चालू घडामोडी - २३ मार्च २०१५

·        २३ मार्च : जागतिक हवामान दिन
·        २३ मार्च १९३१ : शहीद दिन (भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.)
·        भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
·        हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळकेShashi Kapoor wins Dadasaheb Phalke Award 2014 पुरस्कार २०१४ ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना जाहीर झाला आहे. स्वर्णकमळ, शाल आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
·        शशी कपूर यांनी १९६१ मध्ये आलेल्या धर्मपुत्रमधून चित्रपसृष्टीत पदार्पण केलं होतं.
·        शशी कपूर यांना २०११मध्ये 'पद्मभूषण' या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
·        ७७ वर्षीय शशी कपूर यांनी दिवार, कभी कभी, सत्यम शिवम सुंदरम, नमक हलाल या चित्रपटातील अभिनयातून त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शशी कपूर यांना दमदार अभिनयासाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत.
·        लंडन येथील रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदीVenkatraman Ramakrishnan - New President of Royal Society भारतीय वंशाचे नोबेल विजेते वैज्ञानिक व्यंकटरमण रामकृष्णन यांची निवड झाली आहे. या पदावर निवडले गेलेले व जन्माने भारतीय असलेले ते पहिले वैज्ञानिक आहेत.
·        रॉयल सोसायटीची स्थापना १६६० मध्ये झाली. रामकृष्णन हे सध्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष असलेले जनुकीय वैज्ञानिक सर पॉल नर्स यांची जागा घेतील.
·        सध्या ते ब्रिटिश वैद्यकीय संशोधन मंडळाच्या केंब्रिज येथील प्रयोगशाळेचे उपसंचालक व रॉयल सोसायटीचे फेलो आहेत.
·        त्यांना २००९ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल मिळाले होते. रायबोझोमची रचना उलगडून त्यांनी पेशींमध्ये प्रथिनांचे संश्लेषण कसे होते व प्रतिजैविकांचे (अँटिबायोटिक्स) कार्य कसे चालते यावर प्रकाश टाकला होता.
·        वेंकी यांचा जन्म तामिळनाडूतील चिदंबरम येथे १९५२ मध्ये झाला. त्यांचे भौतिकशास्त्रातील शिक्षण बडोदा विद्यापीठात झाले व नंतर ते अमेरिकेला गेले. तेथे ओहिओ विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवी घेतली.
·        २००३ मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो झाले व २०१२ मध्ये त्यांना ब्रिटनच्या राणीचा सर हा किताब मिळाला होता. २०१० मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण दिले.
·        सिंहांच्या रक्षणासाठी गीर अभयारण्यातून गेलेल्या लोहमार्गाच्या बाजूला कुंपण घालण्याचा निर्णय गुजरात राज्य सरकारने घेतला आहे.
·        रेल्वेच्या धडकेत आठ सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, किनारपट्टीलगतच्या सौराष्ट्राच्या प्रदेशात कुंपण उभारणे आणि जंगलात प्राण्यांच्या संचारासाठी भुयारी मार्ग तयार करण्यासाठी पर्यावरणमंत्री मंगूभाई पटेल यांनी राज्य विधानसभेत ११ कोटींची तरतूद केल्याचे आज सांगितले.
·        सिंगापूरचे पहिले पंतप्रधानLee Kuan Yew first pm of singapore passed away ली कुआन यू (वय ९१) यांचे निधन झाले. सिंगापूरला व्यवसायाचे वैश्विक केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते.
·        ली कुआन यांना सिंगापूरच्या आधुनिकीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते.
·        सुमारे तीन दशके (३१ वर्षे) सिंगापूरचे पंतप्रधान राहिलेल्या ली यांनी प्रशासन आणि आर्थिकदृष्ट्या सिंगापूरची खूप प्रगती केली. ली कुआन यू यांचे पुत्र ली सिएन लुंग सध्या सिंगापूरचे पंतप्रधान आहेत.
·        १९२३ मध्ये जन्मलेले ली कुआन यू १९५९ मध्ये सिंगापूरचे पहिले पंतप्रधान बनले आणि त्यानंतर त्यांनी सलग ३१ वर्षे सिंगापूरच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले.
·        आयएएसअधिकारी डी. के. रवी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी "सीबीआयचौकशीची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत केली.
·        भारतीय-अमेरिकी कादंबरीकार अखिल शर्मा यांनी जगातील नामवंत लेखकांना मागे टाकून ब्रिटनमधील प्रतिष्ठेचे २०१५ चे फोलिओ साहित्य पारितोषिकपटकावले आहे.
·        दिल्लीत जन्मलेल्या अखिल शर्मा यांच्या निम्न आत्मचरित्रात्मक अशा फॅमिली लाईफया कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे.
·        मूळ भारतीय असलेला अमेरिकेत स्थलांतरित झालेला गरीब मुलगा श्रीमंत होतो, असे त्याचे कथानक आहे.
·        मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा १० लेखकांच्या नावांची अंतिम यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये अमिताव घोष या एकमेव भारतीय लेखकाने स्थान मिळविले आहे.
·        कोलकातामध्ये जन्मलेल्या अमिताव घोष (५८) यांची 'सी ऑफ पॉपीज'साठी २००८च्या बुकर पुरस्कारासाठीच्या यादीत निवड झाली होती. मात्र त्यांना या पुरस्काराने हुलकावणी दिली होती.
·        भारत व नेपाळ यांच्यात नुकताच संयुक्त सैनिकी सराव सालझंडी, नेपाळ येथे पार पडला.
·        त्याला सूर्य किरण VIII नाव देण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा