आसियानमधील १० देशांना प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण
- प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी भारत आसियान संघटनेच्या १० सदस्य देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देणार आहे.
- ‘अॅक्ट इस्ट’ या नव्या धोरणानुसार पूर्व आशियातील या देशांशी संवाद साधण्याची नवी संधी भारताला या निमित्ताने मिळणार आहे.
- २०१४साली रालोआ सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर ‘लूक इस्ट’बरोबर ‘अॅक्ट इस्ट’ धोरण जाहीर करण्यात आले होते.
- पूर्व आणि आग्नेय आशियातील देशांशी सौहार्दपुर्ण संबंध वृद्धींगत करणे हे त्यामागचे मूळ ध्येय होते.
- प्रजासत्ताक दिनासाठी इतक्या मोठ्या संख्येने पाहुणे म्हणुन बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- गेल्या काही आठवड्यांपासून चीन करत असलेल्या घुसखोरीमुळे वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारत आघाडीवर
- ओडीशात सुरु असलेल्या २२व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेच्या पदकतालिकेत भारताने प्रथमच अव्वल स्थान मिळवण्याची किमया साधली.
- यंदाच्या स्पर्धेत भारताने १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि १२ कांस्यपदकांसह एकूण २९ पदकांवर मोहोर उमटवत पदकतालिकेत प्रथम स्थान मिळविले.
- आशियाई खंडात वर्चस्व गाजवणाऱ्या चीन संघाला ८ सुवर्ण, ७ रौप्य व ५ कांस्य अशा एकूण २० पदकांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
- जकार्ता येथे १९८५मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने २२ पदकांची कमाई केली होती. ही आतापर्यंत भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.
भारताला सुवर्णपदक जिंकून देणारे खेळाडू | |
---|---|
खेळाडू | क्रीडा प्रकार |
महम्मद अनास | ४०० मीटर धावणे (पुरुष) |
निर्मला शेरॉन | ४०० मीटर धावणे (महिला) |
अजय कुमार | १५०० मीटर धावणे (पुरुष) |
पी यू चित्रा | १५०० मीटर धावणे (महिला) |
मनप्रीत कौर | गोळाफेक |
सुधा सिंग | ३००० मीटर स्टीपलचेस |
लक्ष्मणन गोविंदन | ५ हजार मीटर धावणे |
लक्ष्मणन गोविंदन | १० हजार मीटर धावणे |
नीरज चोप्रा | भालाफेक |
स्वप्ना बर्मन | हेप्टॅथलॉन |
पुरुष संघ* | ४ बाय ४०० मीटर रिले शर्यत |
महिला संघ* | ४ बाय ४०० मीटर रिले शर्यत |
- *कुंजू महंमद, अमोद जेकब, महम्मद अनास व राजीव आरोकिया या भारतीय पुरुष संघाने ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीचे विजेतेपद पटकावले.
- *तर देबश्री मुझुमदार, एम.आर.पुवम्मा, जिस्ना मॅथ्यू व निर्मला शेरॉन या भारतीय महिला संघाने ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन
- बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे ९ जुलै रोजी वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.
- हिंदीत चित्रपटसृष्टीत ‘आनंद’ चित्रपटामुळे नावाजल्या गेलेल्या सुमिता सन्याल यांचे बंगाली चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान होते.
- हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आनंद’ (१९७०) या चित्रपटात सुमिता यांनी साकारलेली ‘रेणू’ ही भूमिका अनेकांच्या मनात घर करुन गेली होती.
- सुमिता सन्याल यांचे खरे नाव मंजुळा सन्याल असून त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ला दार्जिलिंगमध्ये झाला होता.
- त्यांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या असून त्यात बंगाली चित्रपटांचे प्रमाण जास्त आहे.
- हिंदी चित्रपट आणि नाटकांसोबतच मालिकांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या.
- ‘कुहेली’, ‘आशिर्वाद’, ‘गुड्डी’, ‘मेरे अपने’, सत्यजित राय यांच्या ‘नायक’ या चित्रपटांमध्ये सन्याल यांची भूमिका होती.
आयुष मंत्रालयाच्या सचिवपदी राजेश कोटेचा
- नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेत पहिल्यांदाच आयएएस नसलेल्या व्यक्तीला मंत्रालयाच्या सचिवपदी नेमले आहे.
- राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधीत वैद्य राजेश कोटेचा यांची मोदी सरकारने आयुष मंत्रालयाचे विशेष सचिवपदी नियुक्ती केली आहे.
- कोटेचा यांची ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ते एक आयुर्वेदिक डॉक्टर असून यापूर्वी त्यांनी जामनगर येथील गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले आहे.
- कोटेचा हे एक गुजराती उद्योगपतीही आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर वर्ष २०१५मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- कोटेचा हे जागतिक आयुर्वेद संस्थेचे विश्वस्त देखील आहेत. ही संस्था राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची शाखा विज्ञान भारतीशी संबंधित असल्याचे म्हंटले जाते.
- कोटेचा हे विज्ञान भारतीचे सल्लागार देखील आहेत. देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी संघाद्वारे विज्ञान भारतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाते.
- यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने आयएएस अधिकारी परमेश्वरम अय्यर यांची सेवानिवृत्तीनंतरही पेयजल, स्वच्छता मंत्रालयाचे सचिव म्हणून नेमणूक केली होती.
- कोटेचा यांनी २९ जून रोजी आयुष मंत्रालयाच्या विशेष सचिव पदाचा पदभार घेतला. जोपर्यंत कोटेचा यांचा मंत्रालयात ताळमेळ बसत नाही तोपर्यंत आरोग्य सचिव सी के मिश्रा हे त्यांना मदत करणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा