याची घोषणा केली आहे.
    • नाडेला यांनी भारतातील कंपन्यांसाठी क्लाऊड कॉम्प्यूटींग सुविधेची माहिती दिली. याशिवाय भारतासाठी लिंक्डइन लाईट हे व्हर्जनही सुरु केले जाणार असल्याची माहिती दिली.
    • नाडेला यांनी ९९ डॉट्स या उपक्रमाचीही माहिती दिली. या उपक्रमामुळे डॉक्टरांना क्षयरोग झालेल्या रुग्णांशी संवाद साधणे सोपे झाल्याचे ते म्हणालेत.
    • मायक्रोसॉफ्टने मध्यम आणि लघु उद्योग तसेच सरकारी कामकाजांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे.
    • या कार्यक्रमांतर्गत कंपन्यांच्या समस्यांपासून ते सामाजिक समस्यांपर्यंत सर्वावर तंत्रज्ञानाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
     स्काइप लाइट अ‍ॅप 
    • स्काइप लाइट हे कमी बँडविड्थवर काम करणारे जलद आणि इंटिग्रेटेड कम्युनिकेशन्स अ‍ॅप खास भारतासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
    • या अ‍ॅपमध्ये आपल्याला मोबाइलमधील कॉल डायलर, लघुसंदेश, स्काइप डायलर या सर्व गोष्टी एकत्रितच पाहता येणार आहे.
    • मोबाइल डेटा आणि वाय-फायच्या माध्यमातून अ‍ॅपचा वापर किती झाला आहे याचा तपशीलही या अ‍ॅपमध्ये दिसणार आहे.
    • तसेच आपल्याशी संवाद साधण्यासाठी यामध्ये विविध बॉट्स देण्यात आले आहेत. या बॉट्सच्या माध्यमातून लोकांना विविध विषयांची माहिती मिळू शकणार आहे. तर बॉटसोबत गप्पाही मारता येणार आहे.
    • हे नवीन अ‍ॅप डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून त्याची आधारशी संलग्नता जून २०१७पर्यंत पूर्ण होणार आहे.
    • हे अ‍ॅप गुजराती, बंगाली, हिंदी, मराठी, तामीळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
     प्रोजेक्ट संगम अ‍ॅप 
    • लिंक्डइन या अ‍ॅपची लाइट आवृत्ती म्हणजे प्रोजेक्ट संगम होय. यामध्ये कुशल कामगारांना नोकरी मिळण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे.
    • तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
    • लिक्डइनच्या रोजगार शोधक व्यासपीठाच्या शक्तीचा वापर करत कौशल्य विकास कार्यक्रमांना थेटपणे संबंधिक रोजगारांशी जोडणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे.

    तेलंगण मुख्यमंत्र्यांकडून वेंकटेश्वराला कोट्यावधींचे दागिने अर्पण

    • तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिरुपती मंदिरातील वेंकटेश्वराच्या चरणी साडेपाच कोटींचे दागिने अर्पण केल्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.
    • तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी चंद्रशेखर राव यांनी तिरुपतीच्या मंदिरात नवस बोलला होता.
    • राव यांनी वेंकटेश्वराला अर्पण केलेल्या दागिन्यांच्या यादीत शालिग्राम हार आणि मखर कंठाभरणम या बहुपदरी हाराचा समावेश आहे. बालाजी आणि पद्मावती यांच्यासाठी हे दागिने दिले आहेत.
    • या सर्व दागिन्यांचे वजन अंदाजे १९ किलो इतके आहे. या सगळ्या अलंकारांची किंमत सुमारे पाच कोटी आहे.
    • जून २०१४ मध्ये आंध्रप्रदेशपासून तेलंगणा वेगळे झाल्यानंतर चंद्रशेखर राव यांनी पहिल्यांदाच तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट दिली आहे.
    • आपले वैयक्तिक नवस पुर्ण करण्यासाठी सार्वजनिक निधीमधील पैशाचा अपव्यय केला जात असल्याची टीका राव यांच्यावर होत आहे.
    • ऑक्टोबर २०१६मध्ये चंद्रशेखर राव यांनी वारंगल येथील भद्रकाली मंदिरात ११ किलोचा सोन्याचा मुकूट भेट दिला होता. ज्याची किंमत ३.५ कोटी रुपये होती.
    • तसेच यापूर्वी चंद्रशेखर राव यांच्यासाठी तैनात करण्यात आलेली कडेकोट सुरक्षाव्यवस्था अनेकदा चर्चेचा विषय ठरली होती.
    • हैदराबादच्या बेगमपेठ येथे एक लाख चौरस फुटांवर राव यांच्यासाठी भक्कम तटबंदी असलेला राजप्रासाद बांधण्यात आला होता.
    • या घरात राव यांच्यासाठी बुलेटप्रुफ बाथरूमही उभारण्यात आले होते. याशिवाय, घराच्या सर्व खिडक्या व व्हेंटिलेटर्स यांच्यावर बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या आहेत.
    • राज्याच्या सुरक्षा यंत्रणांकडून सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार ही व्यवस्था करण्यात आली होती.
    • या सगळ्यासाठी काही लाख रूपयांची रक्कम खर्ची पडली होती. मात्र, तेलंगण पोलिसांकडून राव यांच्या सुरक्षाव्यवस्थेचे समर्थन करण्यात आले होते.

    दहशतवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी फ्रान्सची गरुडसेना

    • दहशतवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी फ्रान्सच्या लष्कराने गरुडांना प्रशिक्षण दिले आहे. अर्टाग्नन, अथोस, पोर्थोस आणि अरामीस अशी या चार गरुडांची नावे आहेत.
    • गेल्या वर्षभरात या गरुडांच्या पथकाने दहशतवाद्यांचे अनेक ड्रोन नष्ट केले आहेत.
    • प्रशिक्षण दिलेले गरुडांचे पथक जेव्हा आकाशात झेपावते, तेव्हा फ्रान्सच्या लष्कराकडून संपूर्ण मोहिमेवर नियंत्रण मनोऱ्यातून लक्ष ठेवण्यात येते.
    • करण्यात आलेले गरुडांचे पथक २० सेकंदांमध्ये २०० मीटर अंतर कापते. फ्रान्सच्या हवाई दलाकडून गरुडांच्या सर्व मोहिमांवर बारिक लक्ष ठेवले जाते.
    • मागील वर्षी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर फ्रान्सच्या लष्कराने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
    • आकाशात उडणारे ड्रोन टिपणे आणि त्यातही ते जास्त लोकसंख्या असलेल्या भागात टिपणे कठीण असते. त्यामुळे फ्रान्सच्या लष्कराने यासाठी गरुडांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.

    चालू घडामोडी : २१ फेब्रुवारी

    लाचखोरीप्रकरणी ईडीच्या माजी सहसंचालकांना अटक

    • आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणातील आरोपींकडून लाच घेतल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे माजी सहसंचालक जे पी सिंह यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे.
    • सुरतमध्ये २०१५-१६ या कालावधीत हवाला आणि आयपीएलमधील सट्टेबाजीचे रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरु होती.
    • याप्रकरणातील आरोपींकडून ईडीचे माजी सहसंचालक जे पी सिंह यांनी लाच घेतल्याचा आरोप होता. सीबीआयने जे पी सिंह, त्याचे सहकारी संजयकुमार, विमल अग्रवाल आणि चंद्रेश पटेल या तिघांना अटक केली आहे.
    • सिंह यांच्या लाचखोरीप्रकरणी ईडीनेच तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही सिंह यांच्यावर लाच मागितल्याचा तसेच छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.
    • जे. पी. सिंह हे भारतीय महसूल सेवेच्या २०००च्या बॅचचे अधिकारी असून सध्या ते सीमा व उत्पादन शुल्क विभागात आयुक्त म्हणून कार्यरत होते.

    नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी शुरहोझेलाई लिझित्सू

    • नागालँडच्या मुख्यमंत्रिपदासाठी सहमतीचे उमेदवार म्हणून नागालँड पीपल्स फ्रन्टचे (एनपीएफ) अध्यक्ष शुरहोझेलाई लिझित्सू यांची निवड करण्यात आली. ते टी आर झेलियांग यांची जागा घेतील.
    • डेमोक्रॅटिक अलायन्स ऑफ नागालॅण्डच्या (डीएएन) बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून लिझित्सू यांची निवड करण्यात आली. या बैठकीला ५९ आमदार उपस्थित होते. लिझित्सू डीएएनचेही अध्यक्ष आहेत. 
    • झेलियांग यांनी १९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून पुढील व्यवस्था होईपर्यंत राज्याचा कारभार पाहण्यास सांगितले.
     पार्श्वभूमी 
    • नगरपालिका निवडणुकांत ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील, अशी घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर नागालँडमध्ये निदर्शनांना तोंड फुटले होते.
    • विविध संघटना नगरपालिका निवडणुका रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.
    • त्यातच दिमापूर येथे पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण चिघळले होते. परिणामी झेलियांग यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
    • आता नगरपालिका निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया रद्द करा आणि गोळीबारास जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा या दोन्ही मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने केली आहे.

    मुंबईची शरिरसौष्ठवपटू श्वेता राठोडला ‘मिस इंडिया’ किताब

    • इंदौर येथे आयोजित ‘नॅशनल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०१७’ (महिला) स्पर्धेत मुंबईची शरिरसौष्ठवपटू श्वेता राठोडने ‘मिस इंडिया’चा किताब आणि सुवर्ण पदक जिंकले.
    • त्याचबरोबर तिला ‘सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप’च्या ‘स्पोर्ट्स फिजिक’ विभागातदेखील पुरस्कृत करण्यात आले.
    • व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या श्वेताने सलग तिसऱ्या वर्षी ‘मिस इंडिया’ किताब पटाकावून विजयाची हॅट्रिक साधली आहे.
    • ‘एशियन बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिजिक चॅम्पियनशिप २०१५’ स्पर्धेत ‘स्पोर्ट्स फिजिक विभागात’ रजत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला शरिरसौष्ठवपटू आहे.

    हाफिज सईदचा शस्त्रास्त्र परवाना रद्द

    • जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद आणि त्याच्या संघटनेतील सदस्यांना दिलेला शस्त्रास्त्र परवाना पाकिस्तानने रद्द केला आहे.
    • सईद आणि त्याच्या साथीदारांकडे ४४ शस्त्रास्त्रे होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे शस्त्रास्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.
    • मुंबई २६/११ हल्ल्याचा कट रचणाऱ्या हाफिज सईदविरोधात पाकिस्तानने कारवाई करावी यासाठी भारताने पाठपुरावा केला आहे.
    • यापूर्वी पंजाब सरकारने हाफिज सईदला ९० दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय सईद आणि त्याच्या ३७ साथीदारांना परदेशवारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता.
    • तसेच काही दिवसांपूर्वीच हाफिज सईदची नोंदणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत (एटीए) करण्यात आली आहे.
    • जमात उद दवा या संघटनेवर बंदी घातल्यानंतर हाफीज सईद फलाह-इ-इंसानियत या संघटनेच्या माध्यमातून कारवाया सुरु ठेवेल असा अंदाज आहे.

    अमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल मॅकमास्टर

    • मायकेल फ्लिन यांना पदमुक्त केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी लेफ्टनंट जनरल एचआर मॅकमास्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    • रशियन राजदूताशी संपर्क केल्याची टीका झाल्याने ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांना पदावरून हटविण्यात आले होते.
    • नव्याने नियुक्त होत असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एचआर मॅकमास्टर यांनी लष्कराचा इतिहास या विषयावर डॉक्टरेट मिळविली आहे.
    • व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकेचा सहभाग होता हा समज खोटा ठरविणाऱ्या ‘डिरीलिक्शन ऑफ ड्युटी’ या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले आहे.

    आयपीएल लिलावात बेन स्टोक्सला सर्वाधिक भाव

    • इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठीच्या आगामी दहाव्या पर्वासाठीच्या खेळाडूंचा लिलाव बंगळुरूत पार पडला.
    • इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्सला या लिलावात सर्वाधिक १४ कोटी ५० लाखांचा भाव मिळाला. पुणे सुपर जाएंट्स संघाचे गोयंका यांनी बेन स्टोक्सवर सर्वाधिक बोली लावली.
    • त्यापाठोपाठ इंग्लंडच्याच टायमल मिल्स या वेगवान गोलंदाजाला १२ कोटींचा भाव मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टायमल मिल्सला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
    • भारतीय खेळाडूंमध्ये यावेळी युवा क्रिकेटपटू कर्ण शर्मा याच्यावर ३ कोटी २० लाखांची बोली लागली. तर अनिकेत चौधरी यालाही दोन कोटींचा भाव मिळाला.
    आयपीएल लिलावात सर्वाधिक भाव मिळालेले खेळाडू
    खेळाडू संघ किंमत
    बेन स्टोक्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स १४.५० कोटी
    टायमल मिल्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १२ कोटी
    कगिसो रबाडा दिल्ली डेअरडेव्हिल्स ५ कोटी
    ट्रेंट बोल्ट कोलकता नाईट रायडर्स ५ कोटी
    पॅट कमिन्स दिल्ली डेअरडेव्हिल्स ४.५० कोटी

    चालू घडामोडी : २० फेब्रुवारी

    एनपीसीआयकडून भारत क्यूआर कोडप्रणाली सादर

    • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मास्टर कार्ड आणि व्हिसा यांच्या सहकार्याने भारत क्यूआर नावाची नवी कोड प्रणाली विकसित केले आहे. 
    • याद्वारे आता एकच क्विक रिस्पॉन्स म्हणजेच क्यूआर कोडमधून सर्व प्रकारचे पेमेंट करता येणार आहे.
    • सर्वच प्रकारच्या पेमेंट्ससाठी एकच क्यूआर कोड असण्याचा हा जगातील पहिलाच क्यूआर कोड असेल.
    • सध्या वेगवेगळया पेमेंट प्रोव्हायडरचे एकाच दुकानात वेगवेगळे क्यूआर कोड असतात. उदा. सध्या पेटीएमचा व एचडीएफसीचाही क्यूआर कोड हा वेगवेगळा आहे.
    • जर एखाद्याकडे पेटीएमचे मोबाइल वॉलेट असेल तर त्याला पेटीएमचा क्यूआरकोड दाखवावा लागतो. तो क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देता येतात.
    • नव्या व्यवस्थेत दुकानदाराला वेगवेगळया कोडऐवजी एकच कोड काऊंटरवर ठेवावा लागेल. हा नवा कोड भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गर्व्हनर आर. गांधी यांनी सादर केला.
    • या नव्या व्यवस्थेत पाँईट ऑफ सेल (पॉस मशीन) मशीनची गरजच उरणार नसून, फक्त स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे देणे आणि घेणे सोपे होणार आहे.
    • हा कोड संबंधित बँकेच्या मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळू शकतो. या नव्या कोडसाठी दुकानदारांना आपल्या सध्याच्या क्यूआर कोडमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची गरज भासणार नाही.
    • भारत क्यूआरमध्ये बँक खाते, आयएफसी कोड, यूनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि आधारची माहिती देण्याचीही सुविधा उपलब्ध असेल. यामुळे डिजिटल पेमेंट करणे आणखी सोपे जाणार आहे.
    • क्यूआर कोडने पैसे देणे इतर माध्यमांपेक्षा सुरक्षित मानले जाते. त्याचबरोबर ते अत्यंत किफायतशीरही आहे. या व्यवस्थेला ‘पुश पेमेंट’ नावानेही ओळखले जाते.
    • यामध्ये पैसे देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची जबाबदारी व्यापाऱ्याची नव्हे तर ग्राहकांची असते. त्याचबरोबर यामध्ये पिन क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती देण्याची गरज नसते.

    विराट कोहलीचा पुमा कंपनीशी ११० कोटींचा करार

    • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने क्रीडा साहित्य निर्मितीमध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘पुमा’ कंपनीशी ११० कोटींचा करार केला आहे.
    • एकाच कंपनीशी इतक्या मोठ्या रकमेचा करार करणारा विराट पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
    • ‘पुमा’ने विराटसोबत केलेला हा करार आठ वर्षांचा आहे. पुमाने याआधीही अनेक दिग्गज क्रीडापटूंसोबत करार केला आहे. या करारासोबत विराट कोहली ‘पुमा’चा ग्लोबल अॅम्बेसेडर झाला आहे.
    • गेल्या वर्षात कोहलीने ब्रॅण्डव्हॅल्यूच्या माध्यमातून ६०० कोटींची कमाई केल्याची माहिती ‘डफ अँड फेल्प्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आली होती.
    • सध्याच्या घडीला कोहली २० पेक्षा अधिक ब्रॅण्डचे प्रमोशन करत आहे. यात जिओनी, अमेरिकन टुरिस्टर अशा मोठ्या ब्रॅण्डचा समावेश आहे.

    अमेरिकेत येणार नवा स्थलांतर बंदी आदेश

    • अमेरिकेत नव्याने तयार करण्यात आलेल्या स्थलांतर बंदी आदेशामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ आदेशातील सात मुस्लिमबहुल देशांतील लोकांवर अमेरिकेत येण्यास बंदी कायम ठेवली असून ज्यांच्याकडे आधीच व्हिसा आहे त्यांना अमेरिकेत येण्यास मुभा दिली आहे.
    • अमेरिकेचा व्हिसा आहे, मात्र अद्याप एकदाही अमेरिकेत गेलेले नाहीत अशांनाही सूट मिळणार आहे. त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळू शकेल. 
    • अमेरिकेतील संघराज्य न्यायालयाने ट्रम्प यांच्या मूळ स्थलांतर आणि निर्वासित बंदी आदेशांना स्थगिती दिली होती. 
    • त्या आदेशात इराण, इराक,सीरिया, येमेन, सोमालिया, सुदान व लीबिया या सात देशातील मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती.
    • आता नवीन आदेशातही या सात देशांची नावे कायम आहेत. परंतु जे ग्रीन कार्डधारक आहेत व ज्यांच्याकडे अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व आहे ते नागरिक या देशांमधील असले तरी त्यांना अमेरिकेत येण्याजाण्यास सूट देण्यात येत आहे.
    • सीरियन शरणार्थीना एकटे पाडून नवीन व्हिसा अर्जात नाकारले जाऊ नये असेही या आदेशात म्हटले आहे.
    • या प्रस्तावाचा मसुदा सध्या प्रसारित करण्यात आला असून त्यावर मते घेतल्यानंतर त्याला अंतिम रूप दिले जाईल.
    • ट्रम्प यांच्या मूळ आदेशाने खळबळ उडाली होती व जगातून त्यांच्यावर टीका झाली होती. अमेरिकेतील विमानतळांवर या आदेशाविरोधात निदर्शनेही झाली होती.

    शाहिद आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

    • पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
    • शाहिदने कसोटीमधून याआधीच २०१०साली निवृत्ती जाहीर केली होती. तर २०१५साली विश्वचषक स्पर्धेनंतर शाफ्रिदीने वनडेमधूनही निवृत्ती घेतली होती. 
    • पण पाकिस्तान ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व शाहिद करत होता. २०१६साली चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर शाहिदने कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता.
    • आपल्या २१ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत आक्रमक फटकेबाजी आणि लेग स्पिनच्या जोरावर आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
    • १९९६साली आफ्रिदीने आपल्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेविरोधात ३७ चेंडूत शतक ठोकून विक्रम रचला होता.
    शाहिद आफ्रिदीची कारकीर्द
    कसोटी वनडे ट्वेन्टी-२०
    सामने २७ ३९८ ९८
    धावा ११७६ ८०६४ १४०५
    विकेट्स ४८ ३९५ ९७

    मिलिंद सोमणसह चार भारतीयांना अल्ट्रामॅन मॅरेथॉनमध्ये यश

    • अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने तीन दिवसांत ५१७ किमी अंतराची अल्ट्रामॅन मॅरेथॉन स्पर्धा पार केली आहे.
    • फ्लोरिडात रंगलेली मॅरेथॉन स्पर्धा जगातील सर्वात कठीण स्पर्धा आहे. तिला अल्ट्रामॅन असेही म्हटले जाते. यामध्ये पोहणे, धावणे आणि सायकलिंग असे तीन टप्पे स्पर्धकाला पार करावे लागतात.
    • तीन दिवस चालणाऱ्या अल्ट्रामॅन स्पर्धेत पहिल्या दिवशी १० किमी पोहणे आणि १४२ किमी सायकलिंग करणे, दुसऱ्या दिवशी २७६ किमी सायकलिंग तर तिसऱ्या दिवशी ८४ किमी धावावे लागते.
    • मिलिंद सोमणच्या व्यतिरिक्त अभिषेक मिश्रा, कौस्तुभ रडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमध रेबा भार्तीहे ४ भारतीयदेखील या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनीदेखील स्पर्धा पूर्ण केली आहे.

    चालू घडामोडी : १९ फेब्रुवारी

    माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचे निधन

    • सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचे १९ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे दीर्घ आजाराने निधन झाले.
    • कबीर हे सर्वोच्च न्यायालयाचे ३९वे सरन्यायाधीश होते. २०१३मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले होते.
    • त्यांचा जन्म २९ सप्टेंबर १९४८ मध्ये झाला होता. एलएलबी पदवी संपादन केल्यानंतर ते १९७३मध्ये कोलकाता बार असोसिएशनचे सदस्य बनले. येथून त्यांची कारकिर्द सुरु झाली.
    • कोलकाता उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या कबीर यांची १९९०मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
    • २००५ मध्ये त्यांची नियुक्ती झारखंडचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती.
    • कबीर यांची २९ सप्टेंबर २०१२ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी हे पद १८ जुलै २०१३ पर्यंत भूषवले.
    • सरन्यायाधीश म्हणून कबीर यांची कारकीर्द विवादास्पद राहिली. कबीर यांनी जाणीवपूर्वक आपली पदोन्नती रोखल्याचा आरोप गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भास्कर भट्टाचार्य यांनी मागे केला होता.
    • सहारा-सेबी प्रकरणाची सुनावणी ज्या पीठासमोर सुरू होती, त्यात कबीर यांनी बदल करून ती आपल्या हातात घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.

    रोख दागिने खरेदीवर आता १ टक्का टीसीएस

    • १ एप्रिलपासून २ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख दागिने खरेदीवर आता १ टक्का टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स) द्यावा लागणार आहे.
    • प्राप्तीकर कायद्यातील तरतुदीनुसार वस्तू व सेवांसाठीच्या २ लाखांवरील रोखीतील व्यवहारावर १ टक्का टीसीएस आकारला जातो. 
    • आर्थिक विधेयक २०१७मंजूर झाल्यानंतर दागिनेही सामान्य वस्तूंच्या यादीत येणार आहेत. त्यामुळे यावरही १ टक्का कर द्यावा लागणार आहे.
    • सध्या दागिन्यांच्या ५ लाखांवरील खरेदीवर टीसीएस लागू होतो. ही मर्यादा आता दोन लाखांवर आणण्यात येणार आहे.
    • रोखीतील मोठ्या व्यवहारातून काळ्या पैशांची देवाणघेवाण रोखण्यासाठी सरकारद्वारे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
    • २०१७-१८च्या अर्थसंकल्पात तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या नगदी व्यवहारांवरही प्रतिबंध आणले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्या व नगदी रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीला तितक्याच रकमेचा दंड देण्याची तरतूद आहे.
    • आयकर विभाग १ जुलै २०१२ पासूनच सोन्याच्या दोन लाखांवरील आणि दागिन्यांच्या पाच लाखांवरील रोखीतील खरेदीवर एक टक्का टीसीएस आकारत आहे. 

    सुरेंद्र वर्मा यांना व्यास सन्मान जाहीर

    • हिंदी भाषेतील नामवंत साहित्यिक सुरेंद्र वर्मा यांना बिर्ला फाऊंडेशनचा व्यास सन्मान जाहीर झाला आहे.
    • २०१०मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘काटना शमी का वृक्ष- पद्म पंखुरी के धार से’ या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
    • १९४१मध्ये उत्तर प्रदेशातील झांशी येथे जन्मलेल्या सुरेंद्र वर्मा यांचे ‘सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहली किरण तक’ हे पहिले नाटक होते. सहा भाषांत त्याचे भाषांतर झाले आहे.
    • कथा, नाटके, कादंबऱ्या, समीक्षा अशा प्रकारांत त्यांनी मुझे चांद चाहिए, आठवा सर्ग, कैद ए हयात अशी किमान पंधरा पुस्तके लिहिली आहेत.
    • त्यांना १९९३मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तर १९९६मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
    • त्यांच्या रति का कंगन नाटकामध्ये त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक माध्यमातून कामचेतना नाटय़प्रसंगातून दाखवताना विवाहामुळे आलेल्या कामसंबंधाच्या मर्यादा तोडल्या आहेत.
    • त्यांच्या नाटक व कादंबऱ्यांतील या वर्णनावर प्रच्छन्न टीका झाली असली तरी त्यांनी त्यातून जी रंगभाषा निर्माण केली ती कुणालाही निर्माण करता आली नाही.
     त्यांचे इतर साहित्य 
    • नाटके: सेतूबंध, नायक खलनायक विदूषक, द्रौपदी, शकुंतला की अंगूठी
    • पुस्तके: मुझे चाँद चाहिए, जहॉँ बारिश न हो, आठवा सर्ग, कैद ए हयात
    • कादंबऱ्या: अंधेरे से परे, दो मुर्दो के लिए गुलदस्ता

    चालू घडामोडी : १८ फेब्रुवारी

    पर्यटकांना विमानळावरच मोफत सिमकार्ड मिळणार

    • भारतात ई-व्हिसावर येणाऱ्या पर्यटकांना सरकारकडून विमानळावरच मोफत भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलचे सिमकार्ड दिले जाणार आहे.
    • या कार्डवर त्यावर पन्नास रुपयांचा टॉकटाइम आणि ५० एमबी इंटरनेट डेटा मोफत देण्यात येणार आहे.
    • पर्यटकांना भारतात आगमन झाल्यानंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधणे सुकर व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे.
    • ही सुविधा केवळ ई-व्हिसावर भारतात येणाऱ्या पर्यटकांसाठी आहे. ई-व्हिसाची प्रत विमानतळावर स्वीकारतानाच बीएसएनएलचे सिमकार्ड पर्यटकांना देण्यात येणार आहे. हे सिम कार्ड लगेचच सुरू होणार आहे.
    • ई-व्हिसाची सुविधा सध्या १६१ देशांना उपलब्ध करून देण्यात आली असून, २०१६मध्ये या सुविधेचा लाभ दहा लाख पर्यटकांनी घेतला.
    • सध्या ही सेवा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य १५ आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उपलब्ध होणार आहे. 
    • याशिवाय योजनेंतर्गत विदेशी पर्यटकांसाठी २४ बाय ७ टुरिस्ट हेल्पलाइन बारा आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

    प्रसिद्ध कादंबरीकार वेद प्रकाश शर्मा यांचे निधन

    • जनसामान्यांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या अनेक कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर गारूड निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार वेद प्रकाश शर्मा यांचे निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते.
    • वर्षभरापासून आजाराशी झुंज देणाऱ्या शर्मा यांची १७ फेब्रुवारी रोजी प्राणज्योत मालवली. शर्मा यांनी आतापर्यंत १७३ कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
    • १९९३मध्ये वेद प्रकाश शर्मा यांच्या वर्दीवाला गुंडा या उपन्यासने देशभर धुमाकूळ घातला होता. या पुस्तकाच्या एका दिवसात १५ लाख प्रती विकल्या गेल्या होत्या.
    • पुस्तके अॅडव्हान्स बुकींग करण्याची पद्धतही रूढ झालेली नव्हती अशा काळात शर्मा यांच्या पुस्तकांचे अॅडव्हान्स बुकींग व्हायचे. एवढी लोकप्रियता त्यांना लाभली होती.
    • त्यांनी सहा चित्रपटांसाठी पटकथा लेखनही केले आहे. त्यांच्या बहू मांगे इंसाफ या उपन्यासवर बहू की आवाज हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
    • वर्दी वाला गुंडा, बहू मांगे इंसाफ, राम बाण, असली खिलाडी, दूर की कौडी, लल्लू आणि कानून बदल डालो या वेद प्रकाश शर्मा यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.