चालू घडामोडी : १७ फेब्रुवारी
पलानीस्वामींचा विश्वासदर्शक ठरावात विजय
- तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यामुळे ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहे.
- पलानीस्वामी यांना १२२ आमदारांनी पाठिंबा दिला असून ओ पन्नीरसेल्वम फक्त ११ आमदारांनीच पाठिंबा दिला आहे.
- यावेळी द्रमुकच्या आमदारांनी तोडफोड आणि गदारोळ केल्यामुळे या ८८ आमदारांना सभागृहाबाहेर काढल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला.
- गुप्त मतदान घेण्याची द्रमुक आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळल्याने संतापलेल्या द्रमुक आमदारांनी खुर्च्यांची मोडतोड केली. विधानसभा अध्यक्षांसमोरच्या टेबलही तोडले.
- तामिळनाडू राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा विश्वासदर्शक ठराव ३० वर्षांत प्रथमच मांडण्यात आला होता. पलानीस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी ६४ मते मिळणे गरजेचे होते.
संशयास्पद व्यवहारांवर लवकरच होणार कारवाई
- नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये पाचशे व हजारच्या रद्द नोटा मोठ्या प्रमाणात जमा करणाऱ्या १८ लाख जणांकडून प्राप्तिकर विभागाने खुलासा मागविला होता.
- यातील सुमारे ९ लाख जणांचे व्यवहार संशयास्पद आढळले असून, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत ३१ मार्चला संपल्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुरू होणार आहे.
- ‘ऑपरेशन क्लीन मनी’ या मोहिमेअंतर्गत प्राप्तिकर विभागाने नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये जमा झालेल्या ठेवींची तपासणी केली आहे.
- यामध्ये ५ लखांपेक्षा अधिक संशयास्पद रक्कम जमा करणाऱ्या १८ लाख जणांना एसएमएस आणि ई-मेल पाठवून स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते.
- या एसएमएस आणि ई-मेलला उत्तर न देणाऱ्या संशयास्पद व्यवहार असणाऱ्या नागरिकांना आता प्राप्तिकर विभाग नोटिसा पाठविणार असून, उत्तरासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतीक्षा करणार आहे.
शिओमीच्या उपाध्यक्षपदी मनूकुमार जैन
- चीनमधील आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी शिओमीच्या उपाध्यक्षपदी मनूकुमार जैन यांची निवड झाली आहे.
- मनू कुमार जैन हे सध्या शिओमीमध्येच भारतातील प्रमुख म्हणून कार्यरत होते. १७ फेब्रुवारी रोजी कंपनीने मनू कुमार जैन यांना उपाध्यक्षपदी बढती दिली आहे.
- मनूकुमार जैन हे जून २०१४ मध्ये शिओमी कंपनीमध्ये रुजू झाले होते. यापूर्वी ते जबाँगमध्ये काम करत होते.
- शिओमी ही चीनमधील आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी असून या कंपनीचे उपाध्यक्ष ह्यूगो बारा यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता.
- शिओमीची चीनबाहेरील बाजारपेठ तब्बल १ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. मनूकुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने चांगली वाटचाल केली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवपदी प्रथमच महिलेची नियुक्ती
- पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवपदी तेहमिना जंजुआ यांच्या रूपाने प्रथमच महिलेची निवड करण्यात आली आहे. त्या एजाज अहमद चौधरी यांची जागा घेणार आहेत.
- १९८४मध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र सेवेत दाखल झालेल्या तहमिना यांनी गेल्या ३३ वर्षांत विविध पदे भूषविली आहेत.
- त्यांनी कायदेआझम विद्यापीठातून फ्रेंच साहित्यामध्ये पदवी मिळवली असून आंतरराष्ट्रीय राजकारणात रस असल्याने त्यांनी न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.
- सुरुवातीला त्यांनी न्यूयॉर्कमधील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात सेवा बजावली. तेथील कार्यकाळ संपल्यानंतर तहमिना यांना परराष्ट्र मंत्रालयातील सामरिक धोरणांचे नियोजन करणाऱ्या कक्षात नियुक्त करण्यात आले.
- २०११मध्ये त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या होत्या. २०११ ते २०१५ या काळात त्या पाकिस्तानच्या इटलीमधील राजदूत होत्या. २०१५पासून त्या संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहेत.
सॅमसंगच्या प्रमुखांना अटक
- जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगच्या प्रमुखांना दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पार्क ग्वेन यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
- दोन कंपन्यांचे विलिनीकरण करण्यासाठी समर्थन मिळावे यासाठी ली यांनी ३६ मिलिअन डॉलर्सची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा