१४ जून २०१७ रोजी मॅन बुकर फाउंडेशनकडून लंडन (ब्रिटन) येथे मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार डेविड ग्रासमन यांना दिला गेला. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले इस्रायली लेखक आहेत.
डेविड ग्रासमन यांना हा पुरस्कार ‘ए हॉर्स वॉक्स इनटू ए बार’ (A Horse Walks into a Bar) या कांदबरीसाठी दिला गेला.
या कांदबरीचे अनुवादक जेसिका कोहेन (अमेरिका) आणि प्रकाशक जोनाथन केप आहेत. लेखक आणि अनुवादक या दोघाना प्रत्येकी २५,००० पौंड अशी पुरस्काराची रक्कम विभागून देण्यात आली
अमेरिकेने पाकिस्तानची मदत रोखली
पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कविरोधात योग्य कारवाई न केल्याने अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी मदत रोखली आहे.
संरक्षण सचिव जिम मॅटिस यांनी पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कविरोधात पुरेशी कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे नॅशनल डिफेन्स अॅथॉराइजेशन अॅक्ट (एनडीएए) नुसार २०१६ या आर्थिक वर्षासाठी अमेरिका पाकिस्तानला निधी देणार नाही.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील मदत म्हणून अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या निधीसाठीच्या अटी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला होता.
आर्थिक मदत देण्यापूर्वी पाकने दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत समाधानकारक प्रगती दाखवायला हवी, अशीही अट त्यात आहे.
दहशतवादाला पाककडून समर्थन मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर या अटी टाकण्यात आल्या आहेत.
रिलायन्सची बालाजी टेलिफिल्म्समध्ये भागीदारी
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आघाडीची चित्रपट व मालिका निर्माती कंपनी बालाजी टेलिफिल्म्समध्ये भागीदारी घेतली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने बालाजी टेलिफिल्म्समध्ये ४१३.२८ कोटी रूपयांची गुंतवणूक करून २४.९ टक्के भागीदारी घेतली आहे.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बालाजी टेलिफिल्म्सचे नाव आघाडीवर आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये बालाजी टेलिफिल्म्सने विविध भाषांमध्ये चित्रपट आणि कार्यक्रम बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
बालाजी टेलिफिल्म्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात केलेल्या गुंतवणुकीमुळे इंडस्ट्रीमध्य़े मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बालाजी टेलिफिल्म्सचे अध्यक्ष: ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा