नितीश कुमार यांचा बिहार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
- संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी २६ जुलै रोजी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
- संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत नितीश यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला. जदयूच्या आमदारांनीही नितीश यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
- त्यानुसार नितीश कुमार राजभवनात जाऊन बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
- गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
- त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता.
- मात्र, तेजस्वी यादव कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत, अशी भूमिका लालू प्रसाद यादव यांनी घेतली होती.
- त्यानंतर नितीश कुमार यांनी थेट मुख्यमंत्रिपद सोडून सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
- बिहार विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद), जनता दल यूनायटेड (जदयू) आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधनचे सरकार स्थापन केले होते.
- परंतु नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे या महागठबंधनाचा अंत झाल्याचे मानले जात आहे. आता बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करण्यावर विचार-मंथन केले जाईल.
- यामध्ये भाजपाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण आता बिहारमध्ये भाजपाच्या मदतीशिवाय सरकार बनवणे अशक्य आहे.
बिहारमधील पक्षीय बलाबल | |
---|---|
बहुमतासाठी आवश्यक जागा: १२२ | |
पक्ष | जागा |
राष्ट्रीय जनता दल (राजद) | ८० |
जनता दल यूनायटेड (जदयू) | ७१ |
काँग्रेस | २७ |
भाजप (विरोधी पक्ष) | ५३ |
सीपीआय | ३ |
लोक जनशक्ती पार्टी | २ |
राष्ट्रीय लोक समता पार्टी | २ |
हिंदुस्तानी अवाम मोर्चा | १ |
अपक्ष | ४ |
एकूण | २४३ |
बैलगाडी शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी
- महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून, यामुळे आता बैलगाडी शर्यतींना कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
- महाराष्ट्राचे पशुसंवर्धन खाते यासंबंधी अधिसूचना काढणार असून, यापुढे अटी पाळून बैलगाडी शर्यती आयोजित करता येणार आहे.
- यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार असून अटी लागू करुन जिल्हाधिकारी परवानगी देतील.
- शर्यतीदरम्यान प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.
- प्राणीप्रेमींनी न्यायालयात धाव घेऊन बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर तामिळनाडूच्या जलीकट्टूच्या धर्तीवर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न चालू होते.
- बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
- विधानसभेत प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक कायदा एकमताने मंजूर झाला होता. यानुसार प्राण्यांचे हाल केल्यास ३ वर्षे तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती.
- पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मांडले होते.
भारताला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद
- आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने पुढील वर्षी होणाऱ्या महिलांच्या तसेच २०२१मधील पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्याचा निर्णय घेतला.
- आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) मॉस्को येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- यामुळे भारत प्रथमच पुरुषांच्या विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे.
- भारताने यापूर्वी कधीच पुरुष विश्व चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविलेले नाही. २००६मध्ये महिला चॅम्पियनशिपचे भारतात आयोजन केले होते.
- भारताने यापूर्वी मुंबईत १९९०मधील विश्वकरंडक आणि दिल्ली येथे २०१० राष्ट्रकुल अजिंक्यपद या दोनच पुरुषांच्या महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे.
- भारतीय बॉक्सिंग महासंघावर प्रशासकीय गोंधळामुळे २०१२ ते २०१६ या कालावधीत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
- या पार्श्वभूमीवर, या दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे यजमानपद भारताला मिळणे ऐतिहासिक मानले जात आहे.
- एआयबीए कार्यकारी समितीने २०१९च्या महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद तुर्कीतील ट्राबजोनला तर पुरुष बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद रशियातील सोच्चीला बहाल केले आहे.
- जागतिक स्पर्धेचा विचार करायचा झाला, तर भारताने पुरुष बॉक्सिंगमध्ये एकूण ३ पदके पटकावली आहेत. ही तिन्ही कांस्यपदके आहेत.
- पदकविजेत्या भारतीय बॉक्सरमध्ये विजेंदरसिंग (२००९), विकास कृष्णा (२०११) आणि शिव थापा (२०१५) यांचा समावेश आहे.
- तर महिलांमध्ये मेरी कोम हिने पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळवून आपला ठसा उमटवला आहे.
विमानांमध्ये हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिकांची सक्ती
- नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांना विमानांमध्ये इंग्रजी भाषेसोबत हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध करून देणे सक्तीचे केले आहे.
- प्रवाशांना हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध होतायेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना नोटीस जारी केली आहे.
- विमानात हिंदी भाषेतील वाचन साहित्य न उपलब्ध करून देणे, हे अधिकृत भाषेसाठी तयार करण्यात आलेल्या सरकारी धोरणाचे उल्लंघन ठरेल.
दिनविशेष : कारगिल विजय दिवस
- कारगिल युद्धाला २६ जुलै रोजी १८ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला.
- भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९साली कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती.
- ६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या कारगिल युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युद्धाचे स्वरुप वेगळे होते.
- प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने धाडसाने शत्रूवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते.
- तेव्हापासून भारतीय लष्कराच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणारा २६ जुलै हा कारगिल विजयदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा