सेबी आणि सहारा उद्योग समूह यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाचा पुण्यातील अॅम्बी व्हॅली प्रकल्प जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
समभागधारकांचे बुडविलेले २४,००० कोटी रुपये परत करावे यासाठी सेबीने सहारा समूहाविरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली होती.
त्यासाठी सुब्रतो रॉय यांच्या ३९,००० कोटी मूल्य असलेल्या अॅम्बी व्हॅली प्रकल्पावर जप्ती आणून पैसे वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे सहाराचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सहाराकडे असलेली थकीत रक्कम जमा होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या ताब्यात राहणार आहे.
याशिवाय ज्या संपत्तीचा लिलाव करता येईल अशा संपत्तीची यादी २० फेब्रुवारीपर्यंत द्यावी हा आदेशही न्यायालयाने दिला आहे..
गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे पुन्हा मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास या मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल.
सहारा समुहाने आत्तापर्यंत सुमारे ११ हजार कोटी रुपये भरले आहेत. आणखी एकूण १४,७७९ कोटी रुपये सहारा समूहाला सेबीला देणे बाकी आहे.
ही रक्कम भरण्यासाठी सहाराने सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत वाढवून मागितली होती. परंतु ती नाकारण्यात आली आहे.
सुरुवातीला सहाराकडून मुद्दल वसूल करुन घेतले जाईल आणि नंतर व्याज वसूल केले जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या प्रवेशबंदी आदेशाला स्थगिती
सात मुस्लिम देशातील नागरीकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेतील न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टनमधील न्यायालयाने ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी करु नये असा निर्णय दिला आहे.
त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील न्यायालयांवर संताप व्यक्त केला आहे.
याशिवाय अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाला ट्रम्प यांनी बाहेरून येणाऱ्या लोकांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया व येमेन या मुस्लीम देशातील नागरीकांचा अमेरिकेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ट्रम्प यांच्या आदेशामुळे या देशातील नागरीकांना ९० दिवस प्रवेश बंदी लागू झाली होती.
ज्यांच्याकडे वैध अमेरिकी व्हिसा आहे व ग्रीन कार्ड आहेत त्यांनाही याचा फटका बसला होता.
टाटा समुहातील सायरस मिस्त्रींचे अस्तित्व संपुष्टात
टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरुन निलंबित झालेल्या सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालकपदावरुनही हटवण्यात आले आहे.
भागधारकांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून आता सायरस मिस्त्री यांचे टाटा समुहातील अस्तित्व संपुष्टात आले आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते.
टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टनंतर सर्वाधिक हिस्सा सायरस मिस्त्री यांच्या शापूरजी पालनजी समूहाचा आहे.
त्यामुळे टाटामधील सर्व पदांवरुन सायरस मिस्त्री पायउतार झाले असले तरी समुहातील त्यांचा हिस्सा मात्र अजूनही कायम आहे.
अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी शशिकला
अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा दिवंगत जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांची अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच पनीरसेल्वम यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी साशिकला यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
५ डिसेंबर २०१६ रोजी जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर अण्णाद्रमुकची सूत्रे शशिकला यांच्याकडे जाण्यास सुरुवात झाली.
महिनाभरापूर्वीच पक्षाच्या बैठकीत शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
चीनचा अत्याधुनिक क्षेपणास्त्रासोबत युद्धाभ्यास
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ने रॉकेट फोर्सच्या वेगाने मारा करू शकणाऱ्या अत्याधुनिक डीएफ-१६ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासोबत युद्धाभ्यास केला आहे.
चीनने तिसऱ्यांदा डीएफ-१६ या क्षेपणास्त्रासोबत सराव केला असून, हे क्षेपणास्त्र १००० किलोमीटरहून अधिक अंतरावरच्या प्रदेशालाही लक्ष्य करू शकते.
भारत, जपान आणि अमेरिकेला भीती दाखवण्यासाठीच चीनने हे शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या दक्षिण चिनी समुद्रातील दाव्यावर कठोर धोरण अवलंबणार असल्याचे संकेत दिले आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर चीनने अमेरिकेला भीती दाखवण्यासाठी हा युद्धाभ्यास केल्याची चर्चा आहे.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या कारकिर्दीला ६५ वर्षे पूर्ण
ब्रिटिश राजवटीत सफायर ज्युबिली (६५ वर्ष) पूर्ण करण्याचा मान राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मिळाला आहे.
इतक्या दीर्घ कालावधीसाठी सिंहासनावर राहण्याचा बहुमान मिळविलेल्या त्या जगातील पहिल्याच राणी ठरल्या आहेत.
या दिवसाचे औचित्य साधून ब्रिटनमध्ये निळ्या रंगाच्या पाच पौंडच्या टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
सत्तेच्या सिंहासनावर सर्वाधिक काळासाठी असलेल्या त्या सद्यःस्थितीच्या एकमेव व्यक्ती आहेत.
कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचेही सम्राज्ञीपद त्यांच्याकडे आहे. याशिवाय त्यांच्या काळात सुमारे १२ देश स्वतंत्र झाले.
याच दिवशी ६ फेब्रुवारी १९५२ रोजी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वडील पंचम जॉर्ज यांचा मृत्यू झाला होता.
increase the content and variety of topics
उत्तर द्याहटवा