फिल्डस मेडल हा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला व प्रसिध्द इराणी-अमेरिकन गणितज्ञ मरियम मिर्झाखानी यांचे निधन झाले.
स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. मिर्झाखानी यांचे १४ जुलै २०१७ रोजी ४० व्या वर्षी स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.
मरियम यांचा जन्म १९७७ मध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला. हॉर्वर्ड विद्यापीठाने २००४ मध्ये त्यांना पीएचडी प्रदान केली होती.
त्यांना तरुणपणी आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिकल ऑलंपियाडमध्ये २ सुवर्ण पदकांनी गौरवण्यात आले होते.
१३ ऑगस्ट २०१४ रोजी मिर्झाखानी गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानला जाणाऱ्या फिल्ड्स मेडल या सर्वात प्रतिष्ठित पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
भौमितिक व गतिकी प्रणालीच्या संशोधनासाठी कोरियात सेऊल येथे झालेल्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ मॅथेमेटिशियन्स या अधिवेशनामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला (एकमेव) आणि पहिल्या इराणी नागरिक आहेत.
चीनने तिबेटमध्ये पाठवली लष्करी सामुग्री
सिक्कीम जवळच्या डोकलाम भागात भारतीय सैन्याबरोबर तणाव वाढलेला असताना चीनने तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवली आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या चिनी लष्कराच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या संघर्षात आणखी भर पडणार आहे.
पश्चिम थिएटर कमांडने उत्तर तिबेटच्या कुनलून पर्वतरांगामध्ये हजारो टनांची सैन्य सामुग्री पाठवली आहे.
पश्चिम थिएटर कमांडकडे शिनजियांग आणि तिबेटवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असून हीच कमांड भारताबरोबरचे सीमा विषय हाताळते.
चीनकडे यादोंगपासून ल्हासापर्यंत पसरलेल्या रेल्वे आणि रस्ते नेटवर्कच्या माध्यमातून लष्करी सामुग्री सिक्कीमच्या नथू-ला खिंडीपर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे.
चीनी सैन्याला एक्सप्रेस वे नेटवर्कच्या माध्यमातून ७०० किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी फक्त सहा ते सात लागू शकतात.
डोकलाम भाग भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवर आहे. भूतानमध्ये येणारे डोक्लाम म्हणजे आपल्या डोंगलाँग प्रांताचा भाग आहे, असा चीनचा दावा आहे.
त्यामुळे येथे भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. भारतीय सैन्य मागे हटायला तयार नसल्याने चीनकडून युद्धाची भाषा केली जात आहे.
नागालँडमध्ये राजकीय अस्थिरता
नागालँडमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून मुख्यमंत्री शूरहोजेली लिजित्सू बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेत गैरहजर राहिले.
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
नागालँडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्ष नागा पीपल्स फ्रंटमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
या कलहातून माजी मुख्यमंत्री टी आर झेलियांग यांनी १५ जुलै रोजी राज्यपालांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला होता.
नागालँड विधानसभेत एकूण ६० आमदार असून यातील ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा झेलियांग यांनी केला होता.
त्यामुळे १९ जुलै रोजी विधानसभेत मुख्यमंत्री लिजित्सू यांना बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र ते विधानसभेत गैरहजर राहिले.
बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्याने लिजित्सू यांनी गैरहजर राहणे पसंत केल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा