·
पाकिस्तानमध्ये ३.४ मिलियन किलोवॅटची क्षमता असलेल्या सहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी चीनने पाकिस्तानला मदत करण्याचे
ठरविले आहे.
·
नॅशनल डेव्हलपमेंट अँड रिफॉर्म कमिशनचे (एनडीआरसी) अधिकारी वँग झियाटाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन पाकिस्तानसह अर्जेंटिनालाही आण्विक तंत्रज्ञान पुरवित आहे.
·
चीन पाकिस्तानला सहा अणुभट्ट्या उभारण्यास मदत करत आहे. या अणुभट्ट्यांतून ३.४ मिलियन किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यासाठी चीनने ६.५ बिलियन डॉलरची मदत केली आहे.
·
आण्विक उर्जा साधने निर्यात करण्यासाठी चीन सध्या अनेक देशांबरोबर चर्चा करत आहे.
·
चीन पाकिस्तामधील पंजाब प्रांतातील चास्मा येथे ३२० मेगावॅट क्षमता असलेल्या दोन अणुभट्ट्या उभारणार आहे. तर, कराचीजवळ प्रथमच ११०० मेगावॅट क्षमता असलेल्या दोन अणुभट्ट्या उभारण्यात येणार आहेत.
·
एनएसजी कार्यक्रमांतर्गत भारत आणि अमेरिकेने दोन अणुभट्ट्या उभारण्याचे ठरविल्यानंतर चीनने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा