चेक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताला ५ सुवर्ण
- चेक प्रजासत्ताक येथील ४८व्या ग्रँड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताने ५ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशा एकूण ८ पदकांची कमाई केली.
- जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता शिवा थापा (६० किलो), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (६९ किलो), अमित फांगल (५२ किलो), गौरव बिधुरी (५६ किलो) आणि सतीश कुमार (+९१ किलो) यांनी सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
- कविंदर बिश्त (५२ किलो) आणि मनीष पनवार (८१ किलो) यांनी रौप्यपदके, तर सुमित सांगवानने (९१ किलो) उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून कांस्यपदक मिळवले.
रशिया अमेरिकेमध्ये पुन्हा तणाव
- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेच्या राजनैतिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रशिया सोडून पुन्हा अमेरिकेत परतण्याचे आदेश दिले.
- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हस्तक्षेप आणि युक्रेनमधून ‘क्रिमीया’ला बाहेर काढण्याचा डाव यामुळे अमेरिकेने काही दिवसांपूर्वी रशियावर निर्बंध घातले होते.
- अमेरिकेच्या सिनेटमध्ये झालेल्या मतदानात ट्रम्प एकाकी पडले आणि सिनेटने रशियावर निर्बंध टाकण्याचा प्रस्ताव मंजूर केला. अमेरिकेच्या या निर्णयाचा रशियाने निषेध नोंदवला होता.
- रशियात अमेरिकेचे १००० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यातील ७५५ जणांनी मायदेशी जावे असे आदेश पुतिन यांनी दिले आहेत.
- यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून आता संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेनेच पुढाकार घ्यावा असे पुतिन यांनी म्हटले आहे.