चालू घडामोडी : ८ जुलै

खरीप ज्वारीचे देशातील पहिले जैवसमृद्ध वाण विकसित

  • कुपोषण दूर करण्यासह बहुपयोगी असलेले खरीप ज्वारीचे जैवसमृद्ध वाण ‘परभणी शक्ती’ (पीव्हीके १००९) या नावाने विकसित करण्यात आले आहे.
  • लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेले हे देशातील पहिलेच वाण असून, ५ जुलै रोजी हैदराबाद येथे त्याचे प्रसारण करण्यात आले.
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) व आंतरराष्ट्रीय अर्ध कोरवाडवाहू उष्णकटीबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रीसॅट) (हैदराबाद) यांच्या संशोधनातून हे वाण विकसित करण्यात आले आहे.
  • या संशोधित जैवसमृद्ध वाणामध्ये लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असल्याने मानवी जीवनावर व आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे. हे वाण महिला व लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यास उपयुक्त ठरेल.
  • रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होण्याचे प्रमाण देशात अधिक आहे. त्यामुळे या आजारासाठी हे वाण उपयुक्त ठरणार आहे.
  • या संशोधित वाणामध्ये लोह प्रतिकिलो ४४ ते ४६ मिलीग्रॅम आणि जस्त प्रतिकिलो ३२ ते ३३ मिलीग्रॅम असून, भाकरीची प्रत चांगली आहे.
  • या वाणाचा कडबाही उच्चप्रतीचा असून, उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी ३६ ते ३८ क्विंटल व कडब्याचे उत्पादन १०५ ते ११० क्विंटल आहे. खोडमाशी, खोडकिड व काळ्या बुरशी या रोगास हा वाण प्रतिकारकक्षम आहे.
  • विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन करून लवकरच हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे.

दीपा कर्माकरला जिमनॅस्टीक विश्वचषकात सुवर्णपदक

  • रिओ ऑलिम्पिकमध्ये नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या जिमनॅस्ट दीपा कर्माकरने तुर्कीच्या मेरसिन शहरात सुरु असलेल्या आर्टिस्टीक जिमनॅस्टीक विश्वचषकात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • २४ वर्षीय दीपा कर्माकरचे रिओ ऑलिम्पीकमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने सुवर्णपदक हुकले होते. तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
  • दुखापतीनंतर बऱ्याच कालावधीनंतर खेळताना दीपाने लौकिकाला साजेसा खेळ केला आणि व्हॉल्ट प्रकारात अव्वल कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
  • सुमारे २ वर्ष दुखापतीमुळे मैदानापासून बाहेर राहिलेल्या दीपाचे विश्वचषकातील हे पहिलेच विजेतेपद आहे.
  • आगामी आशियाई खेळांसाठी भारताच्या जिमनॅस्ट चमूमध्येही दीपा कर्माकरची निवड करण्यात आलेली आहे.

धोनीचा टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक टिपण्याचा विक्रम

  • भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक ५० झेल टिपण्याचा विक्रम केला आहे.
  • इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने दीपक चहरच्या गोलंदाजीवर जेसन रॉयचा झेल घेत आपले हे अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात धोनीने ५ झेल घेतले. त्यामुळे त्याचे एकूण झेल ५४ झाले.
  • टी-२०च्या एका सामन्यात सर्वाधिक ५ झेल घेण्याचा विक्रमही यामुळे धोनीच्याच नावावर झाला.
  • धोनीनंतर दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडीजचा दिनेश रामदीन (३४ झेल) आहे. तर तिसऱ्या स्थ्नावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक (३० झेल) आहे.

नोबेल विजेते वैज्ञानिक डॉ. अरविड कार्लसन यांचे निधन

  • पार्किन्सन म्हणजे कंपवाताच्या रोगावरील औषधांच्या संशोधनात सिंहाचा वाटा उचलणारे नोबेल विजेते स्वीडिश वैज्ञानिक डॉ. अरविड कार्लसन यांचे २९ जून रोजी निधन झाले.
  • पार्किन्सन म्हणजे कंपवाताच्या रोगावर अजूनही इलाज सापडलेला नाही. डॉ. कार्लसन यांनी शोधलेल्या औषधांमुळे काही प्रमाणात हा रोग नियंत्रित राहतो.
  • त्यांचे संशोधन १९५०मध्ये मेंदूतील डोपॅमाइन या चेतासंवेदकापासून सुरू झाले. हा चेतासंवेदक एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे संदेश पाठवतो.
  • त्यांनी डोपॅमाइन हे मेंदूच्या बॅसल गँगलिया भागात असते हे प्रथम सांगितले. हाच भाग शरीराच्या हालचाली नियंत्रित करीत असतो.
  • डोपॅमाइन कमी झाले की शारीरिक हालचाली मंद होतात. त्यातूनच एल डोपा या औषधाचा शोध लागला, त्यामुळे मेंदूत डोपॅमाइन वाढवले जाते.
  • त्यांनी शोधलेले एल डोपा हे औषध आजही कंपवातावर मोठय़ा प्रमाणात वापरले जात आहे, इतके त्यांचे संशोधन शाश्वत राहिले आहे.
  • मेंदूतील संदेशवहनाचे गूढ शोधणाऱ्या डॉ. कार्लसन यांना २०००मध्ये डॉ. एरिक कांडेल व डॉ. पॉल ग्रीनगार्ड यांच्यासमवेत नोबेल देण्यात आले.
  • स्वीडनमधील ल्युंड शहरात जन्मलेले डॉ. कार्लसन दुसऱ्या महायुद्धावेळी जर्मनीला गेले. १९५१मध्ये ते वैद्यकीय डॉक्टर झाले व फार्माकॉलॉजीत त्यांनी डॉक्टरेटही पूर्ण केली.
  • नंतर अमेरिकेत बर्नार्ड ब्रॉडी या फार्माकॉलॉजिस्टच्या प्रयोगशाळेत त्यांनी जे संशोधन केले, ते त्यांना नोबेलपर्यंत घेऊन गेले.
  • ते गोथेनबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमीचे ते सदस्य बनले. १९८४मध्ये त्यांना जपानचा पुरस्कार मिळाला होता.

केना ओनजेरिका यांना प्रतिष्ठेचा केन पुरस्कार

  • आफ्रिकेतील केनिया देशाच्या मकेना ओनजेरिका या तरुणीने साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा केन पुरस्कार मिळविला आहे.
  • १० हजार पौंडांचा हा पुरस्कार २०१७मध्ये ब्रिटनमधील वॅसाफिरी या साहित्य विषयक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या तिच्या ‘फँटा ब्लॅककरंट’ या कथेला मिळाला आहे.
  • मकेना ही न्यूयॉर्क विद्यापीठातील सर्जनशील लेखनाच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. तिच्या कथा अर्बन कन्फ्यूजन व वॅसाफिरी या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • तिची ‘फँटा ब्लॅककरंट’ कथा मेरी या नैरोबीतील रस्त्यावर वाढलेल्या मुलीची आहे. ही कथा म्हणजे आश्रमशाळेत लेखिकेला आलेल्या अनुभवाचे सार आहे.
  • केन पुरस्कार दिवंगत सर मायकेल केन यांच्या नावाने दिला जातो. ते २५ वर्षे बुकर पुरस्कार समितीच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते.
  • आफ्रिकन देशातून चांगले लेखक तयार व्हावेत, यासाठी नोबेल विजेते लेखक वोल सोयिन्का व जे. एम. कोझी यांच्या पुढाकाराने हा पुरस्कार दिला जातात.

ज्येष्ठ काँग्रेस नेते एम.एम.जेकब यांचे निधन

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मेघालयचे माजी राज्यपाल एम.एम.जेकब यांचे केरळच्या कोट्टायम येथे ८ जुलै रोजी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
  • १९९५ ते २००७ या काळात ते मेघालयचे राज्यपाल होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि पी.व्ही.एन. राव यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा