चालू घडामोडी : २३ ऑक्टोबर
भारत तिसऱ्यांदा कबड्डी विश्वकप विजेता
- पहिल्या सत्रात पिछाडीवर असणाऱ्या भारताने इराणवर रोमहर्षक विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
- कठीण परिस्थितीत अजय ठाकूरने केलेल्या तुफानी आणि निर्णायक चढायांच्या जोरावर भारताने इराणचे आव्हान ३८-२९ असे मोडून काढले
- इराणचा कर्णधार मेराज शेखच्या दमदार कामगिरीमुळे पहिल्या सत्रात भारत अडखळताना दिसला.
- पहिल्या सत्रात भारत १८-१३ ने पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करत विजय मिळविला.
- या एका सामन्यात चढायांमध्ये १२ गुण मिळवणारा अजय ठाकूर भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
- याआधी भारताने २००४ आणि २००७ मध्ये कबड्डी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.
- महाराष्ट्रात पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर सुमारे ९ वर्षांनंतर अहमदाबादमध्ये कबड्डी विश्वकप २०१६चे आयोजन करण्यात आले होते.
- आतापर्यंतच्या तिन्ही विश्वकप अंतिम सामन्यामध्ये भारताने अंतिम फेरीत इराणचाच पराभव केला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन
- रंगमंचावर नृत्य सादर करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले.
- भरत नाट्य मंदिर येथे नाट्यत्रिविधा हा नृत्य, नाट्य, संगीताचा विशेष कार्यक्रम २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजिण्यात आला होता.
- यात अश्विनी एकबोटे यांच्यासह डॉ. रेवा नातू, चिन्मय जोगळेकर अनुपमा बर्वे या कलावंतांचा समावेश होता.
- हरहुन्नरी अभिनेत्री असलेल्या एकबोटे यांनी चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता.
- अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्यावरही त्यांचे तितकेच प्रेम होते. त्या नृत्यसंस्थाही चालवत होत्या.
- चित्रपट : देबू, महागुरू, बावरा प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, हायकमांड, एक पल प्यार का, क्षण हा मोहाचा, मराठा टायगर्स
- मालिका : दुहेरी, दूर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, कशाला उद्याची बात, अहिल्याबाई होळकर, ऐतिहासिक गणपती
- नाटक : त्या तिघींची गोष्ट, एका क्षणात, संगीत बावणखणी
वडोदरा देशातील दुसरे हरित विमानतळ
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथे नव्या एकात्मिक विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन केले. कोचीनंतर आता हे देशातील दुसरे हरित विमानतळ आहे.
- अशा प्रकारचे पहिले विमानतळ कोची येथे असून वडोदरामधील दुसरे विमानतळ देशाला अर्पण करण्यात आले आहे.
- यावेळी मोदी यांनी वडोदरामध्ये पहिले रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णयदेखील जाहीर केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा