·
२२
जानेवारी १९७२
:
स्वातंत्र्यचळवळीचे
नेते स्वामी
रामानंद
तीर्थ.
|
·
केंद्रीय
गृहमंत्री
राजनाथ सिंह
यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या
संसदीय
कामकाजविषयक
कॅबिनेट
समितीच्या
बैठकीत अर्थसंकल्पीय
अधिवेशनाचे
वेळापत्रक
निश्चित करण्यात
आले.
·
संसदेचे
अर्थसंकल्पीय
अधिवेशन २३
फेब्रुवारी
ते २० मार्च
आणि २०
एप्रिल ते ८
मे दरम्यान
होणार असून
पहिल्याच
दिवशी
राष्ट्रपती
प्रणव
मुखर्जी
यांच्या
अभिभाषणाने
त्याची
सुरुवात
होईल.
·
२४
आणि २५
फेब्रुवारी
रोजी
अभिभाषणावरील
आभारदर्शक
प्रस्तावावर
चर्चा होईल.
·
२६
फेब्रुवारी
रोजी रेल्वे
अर्थसंकल्प मांडण्यात
येईल.
·
२७
फेब्रुवारी
रोजी आर्थिक
सर्वेक्षणाचा
अहवाल सादर
करण्यात
येईल.
·
२८
फेब्रुवारीला
केंद्रीय
अर्थसंकल्प सादर
करण्यात
येईल.
|
·
पंजाबचे
राज्यपाल
शिवराज
पाटील यांचा
पाच वर्षांचा
कार्यकाळ
संपलात्यामुळे
ते निवृत्त झाले आहेत.
·
पाटील
यांनी २२
जानेवारी
२०१० रोजी
पंजाबच्या
राज्यपाल
पदाचा
कार्यभार
स्वीकारला
होता.
|
·
आयपीएल
स्पॉट
फिक्सिंग
प्रकरणी ‘कायम
संशयित’ असलेले
बीसीसीआयचे
माजी
अध्यक्ष एन.
श्रीनिवासन, त्यांचा
जावई व
चेन्नई सुपर
किंग्जचा
मालक गुरुनाथ
मैयप्पन
तसंच
राजस्थान
रॉयल्स संघाचा
मालक राज
कुंद्रा
यांना
सर्वोच्च
न्यायालयाने
दणका दिला.
·
श्रीनिवासन
यांचे
चेन्नई सुपर
किंग्ज संघाशी
व्यावसायिक
हितसंबंध
असल्याचा
ठपका ठेवतानाच
असे संबंध
असेपर्यंत
श्रीनिवासन
हे
बीसीसीआयच्या
अध्यक्षपदाची
निवडणूक लढवू
शकणार नाहीत, असं
न्यायालयानं
स्पष्ट केलं. मैयप्पन व
कुंद्रा हे
फिक्सिंग व
सट्टेबाजी प्रकरणी
दोषी
असल्याचा
निर्णयही
न्यायालयाने
दिला.
·
त्याचवेळी,
बीसीसीआयच्या
अध्यक्षपदाची
निवडणूक सहा
आठवड्यांच्या
आत पुन्हा
घेण्याचे
आदेशही दिले.
|
·
नायजेरियातील
होतकरू
विद्यार्थी
आणि आदिवासी
सहकारी
संस्था
यांच्यासाठी
काम करणाऱ्या
अक्षय
जाधव याला
प्रतिष्ठेचा
राणी
एलिझाबेथ
तरुण
नेतृत्व
पुरस्कार जाहीर
झाला आहे.
·
मूळचा
विदर्भातला
असलेला
अक्षय
कोझिकोडे येथील
इंडियन
इन्स्टिट्युट
ऑफ
मॅनेजमेंटचा
माजी
विद्यार्थी आहे.
|
·
ऑनलाइन
रिटेलमधील
अग्रणी ‘ईबे’तर्फे
एकूण
मनुष्यबळापैकी
सात टक्के
कर्मचाऱ्यांना
(२४००)
कामावरून
काढून
टाकण्यात येणार
आहे.
·
कंपनीचा
एक भाग
असणाऱ्या ‘पे
पल’ या
कंपनीची
आर्थिक
पुनर्रचना
करण्यासाठी
चालू
तिमाहीनंतर
२४००
कर्मचाऱ्यांना
काढून टाकण्यात
येणार आहे.
|
·
चालण्याच्या
शर्यतीत
सहभागी
होणाऱ्या रशियाच्या
पाच
अॅथलीट्सवर
रशियाच्या
डोपिंगविरोधी
समितीने
बंदी घातली आहे. यातील तिघे
ऑलिम्पिक
सुवर्णपदक
विजेते आहेत.
·
ऑलिम्पिक
विजेता सेरगेई
किरडॅपकिन आणि ओल्गा
कॅनस्किना; तसेच २०११
चा जगज्जेता सेरगेई
बकुलिन हे
डोपिंगमध्ये
दोषी
आढळल्याने
त्यांच्यावर
तीन वर्षे
आणि दोन
महिन्यांची
बंदी घालण्यात
आली आहे.
|
·
मुंबईजवळील
अरबी
समुद्रात
छत्रपती शिवाजी
महाराजांचे
आंतरराष्ट्रीय
दर्जाचे
स्मारक
उभारण्यासाठी
कृती समिती नेमण्याचा
निर्णय
राज्य
सरकारने
घेतला असून, समितीच्या
अध्यक्षपदी
शिवसंग्राम
संघटनेचे
नेते विनायक
मेटे
यांची
नियुक्ती
करण्यात आली आहे.
|
·
अखिल
भारतीय
मराठी नाट्य
परिषदेच्या
पिंपरी-चिंचवड
शाखेतर्फे
देण्यात
येणारा आशा
भोसले
पुरस्कार
यंदा
प्रसिद्ध
गायक आणि
संगीतकार
हरिहरन
यांना देण्यात
येणार आहे.
·
१
लाख ११ हजार
रुपये आणि
सन्मानचिन्ह असे
पुरस्काराचे
स्वरुप आहे.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा