चालू घडामोडी : १६ जुलै
महापालिका नगरसेवकांच्या मानधनात वाढ
- महाराष्ट्रातील महापालिका नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याच्या निर्णयास नगरविकास विभागाने १५ जुलै रोजी मंजुरी दिली.
- नगरविकासाच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या नगरसेवकास प्रतिमहिना २५ हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे.
- त्याचबरोबर मुंबईवगळता इतर वर्गवारीतील महापालिका नगरसेवकांच्या मानधनातही वाढ झाली आहे.
- या वाढलेल्या मानधनाचा आर्थिक भार त्या त्या महापालिकांच्या तिजोरीवर पडणार आहे.
- राज्यात २७ महापालिका आहेत. या महापालिकांचे वर्गीकरण अ, ब, क आणि ड अशा चार विभागांत केले आहे. यापैकी मुंबई महापालिका ‘अ प्लस’ वर्गवारीत मोडते.
- यापूर्वी मुंबई महापालिका सदस्यांचे २००८मध्ये तर मुंबई वगळून इतर महापालिका सदस्यांचे २०१०मध्ये मानधन वाढवण्यात आले होते.
नगरसेवकांचे सुधारित मानधन |
महापालिका प्रकार |
पूर्वीचे मानधन (रु.) |
सुधारित मानधन (रु.) |
अ प्लस |
१५,००० |
२५,००० |
अ |
७,५०० |
२०,००० |
ब |
७,५०० |
१५,००० |
क |
७,५०० |
१०,००० |
ड |
७,५०० |
१०,००० |
भारतातील सर्वांत वयोवृध्द वाघीणीचा मृत्यू
- २८ जानेवारी १९९७ रोजी जन्मलेल्या भारतातील सर्वांत वयोवृध्द ‘स्वाती’ या वाघीणीचा आसाममधील एका प्राणी संग्रहालयात १६ जुलै रोजी मृत्यू झाला.
- २००५मध्ये एका आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत या वाघीणीला कर्नाटकच्या शिमोगा येथिल सिंह आणि वाघ सफारीतून आणण्यात आले होते.
- सामान्यत: वाघाचे आयुष्य हे १६ ते १७ वर्षे इतके असते मात्र या वाघीणचे वय २१ वर्षे होते. त्यामुळे ती देशातील सर्वांत वयोवृध्द वाघीण ठरली होती.
- माणसाच्या वयाशी याची तुलना केल्यास या वाघीणीचे २१ वर्षे जगणे हे माणसाने १०० वर्षे जगण्याइतके आहे.
पाकवर अमेरिकेने लादल्या अटी
- पाकिस्तानला संरक्षणविषयक साह्य देण्यासाठीच्या अटी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने आणखी कठोर केल्या आहेत.
- अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधीगृहाने २०१८ या आर्थिक वर्षांसाठी ६२१.५ अब्ज डॉलर तरतूद असलेला संरक्षण अर्थसंकल्प मंजूर केला.
- त्यावेळी पाकिस्तानला करण्यात येत असलेल्या संरक्षण मदतीत कपात करण्यात यावी, अशी शिफारस सदस्यांनी केली.
- अमेरिकेने आर्थिक मदत देण्यापूर्वी पाकने दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत समाधानकारक प्रगती दाखवायला हवी, अशी अट घातली आहे.
- दहशतवादाला पाककडून समर्थन मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर या अटी टाकण्यात आल्या आहेत.
- पाकिस्तानने दहशतवादाला थारा देण्याचे थांबवावे, तसेच स्फोटकांच्या प्रसारावर नियंत्रण आणून देशांतर्गत शांतता प्रस्थापित करावी, या अटींची पूर्तताही पाकिस्तानला करावी लागणार आहे.
- दरवर्षी अमेरिकेकडून पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढाईसाठी एक ठराविक रक्कम दिली जाते. यापुढे हा पैसा कुठे व कसा खर्च केला याचा पाकिस्तानला हिशोब द्यावा लागेल.
- याशिवाय या संरक्षण अर्थसंकल्पात भारताशी लष्करी सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
- भारत हा अमेरिकेचा सर्वार्थाने मोठा संरक्षण भागीदार असल्याचे सूचित होईल अशा तरतुदी त्यात करण्यात आल्या आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडेच झालेल्या अमेरिका दौऱ्याचे हे फलीत असल्याची चर्चा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा