चालू घडामोडी : १८ फेब्रुवारी
पर्यटकांना विमानळावरच मोफत सिमकार्ड मिळणार
- भारतात ई-व्हिसावर येणाऱ्या पर्यटकांना सरकारकडून विमानळावरच मोफत भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलचे सिमकार्ड दिले जाणार आहे.
- या कार्डवर त्यावर पन्नास रुपयांचा टॉकटाइम आणि ५० एमबी इंटरनेट डेटा मोफत देण्यात येणार आहे.
- पर्यटकांना भारतात आगमन झाल्यानंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधणे सुकर व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे.
- ही सुविधा केवळ ई-व्हिसावर भारतात येणाऱ्या पर्यटकांसाठी आहे. ई-व्हिसाची प्रत विमानतळावर स्वीकारतानाच बीएसएनएलचे सिमकार्ड पर्यटकांना देण्यात येणार आहे. हे सिम कार्ड लगेचच सुरू होणार आहे.
- ई-व्हिसाची सुविधा सध्या १६१ देशांना उपलब्ध करून देण्यात आली असून, २०१६मध्ये या सुविधेचा लाभ दहा लाख पर्यटकांनी घेतला.
- सध्या ही सेवा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य १५ आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उपलब्ध होणार आहे.
- याशिवाय योजनेंतर्गत विदेशी पर्यटकांसाठी २४ बाय ७ टुरिस्ट हेल्पलाइन बारा आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
प्रसिद्ध कादंबरीकार वेद प्रकाश शर्मा यांचे निधन
- जनसामान्यांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या अनेक कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर गारूड निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार वेद प्रकाश शर्मा यांचे निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते.
- वर्षभरापासून आजाराशी झुंज देणाऱ्या शर्मा यांची १७ फेब्रुवारी रोजी प्राणज्योत मालवली. शर्मा यांनी आतापर्यंत १७३ कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
- १९९३मध्ये वेद प्रकाश शर्मा यांच्या वर्दीवाला गुंडा या उपन्यासने देशभर धुमाकूळ घातला होता. या पुस्तकाच्या एका दिवसात १५ लाख प्रती विकल्या गेल्या होत्या.
- पुस्तके अॅडव्हान्स बुकींग करण्याची पद्धतही रूढ झालेली नव्हती अशा काळात शर्मा यांच्या पुस्तकांचे अॅडव्हान्स बुकींग व्हायचे. एवढी लोकप्रियता त्यांना लाभली होती.
- त्यांनी सहा चित्रपटांसाठी पटकथा लेखनही केले आहे. त्यांच्या बहू मांगे इंसाफ या उपन्यासवर बहू की आवाज हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
- वर्दी वाला गुंडा, बहू मांगे इंसाफ, राम बाण, असली खिलाडी, दूर की कौडी, लल्लू आणि कानून बदल डालो या वेद प्रकाश शर्मा यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा