ज्ञानपीठ पुरस्कार २०१४ - भालचंद्र नेमाडे

जन्म - २७ मे १९३८
Bhalchandra Nemade
जन्मठिकाण - डोंगर सांगवी, ता. यावल, जि. जळगाव
मराठी साहित्यात गेली किमान चार दशके आपल्या आगळ्यावेगळ्या लेखनशैलीचे वेगळेपीठ निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक व कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना २०१४ चा ज्ञानपीठहा भारतीय साहित्यातील सर्वोच्च सन्मान जाहीर झाला. ज्ञानपीठ पुरस्काराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच नेमाडे यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. भालचंद्र नेमाडे यांना यापूर्वी साहित्य अकादमी व पद्मश्री पुरस्कारही मिळाले आहेत.
प्रख्यात साहित्यिक डॉ. नामवरसिंह यांच्या अध्यक्षतेखालील ज्ञानपीठ पुरस्कार समितीने नेमाडे यांची या सन्मानासाठी निवड केली. या समितीत सर्वश्री रमाकांत रथ, सुरजित पातर, चंद्रकांत पाटील, लीलाधर मंडलोई, सुरंजनदास, अलोक राय, दिनेश मिश्रा, दिनेशसिंग यांचा समावेश होता.
“हिंदू” या चर्चित कादंबरीसाठी नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान जाहीर झाला आहे. या कादंबरीत हिंदू संस्कृतीचे वर्णन “जगण्याची समृद्ध अडगळ” असे केल्याने त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले. मात्र, नेमाडेंनी या साऱ्याचा ठामपणे प्रतिवाद केला.
शिक्षण :
खानदेशात मॅट्रिक (१९५५), बी.ए. (१९५९, फर्ग्युसन कॉलेज, पुणे), एम.ए. (१९६१, भाषाशास्त्र, डेक्कन कॉलेज, पुणे) आणि एम.ए. (१९६४, इंग्रजी साहित्य, मुंबई विद्यापीठ)
त्यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी
मिळाली आहे.
व्यवसाय :
इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर (१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of Oriental and african studies (१९७१-७१) आणि १९७४ पासून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. शेवटी ते मुबई विद्यापीठातील तुलनात्मक साहित्याच्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले.
कोसला: पहिली कादंबरी (१९६३)
कोसला हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.
कादंबऱ्या
·        कोसला (१९६३)
·        हूल (१९७५)
·        जरीला(१९७७)
·        झूल (१९७९)
·        बिढार (१९६७)
·        हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (२०११)
कविता संग्रह
·        मेलडी (१९७०)
·        देखणी (१९९२)
समीक्षा
·        टीकास्वयंवर
·        तुकाराम
·        मुलाखती
·        साहित्याची भाषा
·        सोळा भाषणे
·        इंडो - अँग्लियन रायटिंग्ज - टू लेक्चर्स
·        नेटिव्हिजम
·        इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडी
·        द इन्फ्ल्युअन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी - ए सोशिओलिंग्विश्टि्क अँड स्टायलिस्टिक स्टडी
पुरस्कार, मानसन्मान
·        १९७६ - बिढार - ह. ना. आपटे पुरस्कार
·        १९८४ - झूल - यशवंतराव चव्हाण (कऱ्हाड) पुरस्कार
·        १९८७ - कुरुंदकर पुरस्कार, साहित्याची भाषा
·        १९९१ - टीका स्वयंवर - साहित्य अकादमी पुरस्कार
·        १९९१ - देखणी - कुसुमाग्रज पुरस्कार
·        १९९२ - देखणी - ना. धों. महानोर पुरस्कार
·        २००२ - महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार
·        २०११ - पद्मश्री
·        २०१३ - नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्कार
·        २०१५ - ज्ञानपीठ पुरस्कार
          १९६५ पासून देण्यात येणाऱ्या ज्ञानपीठाचा मान मिळविणारे भालचंद्र नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक ठरले असून, यापूर्वी वि. स. खांडेकर (ययाति - १९७४), वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज (नटसम्राट - १९८७) व विंदा करंदीकर (अष्टदर्शने -२००३) या तिघांच्या  शिरपेचात “ज्ञानपीठा”चा तुरा खोवला गेला आहे.
वरील माहिती PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा