चालू घडामोडी - २६ जानेवारी २०१५

·        २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन / जागतिक सीमा शुल्क दिन
·        यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची काही ठळक वैशिष्ट्ये
·        प्रजासत्ताक दिनास अमेरिकेच्या अध्यक्षांची उपस्थिती
·        ‘पी-८ एल’ ही पाणबुडीविरोधी आणि ‘मिग-२९ के’ या विमानांच्या कवायती
·        राष्ट्रपती मुखर्जी आणि अध्यक्ष ओबामांचे स्वतंत्र वाहनांतून राजपथावर आगमन
·        ‘सीआरपीएफ’ची नक्षलविरोधी तुकडी ‘कोब्रा’चा संचलनात सहभाग
·        तिन्ही सेना दलांतील महिला तुकड्यांचे संचलन
·        जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामनाAshokchakra करताना दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल नाईक नीरजकुमार सिंह यांचा अशोकचक्र देऊन मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे. शांतता काळात दाखविलेल्या शौर्याबद्दल दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
·        याशिवाय, १५ ऑगस्ट २०१४ ला मेजर मुकुंद वरदराजन यांना मरणोत्तर जाहीर झालेले अशोकचक्रही २६ जानेवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
·        याशिवाय, तीन जणांना मरणोत्तर कीर्तिचक्र आणि नऊ जणांना शौर्यचक्र प्राप्त झाले आहे. या बारा जणांमध्ये उरी सेक्‍टरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार यांचाही समावेश आहे.
·        २४ ऑगस्ट २०१४ ला जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एका शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी नीरजकुमार यांच्या पथकावर गोळीबार केला.
·        या गोळीबारात एका जवानाला गोळी लागली. त्याला सुरक्षित परत आणण्यासाठी नीरजकुमार हे आपल्या जिवाची पर्वा न करता पुढे गेले.
·        एका दहशतवाद्याने त्यांच्यावर बॉंब टाकला व तुफान गोळीबार केला, तेव्हा अत्यंत धाडसीपणाने पुढे जात त्यांनी त्या दहशतवाद्याला ठार मारले. याच वेळी दुसऱ्या दहशतवाद्याने नीरजकुमार यांच्यावर हल्ला करत त्यांच्या छातीवर गोळी मारली.
·        अंगावर मोठ्या प्रमाणावर जखमा होऊनही नीरजकुमार यांनी अतुलनीय साहस दाखवत त्या दहशतवाद्याजवळची रायफल ओढून घेतली आणि त्याला हाणामारीत ठार मारले.
·        बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी आपली जागाही सोडली नाही. मात्र, नंतर रुग्णालयात नेताना ते हुतात्मा झाले.
·        कॅप्टन जयदेव, नायब सुभेदार कोश बहादूर गुरंग आणि सुभेदार अजय वर्धन यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहेत.
·        एकूण नऊ जणांना शौर्यचक्र प्रदान करण्यात येणार आहे. लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार (मरणोत्तर), मेजर मुकुल शर्मा, मेजर अभिजय (मरणोत्तर), मेजर आशुतोष कुमार पांडे, मेजर आर. वंशिकृष्णन, मेजर बिभांषू धोंडियाल, मेजर स्वरूपकुमार घोराय, पॅराट्रूपर बलविंदरसिंग (मरणोत्तर) आणि रायफलमन मंगाराम यांना शौर्यचक्र मिळाले आहे.
·        तसेच, वायुसेनेतील ८३ जणांना राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे. यामध्ये सहा जणांना परम विशिष्ट सेवा पदक, पंधरा जणांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहे.
·        भारताच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलकडून डुडलच्याGoogle Doodle - Republic Day Special माध्यमातून भारतवासियांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
·        डुडलवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करताना दाखविण्यात आला. तसेच राजपथाला चहूबाजूंना फुलांनी सजवले आहे आणि इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन या दोन महत्वाच्या वास्तूंना स्थान देण्यात आले आहे.
·        अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासमोर राजपथावर ६६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या लष्करी सामर्थ्याचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दिमाखदार प्रदर्शन झाले.
·        राजपथावर झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मिशेल ओबामा यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
·        राजपथावरील संचलनात लष्कर आणि नौदलातील अस्त्रे, लढाऊ विमानांचे दिमाखदार सादरीकरण करण्यात आले.
·        तसेच १६ विविध राज्यांचे चित्ररथांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच देशाची विविध क्षेत्रांतील माहिती देणारे ९ केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथही सहभागी झाले होते.
·        यानंतर बीएसएफच्या दलाच्या जवानांनी दुचाकीवरून चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. अखेर हेलिकॉप्टर व लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके केली.
·        ‘महिला सबलीकरण’ हा यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचा विषय ठरविण्यात आला होता. त्यानुसार राजपथावर प्रथमच संचलन करणाऱ्या तिन्ही सैन्य दलांतील महिलांच्या संपूर्ण तुकडीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
·        भारत-अमेरिकादरम्यानच्या “नागरी अण्विक ऊर्जानिर्मिती सहकार्यविषयक करार-१२३”चा मार्ग अंमलबजावणीसाठी आज मोकळा झाला.
·        आण्विक दुर्घटनेच्याMaitriparva प्रसंगात नुकसानभरपाईचे दायित्व व त्या संदर्भातील विमाविषयक जबाबदारी तसेच भारतातील आण्विक ऊर्जेसाठी पुरविण्यात येणाऱ्या आण्विक इंधनाचा मागोवा ठेवण्याचे अधिकार या दोन मुद्द्यांवर या कराराची अंमलबजावणी अडून राहिली होती.
·        अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचे कार्यकारी अधिकार वापरून भारताची या दोन मुद्द्यांवरील भूमिका मान्य केली आणि कराराचा मार्ग मोकळा झाला, असे सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा