महाराष्ट्रात १० महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये झालेल्या आणि ‘मिनी विधानसभा’ म्हणून गणल्या जाणाऱ्या निवडणुकांचे निकाल २३ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आलेली राजकीय परिवर्तनाची लाट दोन अडीच वर्षानंतरही कायम असल्याचे राज्यातील निवडणूक निकालावरून दिसून आले.
यामध्ये सर्वाधिक ४११ जागा जिंकून भाजप राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून गतवेळी क्रमांक एकवर असलेल्या राष्ट्रवादीला ३५९ जागांवर समाधान मानावे लागले.
राज्यातील दहापैकी बहुतांश महापालिकांमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून उर्वरित महापालिकांमध्ये भाजप निर्णायक भूमिकेत आहे.
जिल्हा परिषदांमध्ये संख्याबळाचा विचार करता काँग्रेस-राष्ट्रवादीला २५ पैकी ११ तर शिवसेना-भाजपाला १३ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी आहे.
गतवेळी जिल्हा परिषदांमध्ये क्रमांक एकवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बीड, पुणे आणि सातारा या तीनच जिल्हा परिषदांमध्ये सत्ता राखता आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा