युएस स्टेट डिपार्टमेंटद्वारे केलेल्या दहशतवाद्यांशी संबंधीत सर्वेक्षणानुसार दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
जगभरात इराक आणि अफगाणिस्तान या दोन देशानंतर सर्वाधिक दहशतवादी हल्ले भारतात झाले आहेत. याआधी तिसऱ्या स्थानावर पाकिस्तान होता.
युएस स्टेट डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात मरणाऱ्यांची आणि जखमींची संख्या पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त आहे.
२०१६ या वर्षासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले असून, या वर्षभरात जगभरात ११,०७२ दहशतवादी हल्ले घडविण्यात आले.
यामध्ये भारतात ९२७ (१६ टक्के) दहशतवादी हल्ले झाले. २०१५मध्ये भारतात हीच संख्या ७९८ होती.
२०१५मध्ये दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या ५००च्या आसपास होती. तर २०१६मध्ये वाढ होऊन जखमींची संख्या ६३६ इतकी झाली.
२०१६मध्ये भारतात सर्वाधिक दहशतवादी हल्ले जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर आणि झारखंडमध्ये झाले आहेत.
या सर्वेक्षणानुसार, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. २०१५मध्ये पाकिस्तानमध्ये १०१० दहशतवादी हल्ले झाले होते, तर २०१६मध्ये ७३४ हल्ले झाल्याची नोंद आहे.
या सर्वेक्षणानुसार, जगभरातील सर्वाधिक घातक संघटनांच्या यादीत इसिस, तालिबान आणि नक्षलवादी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.
नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी टी आर झेलियांग
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर नागालँडच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले टी आर झेलियांग यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करत विश्वासदर्शक ठराव जिंकला.
६० सदस्यीय विधानसभेत त्यांनी ४७ मते मिळवली. माजी मुख्यमंत्री शुऱ्होझेली लिझेत्सु यांच्या बाजूने ११ जणांनी मतदान केले.
झेलिआंग यांच्या बाजूने एनपीएफच्या ३६ जणांनी, भाजपच्या ४ जणांनी आणि ७ अपक्षांनी मतदान केले.
यापूर्वी १९ जुलै रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री शुरहोजेली लीजित्सू यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपाल पी बी आचार्य यांनी दिला होता.
परंतु लीजित्सू आणि त्यांचे सहकारी सभागृहात अनुपस्थित राहिल्यामुळे झेलियांग यांना नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले होते.
हॉलीवूड अभिनेते जॉन हर्ड यांचे निधन
‘होम अलोन’ या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेले हॉलीवूड अभिनेते जॉन हर्ड यांचे २१ जुलै रोजी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
‘होम अलोन’ या सिनेमात जॉन यांनी केविन मॅककॅलिस्टर या मुख्य पात्राच्या वडिलांची भूमिका वठवली होती.
१९७० पासून त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीला सुरूवात केली होती. १९९० मध्ये आलेला ‘होम अलोन’ या सिनेमाने हा अभिनेता घराघरात पोहोचला.
जॉन हर्ड यांनी कटर्स वे, सीएचयूडी अॅण्ड ग्लॅडिएटर या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
१९९९ मध्ये टिव्ही सिरीज ‘द सोप्रानोज’मधील त्यांच्या उत्तम अभिनयाबद्दल जॉन हर्ड यांना अॅमी पुरस्कारही मिळाला होता.
लिंकिंग पार्कचा गायक चेस्टर बेनिंग्टनची आत्महत्या
अमेरिकेतील सुप्रसिद्ध म्युझिक बॅण्ड ‘लिंकिंग पार्क’चा मुख्य गायक चेस्टर बेनिंग्टनने २० जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
नंब आणि समव्हेअर आय बिलॉन्ग या गाण्यांमुळे त्याने जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
लिंकिंग पार्क या म्युझिक बॅण्डमधून बेनिंग्टनने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. ग्रॅमी पुरस्कार विजेत्या या बॅण्डने तयार केलेला हायब्रीड थिअरी हा अल्बम प्रचंड गाजला होता.
त्यानंतर मेटेओरा, वन मोर लाईट, लिविंग थिंग्स, अ थाउझंट सन यांसारख्या संगीत अल्बमची त्यांनी निर्मिती केली.
त्याने २००५ साली त्याचा स्वतःचा ‘डेड बाय सनराईझ’ नावाचा म्युझिक बॅण्ड सुरु केला. या बॅण्डचा पहिला अल्बम ‘आऊट ऑफ ॲशेस’ २००९ साली रिलीज झाला.
यशाच्या शिखरावर असताना बेनिंग्टन अंमली पदर्थांच्या आहारी गेल्याने त्याची मानसिकता दिवसेंदिवस खालावत गेली.
चेस्टरच्या वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेल्या तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज कॅलिफोर्निया पोलिसांनी वर्तवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा