जपानचे शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांना नोबेल पुरस्कार
जपानचे ख्यातनाम शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पेशींमधील विघटन आणि पुनर्रचनेविषयी संशोधन केल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पेशींचा स्वनाश तसेच त्यांच्या काही भागांचा फेरवापर शरीरात कसा होतो हे त्यांनी यिस्टवरील संशोधनातून सिद्ध केले आहे.
ते वैद्यकशास्त्रात नोबेल मिळवणारे जपानचे सहावे संशोधक आहेत. आतापर्यंत जपानच्या २३ जणांना विविध शाखांत नोबेल मिळाले आहे.
आयएमएफच्या चलनांमध्ये युआनचा समावेश
आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) गंगाजळीतील चलनांमध्ये चीनच्या युआन चलनाचा समावेश झाला आहे.
आयएमएफच्या मुक्त व्यापारयोग्य चलनांमध्ये अमेरिकी डॉलर, युरो, पौंड आणि येनचा समावेश होता. आता यात युआनचा समावेश झाला आहे.
आयएमफकडून मिळणारे कर्ज या ठराविक चलनांमध्ये संबंधित देशांना स्वीकारता येते. चीनमध्ये युआनला लोकांचा पैसा असे संबोधले जाते.
चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष देशाचा स्थापना दिन साजरा करीत असतानाच युआनचा समावेश झाल्याची घोषणा झाली आहे.
युआनचा समावेश करण्याचे सूतोवाच मागील वर्षी आयएमएफने केले होते. युआनचा समावेश केल्याने वित्तीय बाजारपेठांवर फारसा परिणाम होणे अपेक्षित नाही.
मात्र आयएमएफ आता अधिकृत गंगाजळीत युआनचा समावेश करणार असल्याचे चीनच्या आर्थिक आणि विनिमय धोरणाला बळ मिळणार आहे.
स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक
‘स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक’ मोहिमेचा भाग म्हणून साधून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिकबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधत ही घोषणा केली.
सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे, तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
स्वच्छ भारत मोहिमेचा भाग म्हणून ही प्लास्टिकबंदी घालण्यात येत असून यामधून प्लास्टिक बाटल्या वगळण्यात आल्या आहेत.
स्मारकापासून १००मीटरच्या परिघात ही बंदी लागू राहील. एक महिन्यानंतर या मोहिमेचा आढावा घेऊन गरज पडल्यास दंडाची आकारणीही करण्यात येईल.
गुजरात व आंध्र प्रदेश देशातील पहिली हागणदारीमुक्त राज्ये
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवरगुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये देशातील पहिली हागणदारीमुक्त राज्ये म्हणून घोषित केली आहेत.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाला २ ऑक्टोबर रोजी २ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.
याशिवाय आंध्रप्रदेशला मोठ्या शहरांतील घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून १८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणाही करण्यात आली.
वेलिंगकर यांचा ‘गोवा सुरक्षा मंच’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यात ‘गोवा सुरक्षा मंच’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.
स्थानिक भाषेच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांवर सार्वजनिक टीका करणाऱ्या वेलिंगकर यांची ३१ ऑगस्टला पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांनी ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’चे वरिष्ठ नेते अनंत शिरोडकर यांच्या मदतीने राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
या नव्या राजकीय पक्षाची धुरा शिरोडकर यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
बिहारमध्ये नवे दारुबंदी धोरण
बिहारमध्ये उच्च न्यायालयाने दारूबंदी धोरण रद्द केल्याच्या दोन दिवसानंतरच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नवे दारुबंदी धोरण जाहीर केले आहे.
नव्या दारुबंदी धोरणातील नियम व अटी अधिक कठोर आहेत. यात कारावासाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तर, दंडाची रक्कमही अधिक असेल.
एखाद्या घरात दारुची बाटली आढळल्यास त्या घरातील वयस्कर व्यक्तींना अटक करण्यात येईल, दारुबंदीचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या भागात सामुदायिक दंड लावण्यात येईल.
नव्या धोरणानुसार पोलिस अधिकाऱ्यांकडून एखाद्या व्यक्तीला जर या प्रकरणी त्रस्त केले जात असेल तर त्यांच्याविरुद्धही खटला चालविला जाईल.
भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरूपी प्रतिनिधी : सईद अकबरुद्दीन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा