चालू घडामोडी : १८ जुलै

वैंकय्या नायडू यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार वैंकय्या नायडू यांनी शहर विकास तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
  • त्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी आता वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
  • तर ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे शहर विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • याशिवाय सरकारमधील संरक्षण व पर्यावरण ही मंत्रालयेही सध्या रिक्त असून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण; तर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.
  • एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी नायडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांची लढत संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी होणार आहे.

मायावतींचा राज्यसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा

  • बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी १८ जुलै रोजी राज्यसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला.
  • दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात सभागृहात बोलायला न दिल्याने नाराज झालेल्या मायावतींनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
  • पुढील वर्षी एप्रिलमध्ये मायावती यांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपणार होता.
  • राज्यसभेत मायावती यांनी सहारनपुरमध्ये झालेल्या हिंसेचा संदर्भ देत दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला.
  • या संदर्भातील स्थगन प्रस्ताव त्यांनी राज्यसभेत मांडला. पण या प्रस्तावावर बोलण्यासाठी त्यांना फक्त ३ मिनीटांची वेळ देण्यात आली.
  • मायावती यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव मांडल्यानंतर सभेत काहीवेळासाठी गदारोळ झाला. यानंतर राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.
  • त्या प्रस्तावावर बोलत असताना राज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांनी यांनी मायावतींची भाषणाची ३ मिनिटांची वेळ संपल्यानंतर त्यांना खाली बसण्यास सांगितले.
  • त्यामुळे नाराज झालेल्या मायावतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच रालोआ सरकारच्या काळात आपल्याला राज्यसभेत बोलून दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

भरत अरुण भारतीय संघाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक

  • भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी माजी मध्यमगती गोलंदाज भरत अरुण यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • याशिवाय संजय बांगर यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून तर क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून आर श्रीधर यांची निवड झाली आहे.
  • यापुर्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीव्हीएस लक्ष्मण या क्रिकेट सल्लागार समितीने राहुल द्रविडला परदेश दौऱ्यावर फलंदाजी सल्लागार आणि झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.
  • मात्र टीम इंडियाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भरत अरुण आणि आर श्रीधर यांची शिफारस केली होती.
  • रवी शास्त्रींप्रमाणेच आगामी २०१९च्या विश्वचषकापर्यंत सर्व नवीन प्रशिक्षकांकडे संघाची जबाबदारी असणार आहे.
 भरत अरुण 
  • रवी शास्त्री ऑगस्ट २०१४ ते ऑगस्ट २०१६ या काळात संघ संचालक असताना त्यांनी भारत अरुण यांना भारतीय संघाचे गोलंदाजी कोच बनविले होते.
  • अरुण यांची खेळाडू म्हणून कारकीर्द फारशी गाजली नसली तरी उत्कृष्ट अकादमी कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
  • वेगवान माऱ्यासंदर्भात त्यांचा चांगला अभ्यास आहे. शास्त्री आणि अरुण हे १९८०च्या दशकात १९ वर्षांखालील संघांपासून घनिष्ट मित्र आहेत.
  • यापूर्वी अरुण यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजी सल्लागार पदावर कार्य केले आहे.

विम्बल्डन २०१७

  • मिश्र दुहेरी
  • स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस आणि ब्रिटनचा जेमी मरे या अव्वल मानांकीत जोडीने विम्बल्डन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
  • त्यांनी अंतिम सामन्यात हीथर वॉटसन (ब्रिटन) व हेन्री कॉन्टीनेन (फिनलँड) या जोडीचा ६-४, ६-४ असा पराभव केला. 
  • पुरुष दुहेरी
  • पोलंडच्या लुकास कुबोट आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो या जोडीने रोमांचक बाजी मारत विम्बल्डनच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
  • कुबोट-मेलो यांनी ओलिव्हर मराच (ऑस्ट्रिया) व मेट पाविच (क्रोएशिया) या जोडीचे कडवे आव्हान ५-७, ७-५, ७-६, ३-६, १३-११ असे परतवून लावले.
  • महिला दुहेरी
  • एकाटेरिना माकारोव्हा आणि एलेना व्हेस्निना या रशियन ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या जोडीने महिला दुहेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
  • महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात माकारोव्हा-व्हेस्निना जोडीने चिंग चान (तैवान) व मोनिका निकोलस्कु (रोमानिया) यांचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवला.

ब्रिटनच्या संसदीय निवड समितीमध्ये प्रीत कौर गिल

  • प्रीत कौर गिल यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका महिला शिख व्यक्तीची ब्रिटनच्या संसदीय निवड समितीमध्ये निवड करण्यात आली आहे.
  • या समितीमध्ये ११ जणांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे हे या समितीचे मुख्य काम आहे. 
  • प्रीत कौर या लेबर पार्टीच्या खासदार आहेत. बर्मिंघम एबेस्टन येथून त्यांनी निवडणूक जिंकली आहे.
  • यापुर्वी सप्टेंबर २०१६पर्यंत लेबर पार्टीच्या केथ वेज या समितीमध्ये होत्या. ९ वर्ष केथ वेज ह्या या समितीच्या अध्यक्षा होत्या. मात्र ड्रग्स आणि वेश्यावृत्तीच्या आरोपांमुळे त्यांना या समितीमधून बाहेर पडावे लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा