चालू घडामोडी : २५ ऑक्टोबर
सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविले
- टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
- विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १००हून अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते.
- रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यात टाटा सन्सचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे.
- त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोहन सेन यांचा समावेश आहे.
- २९ डिसेंबर २०१२ रोजी रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर टाटा समूहाच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्रींची निवड करण्यात आली होती.
लुईस हॅमिल्टनचा ५०वा विजय
- लुईस हॅमिल्टनने अमेरिकन ग्रा. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीत जेतेपद पटकावून कारकीर्दीतला ५०वा विजय साजरा केला.
- जेतेपदांचे अर्धशतक पूर्ण करणारा हॅमिल्टन हा अॅलेन प्रोस्ट (५१) आणि मायकेल शूमाकर (९१) यांच्यानंतरचा तिसरा शर्यतपटू आहे.
- या विजयामुळे मर्सिडिज संघाचा हॅमिल्टन विश्वविजेत्या शर्यतपटूंच्या यादीत ३०५ गुणांसह दुसऱ्या, तर संघसहकारी निको रोसबर्ग ३३१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
- अमेरिकास सर्किटवर झालेल्या शर्यतीत हॅमिल्टनने १ तास ३८ मिनिटे १२.६१८ सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले.
- त्यापाठोपाठ रोसबर्गने ४.५२० सेकंदाने शर्यत पूर्ण करून दुसरे, तर रेड बुलच्या डॅनिएल रिकिआडरेने १९.६९२ सेकंदाने शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान मिळविले.
बालकृष्णला मिस्टर एशिया २०१६ किताब
- बेंगलुरू येथील व्हाइटफिल्ड परिसरात राहणारा २५ वर्षीय के. जी. बालकृष्ण याने बॉडीबिल्डिंगमधील ‘मिस्टर एशिया २०१६’ किताब जिंकला आहे.
- या विजयी कामगिरीनंतर बालकृष्ण ‘अर्नोल्ड श्वार्झनेगर ऑफ व्हिइटफिल्ड’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
- फिलिपाईन्स येथे पार पडलेल्या ५व्या ‘फिल-एशिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप’मध्ये बालकृष्णने ‘मिस्टर एशिया २०१६’ किताब जिंकला.
- २०१३मध्ये जर्मनीत भरविण्यात आलेल्या ‘मिस्टर युनिव्हर्स अंडर २४ ज्युनियर’ स्पर्धादेखील त्याने जिंकली होती.
- तर २०१४मध्ये ग्रीसमध्ये भरविण्यात आलेल्या ‘मिस्टर युनिव्हर्स अंडर २४ वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये देखील त्याने विजयी कामगिरी केली होती.
नाशिकमध्ये शांतता परिषद
- नाशिक येथे १९व्या जागतिक शांतता परिषदेचे उदघाटन राज्यपाल सी. विद्याराव यांचे हस्ते २४ ऑक्टोबर रोजी झाले.
- संयुक्त राष्ट्रांचा वर्धापनदिन, नामदार गोपालकृष्ण गोखले यांची १५१वी जयंतीनिमित्त या जागतिक शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
- यावेळी अणु आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना अणु क्षेत्रातील असाधारण कामगिरीबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- या परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर हे असून यावेळी डॉ. मो. स. गोसावी यांचा सहस्त्रचंद्रदर्शन निमित्त सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा