चालू घडामोडी : ११ ऑक्टोबर
देशाच्या करसंकलनात २६ टक्के वाढ
- चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशाच्या अप्रत्यक्ष कर संकलनात २६ टक्के तर प्रत्यक्ष कर संकलनात ९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलन रु. ७.३५ लाख कोटी झाले आहे.
- एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन रु. ४.०८ लाख कोटींवर पोचले आहे. प्रत्यक्ष कर संकलन रु. ३.२७ कोटी झाले आहे.
- उत्पादन शुल्कात ४६ टक्के वाढ झाल्याने यंदा एकूण अप्रत्यक्ष करांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
- एकूण चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारने अप्रत्यक्ष कर संकलनाचे रु. ७.७९ लाख कोटी तर प्रत्यक्ष कर संकलनाचे रु. ८.४७ लाख कोटी ध्येय राखले आहे.
- केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१६-१७साठी रु. १६.२६ लाख कोटी एकूण कर संकलनाचे लक्ष्य ठेवले आहे.
पम्पोरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला
- काश्मीरमधील पम्पोर भागातील उद्योजकता विकास केंद्रात (ईआयडी) घुसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले.
- तीन दिवस चाललेल्या या चकमकीमध्ये भारतीय लष्कराचा एक सैनिक जखमी झाला आहे.
- १० ऑक्टोबर रोजी सकाळी दोन ते तीन दहशतवादी या इमारतीत घुसले होते. सुरक्षा दलाने आतापर्यंत २ दहशतवादी ठार केले आहेत.
- दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलाने इमारतीवर रॉकेट लाँचर आणि ग्रेनेडचा मारा केला.
- पम्पोर येथील उद्योजकता विकास संस्थेमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे.
- दहशतवाद्यांनी याच वर्षी फेब्रुवारीत याच उद्योजकता विकास संस्थेच्या इमारतीस लक्ष्य केले होते.
- त्यावेळची चकमक ४८ तास चालली होती. त्यात ३ जवान हुतात्मा झाले, तर १ नागरिक मारला गेला होता. तसेच ३ दहशतवादीही कारवाईत मारले गेले होते.
तेलंगणमध्ये २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती
- तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्यात २१ नवीन जिल्ह्यांची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात आता एकूण ३१ जिल्हे झाले आहेत.
- राव यांच्या अह्स्ते मेडक जिल्ह्यातून तयार झालेल्या सिद्धीपेठ जिल्ह्याचे उद्घाटन करण्यात आले.
- विधानसभेतील अध्यक्ष, राज्यातील मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत अन्य नव्या जिल्ह्यांतही कार्यक्रम झाला.
- नव्या जिल्ह्यांचा स्थापन दिन आणि विजयादशमीचा सण आज मोठ्या उत्साहात राज्यात साजरा करण्यात आला.
- आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण हे देशातील २९वे राज्य म्हणून २ जून २०१४ रोजी उदयास आले आहे.
समाजसेविका परमेश्वर गोदरेज कालवश
- गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदि गोदरेज यांच्या पत्नी, डिझायनर व समाजसेविका परमेश्वर गोदरेज यांचे १० ऑक्टोबर रोजी निधन झाले.
- सत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या गोदरेज या फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध होत्या.
- परमेश्वर गोदरेज यांनी एचआयव्ही एड्स असलेल्या रुग्णांसाठी विशेष कार्य केले होते.
- त्यांनी २००४साली या रुग्णांसंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गेअर यांच्यासोबत ‘हिरोज प्रोजेक्ट’ सादर केला होता.
- या प्रकल्पाला बिल गेट्स आणि क्लिंटन यांच्या स्वयंसेवी संस्थांचा हातभार लागला होता.
- त्यांनी महिला व बालकांच्या आरोग्यसंबंधी क्षेत्रातही काम केले होते.
सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७चे उत्पादन बंद
- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७चे उत्पादन थांबवले आहे.
- अमेरिकेमध्ये विमान प्रवासादरम्यान एका ग्राहकाच्या सॅमसंग नोट ७ फोनला अचानक आग लागल्याची घटना घडली.
- या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ धारकांना फोन न वापरण्याची सूचना दिली आहे.
- फोनला अचानक आग लागणे, फोनचा स्फोट होणे, आणि बॅटरी तापणे या कारणांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
- सॅमसंग नोट ७मधील बॅटरीच्या समस्येमुळे कंपनीने २.५ मिलियन हँडसेट परत मागवून घेतले आहेत व फोनची निर्यात व विक्रीदेखील रोखली आहे.
- स्मार्टफोनमधील बॅटरीसंबंधी समस्येमुळे कंपनीला दोन महिन्यात दुसऱ्यांदा फोनची विक्री थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
- दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगचा गॅलेक्सी नोट ७ हा फोन अजूनही भारतामध्ये लाँच नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा