चालू घडामोडी : १ जुलै
धोनी भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज
- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंग धोनीने ४ चौकार आणि २ षटकारांसह ७९ चेंडूत ७८ धावांची खेळी केली.
- या खेळीमुळे धोनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडुंमध्ये चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
- माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनला मागे टाकत त्याने हे स्थान मिळविले. अझरुद्दीनने ३३४ एकदिवसीय सामने खेळताना ९३७८ धावा केल्या आहेत.
- तर धोनीने आतापर्यंत २९४ सामन्यात ५१.३१ च्या सरासरीने ९४४२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा ८९.१४ आहे.
- धोनी आता सचिन तेंडुलकर (१८४२६), सौरभ गांगुली (११२२१) आणि राहुल द्रविड (१०७६८) यांच्या मागे आहे.
- याशिवाय सचिन तेंडुलकरला (१९५ षटकार) मागे टाकत धोनी वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजही ठरला आहे.
- धोनीने आतापर्यंत २०८ षटकार मारले आहेत. भारताकडून २०० हून अधिक षटकार मारणारा धोनी एकमेव खेळाडू आहे.
- आतंरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंच्या यादीत शाहिद आफ्रिदिने सर्वाधिक ३५१ षटकारांसह अव्वल स्थानी असून धोनी चौथ्या स्थानावर आहे.
- तसेच धोनी वनडेमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहणारा तिसरा खेळाडूही ठरला आहे. तो ७० वेळा नाबाद राहिलेला आहे.
- यामध्ये ७२ वेळा नाबाद राहिलेले शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका) आणि माजी चामिंडा वास (श्रीलंका) हेच त्याच्या पुढे आहेत.
एस एन सुब्रमण्यन एल अँड टीचे नवे सीईओ
- अभियांत्रिकी बांधकाम क्षेत्रातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या लार्सन अॅण्ड टुब्रोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदावर एस एन सुब्रमण्यन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यन हे कंपनीत सध्या उपव्यवस्थापकीय संचालक आहेत.
- सुब्रमण्यन हे लार्सन अॅण्ड टुब्रो समूहात १९८४मध्ये प्रकल्प नियोजन अभियंता म्हणून रुजू झाले होते. कंपनीच्या संचालक मंडळात त्यांचा २०११मध्ये प्रवेश झाला.
- त्यांच्या कारकीर्दीत समूहाच्या बांधकाम व्यवसाय विभागाने जागतिक क्षेत्रात २५ वी कंपनी म्हणून मान मिळविला.
- सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीला कंपनीच्या संचालक मंडळाने ७ एप्रिल रोजी मंजुरी दिली होती. त्यापूर्वी सुमारे दोन दशके हे पद ए एम नाईक यांच्याकडे होते.
- गेल्या ५२ वर्षांपासून समूहात असलेल्या नाईक यांनी सलग १७ वर्षे कंपनीचे नेतृत्व केले. यापुढे ते समूहाचे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतील.
लेखक दिलीप वि. चित्रे यांचे निधन
- अमेरिकेत स्थित ख्यातनाम लेखक दिलीप वि. चित्रे यांचे ३० जून रोजी प्रकृती खालावल्याने निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते.
- अमेरिकेतील भारतीयांच्या अनुभवावर आधारलेलं ‘अलिबाबाची हीच गुहा’ हे त्यांचे नाटक खूप गाजले होते. अमेरिकेसोबत भारतातही या नाटकाचे अनेक प्रयोग पार पडले.
- १९७०च्या दशकात जगभरातील वेगवेगळ्या देशात वास्तव्यास असलेल्या लेखकांकडून लिहून घेतलेल्या कथांचा एक महत्वपुर्ण प्रोजेक्ट त्यांनी एडिट केला होता. यावर आधारित ‘कुंपणाबाहेरचे शेत’ नावाचा कथासंग्रही त्यांनी प्रसिद्ध केला होता.
- अमेरिकेतील मराठी मंडळांच्या सांस्कृतिक कार्यात ते नेहमी पुढाकर घेत असत. तसेच महाराष्ट्र फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर स्थापनेपासून ते कार्यरत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा