चालू घडामोडी : १० ऑक्टोबर

ऑलिव्हर हार्ट आणि बेंट हॉमस्ट्रॉम यांना अर्थशास्त्राचा नोबेल

  • ब्रिटिशवंशीय अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंट हॉमस्ट्रॉम यांना प्रतिष्ठेचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • हार्ट आणि हॉमस्ट्राँग यांच्या अर्थशास्त्रातील कॉन्ट्रॅक्ट (करार) थिअरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • कंत्राट केल्याने लोक परस्परविरोधी हितसंबंधांमध्ये कसा मेळ घालू शकतात, याचे विवेचन या दोघांनी आपल्या सिद्धांताद्वारे केले.
  • हार्ट आणि हॉमस्ट्रॉम यांची कॉन्ट्रॅक्ट थिअरीवरील अभ्यास आणि निरीक्षणे अत्यंत मौल्यवान असून, त्यांचा शोध हा प्रत्यक्ष जीवनात विविध संस्था आणि व्यक्तींसाठी लागू होतो.
  • कॉन्ट्रॅक्ट थिअरी विवादास्पद हितसंबंधांमध्ये उपयुक्त अशी असून, त्याविषयीचे संशोधन हे येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
  • नोबेल पुरस्काराची सुरूवात १८९५ साली झाली पण अर्थशास्त्रातील पुरस्कार देण्याची सुरूवात १९६९ साली करण्यात आली.
  • ८ दशलक्ष स्वीडिश क्रोनर व पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 काय आहे कॉन्ट्रॅक्ट थिअरी? 
  • मुळात करार हे सहकार्य आणि विश्वासावर होत असतात. काहीवेळा अविश्वास व नमूद गोष्टींचे उल्लंघन केल्यास करार संपुष्टात येत असतो.
  • भविष्यातील कार्यपद्धती सुकर होण्यासाठी करार हे सर्वांत महत्त्वाचे कारण असते.
  • कॉन्ट्रॅक्ट थिअरी ही कराराचे स्वरूप, त्याची व्याप्ती विशद करत कराराचा आकृतिबंध समोर मांडते.
  • कराराच्या विविध पद्धती व आकृतिबंध का असतात हे उलगडून सांगणे या थिअरीचे महत्त्वाचा उद्देश होय.
  • करारासंदर्भातील विशिष्ट परिस्थिती व संदर्भ ही या थिअरीची मूळ अंगे आहेत, तर कराराच्या मूळ समस्येवर विचार करायला भाग पाडणे ही या थिअरीचे मुख्य बलस्थान आहे.
  • याचा वास्तविक जीवनातील करार आणि संस्था, याचसोबत नवीन कराराची रचना करताना येणाऱ्या समस्यांवर ही थिअरी रामबाण इलाजासारखी काम करते.

जवानांबरोबरच्या प्राण्यांनाही विशेष पदके

  • सीमेवर सामान वाहून नेणे आणि गस्त घालण्यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये जवानांना साथ देणाऱ्या प्राण्यांनाही पहिल्यांदाच विशेष पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.
  • भारत-चीन सीमेवर तैनात इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) दलाने हा निर्णय घेतला असून, त्यांच्यामार्फत ॲनिमल ट्रान्सपोर्ट आणि के ९ (श्वान) ही पदके दिली जाणार आहेत.
  • यासाठी दलाने थंडरबोल्ट या घोड्याची आणि सोफिया या मादी श्वानाची निवड केली आहे.
  • आगामी ५५व्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान या दोन्ही प्राण्यांना विशेष पदकाने सन्मानित केले जाणार आहे.
  • यापूर्वी या प्राण्यांच्या उत्कृष्ट कामासाठी दलप्रमुख किंवा अन्य अधिकाऱ्यांना नियमित प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले जात होते.
  • देशातील नक्षलविरोधी मोहिमांसाठी आणि पायी गस्त घालण्यासारख्या कठीण कामांसाठी पहिल्यांदा बेल्जियम मालीनोइस जातीच्या कुत्र्यांचा दलात समावेश करण्याचे श्रेय आयटीबीपीकडे जाते.
  • त्याचवेळी या दलाकडे पारंपरिक पद्धतीने घोडी, खेचर आणि छोट्या घोड्यांची एक मजबूत प्राणी वाहतूक संस्था आहे, जी चीन सीमेवर अतिशय उंच भागात पहारा देण्यासाठी जवानांना मदत करते. 

जितू राय आयएसएसएफ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता

  • भारताचा अनुभवी पिस्तूल नेमबाज जीतू राय हा आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे.
  • जीतूने अंतिम लढतीत सर्बियाचा दामिर मिकेच याला २९-६, २८-३ अशा गुणफरकाने मागे टाकून स्पर्धा जिंकली. त्याला ट्रॉफीसह ५००० युरोचा रोख पुरस्कार मिळाला.
  • विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या सर्व नेमबाजांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाते.
  • १० मीटर एअर रायफल आणि एअर पिस्तूल या प्रकारात स्पर्धेचे आयोजन केले जाते. रायफल चॅम्पियन्स ट्रॉफी रशियाचा सर्जेई कामेनस्की याने जिंकली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा