उद्योग व्यवसायासाठी अनुकूल राज्यांमध्ये महाराष्ट्र नववा
केंद्र सरकारच्या उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डिपार्टमेन्ट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन)ने उद्योग व्यवसायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला.
त्यानुसार उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी सुविधा तसेच व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया सोपी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र ९व्या क्रमांकावर आहे.
केंद्र सरकारने ३४० निकष लक्षात घेऊन ही राज्याची क्रमवारी जाहीर केली आहे.
त्यात आंध्रप्रदेश आणि तेलंगण ही दोन्ही राज्ये ९८.७८ टक्के गुणांसह संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर आहेत.
कधीकाळी पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात राज्याची घसरण झाल्याचे दिसून आले असून या यादीमध्ये गुजरातला तिसरे स्थान मिळाले आहे.
कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांना या यादीमध्ये ‘उदयोन्मुख नेतृत्व’ असे संबोधण्यात आले आहे.
तर हिमाचल प्रदेश, तमिळनाडू आणि दिल्ली या राज्यांनी कामगिरीमध्ये अजून सुधारणा करणे आवश्यक असल्याची सूचना करण्यात आली आहे.
औद्योगिक विकास विभाग पोलिसदल व जागतिक बॅंकेच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
राज्यांची क्रमवारी
१
तेलंगण, आंध्रप्रदेश
२
गुजरात
३
छत्तीसगड
४
मध्यप्रदेश
५
हरयाणा
६
झारखंड
७
राजस्थान
८
उत्तराखंड
९
महाराष्ट्र
रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
अत्यंत प्रतिष्ठेच्या रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार आहे.
वृत्तपत्र, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि सर्व भाषांमधील पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
२०१५मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या २८ वर्गवारीतील विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक कै. रामनाथ गोएंका यांचा वारसा जतन करण्यासाठी रामनाथ गोएंका स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने २००५मध्ये या पुरस्कारांची स्थापना करण्यात आली.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना आणि वैयक्तिक पातळीवरही या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
हा पुरस्कार देशातील माध्यमांत सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा मानला जातो. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ५० माध्यम समूहांतील ३०० पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अँडी मरेला व्हीएन्ना टेनिस स्पर्धेचे विजेतेपद
ब्रिटनच्या अँडी मरेने फ्रान्सच्या जो विलफ्रेड सोंगावर ६-३, ७-६ (७-६) अशी मात करत व्हीएन्ना टेनिस स्पर्धा जिंकली.
मरेचे हे गेल्या काही महिन्यांमधील सलग तिसरे जेतेपद ठरले आहे. या जेतेपदामुळे मरेच्या रँकिंग गुणांमध्ये वाढ झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा