भारतातील बहुतांश कैदी हे समाजातील दुर्बल समाजातील असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आले आहे.
या अहवालानुसार देशातील तुरूंगात असणाऱ्या प्रत्येक तीनपैकी दोन कैदी हे अनुसूचित जाती-जमाती आणि अन्य मागासवर्गीय वर्गातील आहेत.
याशिवाय, बहुतांश कैद्यांचे शिक्षण दहावीपेक्षा कमी असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे.
भारतातील एकूण कैद्यांपैकी ९५ टक्के हे पुरूष आहेत. देशातील सर्वाधिक महिला कैद्यांची संख्या (३,५३३) उत्तरप्रदेशात आहे.
तुरूंगातील गर्दी लक्षात घेता छत्तीसगढ पहिल्या क्रमांकावर, दादरा आणि नगर हवेली दुसऱ्या तर दिल्लीतील तुरूंग तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
पोलीस आणि न्यायवस्थेकडून दलित समाजासंदर्भात भेदभाव करण्यात येत असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
एनसीआरबी या संस्थेकडून देशभरातील कैद्यांची माहिती नोंदविण्यात येते. या संस्थेकडूनकडून २०१५साली हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचे निधन
जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला आणि जपानी गिर्यारोहक जुन्को ताबेई (वय ७७) यांचे निधन झाले.
वयाच्या ३५व्या वर्षी १९७५मध्ये एव्हरेस्ट सर करत त्या एव्हरेस्टवर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
७ खंडांतील ७ सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या पहिल्या महिला बनण्याचा मानही त्यांनी मिळविला. त्यांनी ६०हून अधिक देशांत गिर्यारोहण केले.
त्यांनी जपानमध्ये १९६९मध्ये महिलांचा पहिला गिर्यारोहण क्लब सुरू केला. ‘लेटस गो ऑन अॅन ओव्हरसीज एक्सपीडिशन बाय अवरसेल्व्हज’ हे त्या क्लबचे घोषवाक्य होते.
२०११च्या भूकंप आणि त्सुनामीची झळ बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी माऊंट फुजी हे शिखर सर केले होते. हे त्यांचे अखेरचे गिर्यारोहण ठरले.
माऊंट एव्हरेस्टच्या चढाईदरम्यान हिमस्खलनामुळे त्या बर्फाखाली गाडल्या गेल्या होत्या. मात्र, एका गाईडने बर्फाखालून सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांनी चढाई सुरू ठेवली.
२०१२मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान होऊनही त्या जिद्दीने त्या रोगाशी लढत गिर्यारोहणाचा छंद जोपासत होत्या.
एटी ऍण्ड टी कंपनीकडून टाईम वॉर्नरचे अधिग्रहण
एटी ऍण्ड टी कंपनीने ८५.४ अब्ज डॉलरला टाईम वॉर्नर ही कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे टाईम वॉर्नरच्या मनोरंजन व माध्यम व्यवसायाचा ताबा दूरसंचार कंपनी असलेल्या एटी ऍण्ड टी कंपनीकडे येणार आहे.
हा व्यवहार कर्ज व रोखे अशा स्वरूपात होणार आहे. या व्यवहारातून टाईम वॉर्नरला प्रतिसमभाग १०७.५० डॉलर मिळणार आहेत.
या व्यवहारामुळे टाईम वॉर्नरच्या एचबीओ, सीएनएन आणि वॉर्नर ब्रदर्स यांसारख्या वाहिन्या एटी ऍण्ड टीच्या ताब्यात येतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा