चालू घडामोडी : १९ जुलै

केंद्र सरकारकडून पाच सरकारी बँकांना मदत जाहीर

  • पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेशन बँक आणि आंध्र बँकेससह सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांना भांडवली पूर्ततेच्या नियमांच्या पालनासाठी केंद्र सरकारने ११,३३६ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
  • चालू आर्थिक वर्षांतील हे भांडवली पुनर्भरणासाठी बँकांना मिळालेला हा पहिला हप्ता असून, उर्वरित वर्षांत ५३,६६४ कोटी रुपये सरकारकडून बँकांना वितरीत केले जाणार आहेत.
  • अर्थमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियोजनानुसार, नीरव मोदी घोटाळ्याने ग्रस्त पंजाब नॅशनल बँकेला सर्वाधिक २,८१७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
  • त्या खालोखाल कॉर्पोरेशन बँकेला २,५५५ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बँकेला २,१५७ कोटी रुपये मिळणार आहेत.
  • आंध्र बँकेला २,०१९ कोटी रुपये आणि अलाहाबाद बँकेला १,७९० कोटी रुपये वितरीत केले जाणार आहेत.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना, त्यांच्या रोखेधारकांना व्याजाची पूर्तता करण्यासाठी भांडवलाची तातडीने गरज असून, त्यासाठी हे अर्थसाहाय्य सरकारकडून करण्यात आले.
  • हे भांडवली पुनर्भरण सरकारने ऑक्टोबर २०१७मध्ये जाहीर केलेल्या २.११ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधील चालू आर्थिक वर्षांत द्यावयाच्या ६५,००० कोटी रुपयांच्या अर्थसाह्याचा एक भाग म्हणूनच केले जाणार आहे.
  • शिवाय, अनेक सरकारी बँका चालू वर्षांत भांडवली बाजारातून आणखी ५०,००० कोटी रुपयांचा निधी उभा करण्याच्या तयारीत आहेत.
  • देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुमारे १० लाख कोटी रुपयांच्या अनुत्पादित मालमत्तेचा (एनपीए) ताण वाहत आल्या असून, नवीन व्यवसायवाढीसाठी या बँकांनी अतिरिक्त भांडवलाची पूर्तता करणे नितांत गरजेचे बनले आहे.

आयसीडब्ल्यूएच्या महासंचालकपदी डॉ. टीसीए राघवन

  • राजनैतिक अधिकारी तसेच साक्षेपी इतिहासकार डॉ. टीसीए राघवन यांची इंडियन कौन्सिल फॉर फॉरेन अफेअर्स म्हणजे आयसीडब्ल्यूएच्या महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे.
  • राघवन हे दिल्ली विद्यापीठाचे पदवीधर असून, नंतर इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी घेऊन जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आधुनिक भारतीय इतिहासात त्यांनी पीएचडी पदवी घेतली.
  • १९८२मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण विभागाचे सहसचिव म्हणून काम केले.
  • पाकिस्तान व सिंगापूर येथे त्यांनी भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले. भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त म्हणून ३१ डिसेंबर २०१५ रोजी ते निवृत्त झाले.
  • राघवन यांचे नाव पाकिस्तान अभ्यासविषयक तज्ञ म्हणून अग्रक्रमाने घेतले जाते. ब्रिटन, भूतान व कुवेत या देशांमध्येही त्यांनी काम केले.
  • ‘अटेंडंट लॉर्ड्स’, ‘बैराम खान ॲण्ड अब्दुर रहमान’, ‘पोएट ॲण्ड कोर्टियर इन मुघल इंडिया’ ही त्यांनी लिहिलेली प्रमुख पुस्तके आहेत.
  • त्यात अलीकडेच ‘दी पीपल नेक्स्ट डोअर – दी क्युरियस हिस्टरी ऑफ इंडियाज रिलेशन्स विथ पाकिस्तान’ हे पुस्तक विशेष गाजते आहे. त्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा इतिहास राजनैतिक अधिकारी या नात्याने त्यांनी मांडला आहे.

इस्त्रायलकडून आपण ज्यू राष्ट्र असल्याची घोषणा

  • इस्त्रायलने आपण ज्यू राष्ट्रच आहोत अशीच घोषणा करत, त्यासाठी एक कायदा पास करण्यात आला आहे. इस्त्रायल संसदेतील ६२ सदस्यांपैकी ५५ जणांनी ज्यू राष्ट्राच्या बाजूने मतदान केले.
  • या नव्या कायद्यामुळे देशातील अरब नागरिकांसह इतरांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे हा कायदा पास होत असताना संसदेत अरब खासदारांनी या कायद्याचा कडाडून विरोध केला.
  • हिब्रू ही इस्त्रायलची राष्ट्रीय भाषा असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. तर अरबी भाषेला फक्त विशेष भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
  • तर हिब्रू कॅलेंडर हे अधिकृतरित्या राष्ट्रीय कॅलेंडर असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
  • नव्या कायद्यानुसार ज्यू नागरिकांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असणार आहे.
  • इस्त्रायलचे पंतप्रधान : बेंजमिन नेत्यानाहू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा