डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्घाटन
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारताचे लोकप्रिय माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
- २७ जुलै रोजी अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पैकरांबु या त्यांच्या जन्मस्थानी या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
- संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) हे स्मारक उभारले आहे. या स्मारकात कलाम यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.
- तमिळनाडू सरकारने दिलेल्या जमिनीवर हे स्मारक १५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे.
- अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात ‘अग्नी’ क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत.
- यावेळी मोदींच्या हस्ते ‘कलाम संदेश वाहिनी’ बसचेही उद्घाटन करण्यात आले. या बसमध्ये कलम यांच्याशी संबंधित गोष्टींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
- ही बस देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून प्रवास करत, १५ ऑक्टोबर म्हणजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती भवनात पोहोचले.
- १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. लोकांचे राष्ट्रपती अशी त्यांची ओळख होती.
- कलाम २००२ ते २००७ या काळात भारताचे राष्ट्रपती होते. त्यांना देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते.
- २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले. त्यांचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमार
- २६ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप घडविणारे नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
- लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि कुटुंबियांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेत, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
- त्यानंतर लगेच भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा-जदयू समीकरण जुळले असून, बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपाप्रणित एनडीएचे सरकार स्थापन झाले.
- राजीनामा देऊन चोवीस तासही उलटले नाहीत, तोवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नितीश कुमार यांनी केला आहे. नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
- नितीश कुमार यांच्यासोबत भाजपचे बिहारमधील वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर रात्री उशीरा नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती.
- त्यांनी भाजपा-जदयूच्या १३२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींना दिले व त्यानंतर शपथविधी सकाळी पार पडणार असल्याचे जाहीर केले.
- बिहारमध्ये जदयूचे ७१ आणि भाजपा व मित्रपक्षांचे ५८ आमदार असून, जदयू आणि भाजपा आघाडीचे मिळून १२९ आमदार होतात.
- बहुमतासाठी १२२ आमदारांची गरज असून, लालू आणि काँग्रेस यांचे मिळून केवळ १०७ आमदार होतात.
- त्यामुळे लालूप्रसाद यांचा ८० आमदार असलेला राष्ट्रीय जनता दल बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांना सत्तास्थापनेसाठी बोलावले जाण्याची शक्यता कमी आहे.
बिहारमधील पक्षीय बलाबल | |
---|---|
बहुमतासाठी आवश्यक जागा: १२२ | |
पक्ष | जागा |
राष्ट्रीय जनता दल (राजद) | ८० |
जनता दल यूनायटेड (जदयू) | ७१ |
काँग्रेस | २७ |
भाजप (विरोधी पक्ष) | ५३ |
सीपीआय | ३ |
लोक जनशक्ती पार्टी | २ |
राष्ट्रीय लोक समता पार्टी | २ |
हिंदुस्तानी अवाम मोर्चा | १ |
अपक्ष | ४ |
एकूण | २४३ |
बैलगाडी शर्यतींना कायदेशीर मान्यता
- महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून, यामुळे आता बैलगाडी शर्यतींना कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
- महाराष्ट्राचे पशुसंवर्धन खाते यासंबंधी अधिसूचना काढणार असून, यापुढे अटी पाळून बैलगाडी शर्यती आयोजित करता येणार आहे.
- यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार असून अटी लागू करुन जिल्हाधिकारी परवानगी देतील.
- शर्यतीदरम्यान प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.
- बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
अमेरिकेकडून रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध
- अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत.
- हाऊस ऑफ रिप्रेंझेंटेटिव्हजने या निर्बंधांचे विधेयक ४१९-३ अशा मताने संमत केले असले, तरी या निर्बंधांचे स्वरूप स्पष्ट झालेले नाही.
- रशियावर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणे आणि युक्रेन व सीरियावर केलेले लष्करी आक्रमण याबद्दल हे निर्बंध लादले आहेत. तर इराणवर दहशतवादाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल निर्बंध घातले आहेत.
जेफ बिजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
- ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनचे फाउंडर जेफ बिजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
- जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत २०१३ पासून प्रथम स्थानी असलेले मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांना बिजोस यांनी मागे टाकले.
- अॅमेझॉन कंपनीच्या स्टॉक्समध्ये आलेल्या तेजीमुळे बिजोस यांनी बिल गेट्स यांना मागे टाकल्याचे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
- गेल्या वर्षभरात सर्वात जलदगतीने संपत्तीत वाढ होणाऱ्या अब्जाधीशांपैकी एक अशी बिजोस यांची ओळख आहे. वर्षभरात बिजोस यांची संपत्ती २४.५ अब्ज डॉलरनी (१.२५ लाख कोटी रुपये) वाढली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा