·
२२
फेब्रुवारी १९५४-
पहिली कापड
गिरणी
मुंबईत सुरु
|
·
अज्ञात
हल्लेखोरांच्या
भ्याड
हल्ल्यात जखमी
झाल्यानंतर
गेले पाच
दिवस
मृत्यूशी
झुंज देणारे ज्येष्ठ
कम्युनिस्ट
नेते, पुरोगामी
विचारवंत, कामगार व
श्रमिकांचे
कैवारी
गोविंद
पानसरे ऊर्फ
अण्णा (वय
८२) यांचे
ब्रीच कॅंडी
रुग्णालयात
निधन झाले.
·
गेल्या
सोमवारी (१६
फेब्रुवारी) सकाळचा
फेरफटका
मारल्यानंतर
घरी
परतणाऱ्या
गोविंद
पानसरे आणि
त्यांच्या
पत्नी उमा यांच्यावर
दोघा जणांनी
बंदुकीतून
गोळीबार केला
होता. या
हल्ल्यात
पानसरे
दांपत्य
गंभीर जखमी
झाले होते.
·
पानसरे
यांना तीन
गोळ्या
लागल्या होत्या.
उमा यांची
प्रकृती
सुधारत आहे.
मागील पाच
दिवसांपासून
गोविंद
पानसरे
यांच्यावर कोल्हापूर
येथील ऍस्टर
आधारमध्ये
उपचार सुरू
होते.
·
तेथे
त्यांच्यावर
तीन
शस्त्रक्रियाही
करण्यात
आल्या
होत्या.
त्यांचा
रक्तदाबही
नियंत्रणात
होता; परंतु
त्यांच्यावर
अत्याधुनिक
स्वरूपाचे उपचार
व्हावेत, यासाठी
राज्य शासन
आग्रही होते.
·
त्यानुसार
त्यांना
पुढील
उपचारासाठी
एअर ऍम्ब्युलन्समधून
मुंबईतील
ब्रीच कॅंडी
रुग्णालयात
दाखल केले
होते.
|
·
अमेरिकेचे
अध्यक्ष बराक
ओबामा
यांच्या
भारतदौऱ्याच्यावेळी
पंतप्रधान
नरेंद्र
मोदी यांनी
परिधान
केलेल्या
बंद
गळ्याच्या
सुटला आज
लिलावात
तब्बल ४
कोटी ३१ लाख
रुपयांची
विक्रमी
किंमत मिळाली.
·
सुरतचे
हिरे
व्यापारी
लालजी पटेल आणि
त्यांच्या
मुलाने ही
विक्रमी
बोली लावून
सूट घेतला.
·
पंतप्रधान
नरेंद्र
मोदी यांना
मिळालेल्या ४६० भेटवस्तूंच्या
लिलावातून
गंगा
स्वच्छता मोहिमेसाठी
आठ कोटी ३३ लाख
रुपयांची
रक्कम
मिळाली आहे. या रकमेत
मोदींच्या
बहुचर्चित
सूटच्या रकमेचाही
समावेश आहे.
|
·
ऑस्ट्रेलियाच्या
ईशान्य
किनारपट्टीस
मार्सिया या
वादळाचा
जोरदार फटका बसल्याने
क्वीन्सलॅंड
भागामध्ये
वीजपुरवठा
खंडित झाला
असून या
भागामधील
नागरिकांना सुरक्षित
स्थळी
हलविण्यात
आले आहे.
·
क्वीन्सलॅंडमधील
सेंट
लॉरेन्स आणि
येप्पों
यांमधील
किनारपट्टीस
वादळाचा
मोठा फटका
बसला आहे.
|
·
गल्फ
ऑइल
कॉर्पोरेशनच्या
आवारात झालेल्या
एका स्फोटात
दोन जण
मृत्युमुखी पडले, तर इतर १३
जण भाजून
जखमी झाले
आहेत.
|
·
केवळ
कोळसा
खाणींच्या
लिलावानंतर
पाच दिवसातच
सरकारकडे ६०
हजार कोटी रूपयांची
रक्कम जमा
झाली आहे.
·
सरकारने
याआधी २०४ कोळसा
खाणींचे
वाटप रद्द
केले होते.
आता या सर्व
खाणींचे
नव्याने
वाटप
झाल्यानंतर १५ लाख
कोटींची
रक्कम गोळा
होण्याची
शक्यता व्यक्त
केली जात आहे.
|
·
रशियाचे
राष्ट्राध्यक्ष
व्लादिमीर
पुतीन यांचे
टीकाकार व
विरोधी पक्ष
नेते ऍलेक्सी
नवाल्नी यांना पंधरा
दिवसांच्या कारावासाची
शिक्षा
सुनाविण्यात
आली आहे.
·
नवाल्नी
हे पुतीन
यांच्याविरोधात
येत्या १
मार्च रोजी
मोर्चा
काढणार होते.
या कारावासामुळे
त्यांना
मोर्चामध्ये
सहभागी होता
येणार
नसल्याचे
स्पष्ट झाले
आहे.
·
नवाल्नी
यांना
आर्थिक
गैरव्यवहारासंदर्भात
ही शिक्षा
सुनाविण्यात
आली आहे.
|
·
इराक
व सीरिया या
दोन
देशांमधील
शेकडो मैलांच्या
भूप्रदेशावर
ताबा
मिळविलेल्या
इस्लामिक
स्टेट (इसिस) या
दहशतवादी
संघटनेच्या
पाशामधून
मोसूल शहर
मुक्त
करण्यासाठी
अमेरिका व
इराक या दोन
देशांनी
एकत्रितरित्या
सैनिकी
कारवाई करण्याची
योजना आखली
आहे. मोसूल
हे इराकमधील
दुसरे
सर्वांत
मोठे शहर आहे.
·
येत्या
एप्रिल-मे
महिन्यामध्ये
ही कारवाई
केली
जाण्याची शक्यता
आहे. यासाठी
वापरावयाच्या
सैन्यामध्ये
इराकी
सैन्याच्या
पाच तुकड्या
असतील.
·
याचबरोबर,
या
लढाईमध्ये
कुर्दिश
पशमेर्गा
जमातीच्या तीन
तुकड्याही
सहभागी
होणार आहेत.
या
कारवाईसाठी एकूण २५
हजार सैन्य वापरण्यात
येणार आहे.
|
·
बिहारमधील
अनेक
दिवसांच्या
राजकीय
संघर्षाच्या
पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री
जीतन राम
मांझी यांनी अखेर
राजीनामा
दिला.
बिहार
विधानसभेमध्ये
आज मांझी
यांना बहुमत
सिद्ध
करावयाचे
होते. मात्र
त्याआधीच मांझी
यांनी
राजीनामा
दिला.
·
त्यानंतर राज्यपाल केशरीनाथ
त्रिपाठी यांनी संयुक्त
जनता दलाचे
नेते नितीशकुमार
यांना सरकार
स्थापनेचे
निमंत्रण दिले. ते २२
फेब्रुवारीला
बिहारच्या
मुख्यमंत्रिपदाची
शपथ घेतील.
|
·
मराठा
समाजाच्या
आरक्षणप्रकरणी
न्यायालयाचा
निर्णय
लागेपर्यंत
राखीव जागा
भरणार नाही.
·
शिक्षण
व
नोकऱ्यांमध्ये
ज्या जागा
भरल्या आहेत, त्यांना
संरक्षण
देण्याबाबतचे
आदेश काढल्याची
माहिती
मुख्यमंत्री
देवेंद्र
फडणवीस यांनी
किल्ले
शिवनेरी (ता.
जुन्नर) येथे
बोलताना दिली.
|
·
अनिवासी
भारतीयांना
त्यांच्या
तक्रारी ऑनलाइन
नोंदविण्यासाठी
आणि
त्यांचे
निवारण
करण्यासाठी केंद्र
सरकारने ‘मदद’ (मदत)
या पोर्टलचे
आज उद्घाटन
केले.
·
विदेशातील
भारतीय
नागरिकांच्या
तक्रारींची
पूर्ण
जबाबदारीपूर्वक
निवारण
करण्यासाठी
हे पोर्टल
सुरू केल्याचे
सरकारने
सांगितले
आहे.
·
‘मदद’ची
वैशिष्ट्ये
१.
योग्य
व्यक्तीपर्यंत
तक्रार
पोचविणे.
२.
तक्रार
निवारणाचा
वेग वाढवणे.
३.
तक्रार
निवारणाचा
आढावा घेणे.
४. अधिकाऱ्यांवर
जबाबदारी
निश्चिती.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा