चालू घडामोडी : ७ जुलै

केंद्र सरकारची स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व्ह वाढविण्यास मंजुरी

  • केंद्र सरकारने स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजेच एसपीआर (कच्च्या तेलाचा तुटवड्याच्या वेळेस वापरता येईल असा साठा) वाढविण्याच्या निर्णयाला तत्वतः मंजुरी दिली आहे.
  • सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास साठवलेले कच्चे तेल १२ दिवस वापरले जाऊ शकते. हाच साठा १२ दिवसांवरून २२ दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • हे साठे कर्नाटक व ओडिशा या राज्यांमध्ये भूगर्भात खाणकाम करुन तयार करण्याचा सरकारचा विचार आहे. या दोन साठ्यांची क्षमता ६.५ मिलियन मेट्रिक टन (एमएमटी) असेल.
  • भारताने सध्या ५.३३ एमएमटी इतका पेट्रोलियम साठा भूगर्भात याआधीच तयार ठेवला आहे. त्यात विशाखापट्टणम (१.३३ एमएमटी), मंगळुरु (१.५ एमएमटी), पदूर (२.५ एमएमटी) यांचा समावेश आहे.
  • हायड्रोकार्बन पदार्थ साठवण्यासाठी जमिनीखाली मानवनिर्मित गुहांचा वापर केला जातो. पेट्रोलियम पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्यावर त्यातील इंधन वापरले जाते.
  • भारतात भूगर्भात खोदकाम करुन इंधनाचा साठा करावा, हा निर्णय १९९८साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी घेतला होता.

प्रा. रवींदर दहिया यांच्या ब्रेनी स्किन १५ लाख पौंडांचे अर्थसहाय्य

  • भारतीय वंशाचे वैज्ञानिक प्रा. रवींदर दहिया यांच्या अतिसंवेदनशील कृत्रिम त्वचा तयार करण्याच्या ‘ब्रेनी स्किन’ या प्रकल्पाला १५ लाख पौंडांचे अर्थसहाय्य मिळाले आहे.
  • इलेक्ट्रॉनिक्स व नॅनोइंजिनीअरिंग विषयात प्राविण्य असलेले दहिया हे लवचीक इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संवेदनशीलता तंत्रज्ञानातील तज्ञ आहेत.
  • ते सध्या ग्लासगो विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्राध्यापक असून, त्यांनी भविष्यवेधी त्वचा तयार करण्याची संकल्पना प्रथम मांडली.
  • त्यात खऱ्या त्वचेतील घटकांची नक्कल करून अतिशय लवचीक, अतिसंवेदनशील त्वचा तयार करण्यात त्यांनी मोठी प्रगती साधली आहे.
  • अनेकदा काही कारणांनी अवयव तोडावे लागलेल्यांना नैसर्गिक त्वचेमुळे असणारी संवेदना लाभत नाही, त्यांना ही त्वचा वरदान ठरणार आहे.
  • त्याशिवाय संवेदनशीलता असलेली त्वचा धारण करणारे रोबोटही त्यातून तयार करता येणार आहेत.
  • ब्रेनी स्किनमध्ये मानवी त्वचेप्रमाणेच न्यूरॉन्स असतील. तिला स्पर्श केल्यास त्यातील सिलिकॉन आधारित न्यूरल ट्रान्झिस्टर व ग्राफिनकीमुळे लगेच मेंदूला संदेश जाईल.
  • कार्बनच्या पातळ पापुद्र्याइतकी जाड असलेली ही त्वचा अणूच्या जाडीएवढी, पण पोलादापेक्षाही मजबूत असेल.
  • या त्वचेमध्ये प्रकाशीय विद्युत घट वापरले जाणार असून त्यातून प्रति चौरस सेंमीला २० नॅनोवॅट ऊर्जा उपलब्ध होईल.
  • त्यांचे मूळ संशोधन हे इलेक्ट्रॉनिक त्वचा, रोबोटिक यंत्रणा, प्रॉस्थेटिक्स यात आहे. त्यांचे एकूण २०० शोधनिबंध व चार पुस्तके प्रकाशित आहेत.
  • युरोपीय समुदायाच्या अनेक प्रकल्पांत त्यांनी नेतृत्व केले असून त्यांना मेरी क्युरी फेलोशिप मिळाली आहे.
  • वयाच्या चाळिशीतील उत्तम स्कॉटिश वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश २०१६मध्ये करण्यात आला आहे.

विराट कोहलीच्या टी-२०मध्ये सर्वात जलद २००० धावा

  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
  • इंग्लंडविरुद्ध टी-२० सामन्यात विराटने २००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या ८ धावा विराटने काढत हा विक्रम केला.
  • याआधी हा विक्रम ब्रँडन मॅक्युलमच्या नावावर जमा होता, मॅक्युलमने ६६ डावांमध्ये ही कामगिरी साधली होती. मात्र विराटने केवळ ५६ डावांमध्ये हा पल्ला गाठला.
  • सध्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंडचे मार्टीन गप्टील, ब्रँडन मॅक्युलम आणि पाकिस्तानचा शोएब मलिक यांच्यानंतर कोहली चौथ्या स्थानावर आहे.
  • टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करणारा कोहली जगातील चौथा तर आशियातील दुसरा फलंदाज ठरला आहे.

रिलायन्सच्या अध्यक्षपदी मुकेश अंबानी यांची फेरनिवड

  • रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी शेअरधारकांनी मुकेश अंबानी यांना एप्रिल २०१९पासून पुढील ५ वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे.
  • मुंबई येथे ५ जुलैला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठरावाच्या बाजूने ९८.५ टक्के तर विरोधात १.४८ टक्के मते पडली.
  • यानुसार मुकेश अंबानी यांना वार्षिक ४.१७ कोटी वेतन व ५९ लाख रुपयांचे इतर भत्ते देण्यात येतील. यात निवृत्तीच्या लाभांचा तसेच अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षा खर्चाचा समावेश नाही.
  • अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मंडळावर १९७७पासून आहेत. धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर जुलै २००२मध्ये त्यांची कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झाली.
  • या वार्षिक सर्वसाधारण सभेत २० हजार कोटी अपरिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून उभे करण्यास मान्यता देण्यात आली.

सॅटर्डे क्लबचे संस्थापक माधव भिडे यांचे निधन

  • मराठी उद्योजकांना नवी दिशा देणारे सॅटर्डे क्लबचे संस्थापक माधव भिडे यांचे वयाच्या ८८व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • रेल्वेमधून चीफ इंजिनीअर म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी भिडे असोसिएट्स नावाने स्वत:ची कंपनी सुरू केली.
  • भिडे यांनी १९८९साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिज इंजिनीअर्स या सेतू उभारणाऱ्या अभियंत्यांची संस्था उभारली.
  • मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी २०००मध्ये त्यांनी मुंबईतील गोरेगाव येथे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ४५हून अधिक चॅप्टर असून, १७०० हून अधिक उद्योजक सदस्य आहेत.
  • मराठी उद्योजकांमध्ये परस्पर सहकार्याची भावना रुजवावी व त्यांनी नव्या मराठी उद्योजकांना पुढे येण्यासाठी सहकार्य करावे ही उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेवून माधव भिडे यांनी सॅटर्डे क्लब सुरु केला.

उत्तर प्रदेशातही १५ जुलैपासून प्लास्टिक बंदी

  • महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातही योगी आदित्यनाथ सरकारने १५ जुलैपासून प्लास्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • महाराष्ट्रात प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्याला ५ हजारांपासून २५ हजारांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
  • या घोषणेमुळे १५ जुलैनंतर उत्तर प्रदेशात प्लॅस्टिकच्या पिशव्या, कप व ग्लास यावर बंदी येणार आहे.
  • यापूर्वी दोनदा उत्तर प्रदेशात प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली होती. परंतु त्याची नीट अंमलबजावणी करण्यात आली नाही. सर्वात आधी
  • २०१५साली तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही बंदी घातली होती. त्यानंतरही राज्यात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे आले.
  • त्यानंतर २०१६ साली त्यांनी पुन्हा प्लॅस्टिकबंदी जाहीर करताना, त्यासाठी कडक नियम ठरवून दिले, परंतु त्याचा परिणाम अद्याप झाला नसल्याने योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा बंदी घातली.
  • देशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या प्लॅस्टिकवर बंदी आहे. सर्वात आधी सिक्किम राज्यात त्यावर बंदी घालण्यात आली आणि तिथे ती यशस्वी झाली आहे.
  • काही राज्यात प्लॅस्टिकवर बंदी घातली असली, तरी त्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आलेली नाही. तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी घातलेली बंदी अंशत: आहे. म्हणजेच काही प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास राज्यात संमती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा