हवामान बदलास अटकाव करण्यासाठी किगाली (रवांडा) येथे सुरू असलेल्या जागतिक परिषदेत एका महत्वपूर्ण करार १९० देशांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला.
हायड्रोफ्लुरोकार्बन (एचएफसी) या वर्गातील १९ विविध वायूंचे उत्पादन आणि वापर टप्प्याटप्प्याने कमी करून, सन २०५० पर्यंत तो पूर्णपणे बंद करण्याचा हा करार आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पॅरिस करारानंतर हवामान बदलास अटकाव करण्यासाठी झालेला हा दुसरा महत्त्वाचा जागतिक करार आहे.
जागतिक तापमानवाढ ओद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तुलनेत २ अंश सेल्सियसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवून पॅरिस करार करण्यात आला आहे.
ते साध्य करण्यासाठी आताच्या या ‘किगाली दुरुस्ती’चा मोठा हातभार लागू शकेल.
पॅरिस करारास ७३ हून अधिक देशांची मान्यता दिल्याने तो येत्या ४ नोव्हेंबरपासून बंधनकारक होणार आहे.
हा नवा करार ‘किगाली दुरुस्ती’ (किगाली अमेंडमेंट) म्हणून ओळखला जाणार आहे.
हवामान बदलाविषयीची पुढील जागतिक शिखर परिषद ७ नोव्हेंबरपासून मोरोक्कोत मर्राकेश येथे सुरू होणार आहे.
अरुणाचलमध्ये भाजप सत्तेत
भारतीय जनता पक्षाने पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलसोबत (पीपीए) हातमिळवणी करत अधिकृकरीत्या अरुणाचलच्या सत्तेत प्रवेश केला.
भाजपचे ज्येष्ठ आमदार तमियो टागा यांनी पेमा खांडू सरकारच्या मंत्रिमंडळात प्रवेश करत मंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्यपाल व्ही, षन्मुखानाथन यांनी टागा यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यामुळे आता अरुणाचल हे भाजप सत्तेत असलेले १४ वे राज्य ठरले आहे.
टागा यांना समाविष्ट करण्यासाठी खांडूंना उद्योग, वस्त्रोद्योग आणि हस्तकला आणि सहकारमंत्री तपंग तलोह यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले.
राज्याच्या ६० सदस्यांच्या या विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार होते. मात्र खांडू यांनी ४३ आमदारांसह काँग्रेसमधून बाहेर पडत पीपीएमध्ये प्रवेश केला.
१६ जुलैला त्यांनी नबाम तुकी यांची जागा घेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
अरुणाचल विधानसभेत आता पीपीएचे ४४, भाजपचे ११, काँग्रेसचे ३ आणि २ अपक्ष सदस्य आहेत.
पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे अडचणीत
पाकिस्तानी कलाकार असलेले एकही सिनेमे दाखवणार नाही, असा निर्णय सिनेमा ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत हा घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर एक्झिबिटर्स असोसिएशनने सर्व सदस्यांना करण जोहरचा ‘ए दिल है मुश्किल’ सिनेमा प्रदर्शित न करण्यासंदर्भातील सूचनाही दिली आहे.
‘ए दिल है मुश्किल’मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने हा सिनेमा अडचणीत आला आहे.
मुंबईसह महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत.
पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबत नसल्याने भारताने पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचाच एक भाग म्हणून 'इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन'ने (इम्पा) भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या काम करण्यावर बंदी घातली.
या निर्णयाच्या एक पाऊल पुढे जात, सिनेमा ओनर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे न दाखवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा