| 
·       
  ४
  फेब्रुवारी १६७०
  :
  कोंढाणा 
  किल्ला
  लढविताना
  नरवीर तानाजी
  मालुसरे
  धारातीर्थी
  पडले. | 
| 
·       
  विश्वकरंडक
  क्रिकेट
  स्पर्धेतील
  भारत आणि पाकिस्तान
  सामन्यासाठी
  असलेली
  पन्नास हजार तिकिटे
  वीस
  मिनिटांत
  संपली आहेत.  
·       
  विश्वकरंडक
  स्पर्धेत
  भारत कधीही
  पाकिस्तानविरुद्ध
  हरलेला नाही. | 
| 
·       
  सरकारी
  बॅंक
  कर्मचाऱ्यांचा
  वेतन
  सुधारणेसाठी
  होणार्या
  बैठकीत
  समाधानकारक
  तोडगा न
  निघाल्याने
  बॅंक
  कर्मचारी
  संघटनेने २५
  फेब्रुवारीपासून
  चार दिवस
  संपावर
  जाण्याचा
  निर्णय घेतला आहे. | 
| 
·       
  अश्लील
  आणि शिवराळ
  भाषेचा वापर
  झालेल्या वादग्रस्त
  ‘एआयबी’ कार्यक्रमाचा
  व्हिडिओ
  अखेर यू
  ट्यूब
  चॅनेलवरून
  हटविण्यात
  आला आहे. | 
| 
·       
  शारदा
  चिटफंड
  घोटाळ्याप्रकरणी
  तृणमूल कॉंग्रेसचे
  खासदार
  श्रीजॉय बोस
  यांना अटक करण्यात
  आली होती.
  न्यायालयाने
  त्यांचा जामीन
  मंजूर
  केल्याने सुटका झाली. | 
| 
·       
  सतत
  नवनव्या
  सुविधा देऊन
  लोकप्रियता
  कायम ठेवण्यात
  यश
  मिळविलेल्या
  लोकप्रिय
  सोशल नेटवर्किंग
  साईट ‘फेसबुक’ ४
  फेब्रुवारी
  रोजी आपला
  ११वा जन्मदिन साजरा करत
  आहे. 
·       
  फेसबुकबाबत
  काही रंजक
  बाबी  
·       
  फेसबुकवर
  दररोज ६
  लाखवेळा
  हॅकिंक
  करण्याचा
  प्रयत्न
  करण्यात येतो. 
·       
  फेसबुकचे
  अमेरिकेतील
  युजर्स
  दररोज
  सरासरी ४०
  मिनिटे
  फेसबुकवर
  असतात. 
·       
  सर्वसाधारण
  स्मार्टफोन
  युजर
  दिवसातून १४
  वेळा
  फेसबुकला
  भेट देतो. 
·       
  फेसबुकद्वारे
  तुम्ही
  कोणत्या
  साईटस्ला
  भेट देता हे
  फेसबुकला
  माहिती असते. 
·       
  मार्क
  झुकेरबर्गला
  लाल आणि
  हिरव्या
  रंगाचा
  आंधळेपणाने
  असल्याने
  फेसबुकचा
  रंग निळा
  ठेवण्यात आला
  आहे. 
·       
  फेसबुकवर
  ३ कोटी मृत
  युजर्सची
  खाती आहेत. 
·       
  २००९
  पासून
  चीनमध्ये
  फेसबुकवर
  बंदी
  घालण्यात आली
  आहे. 
·       
  अमेरिकेत
  २०११ मध्ये
  घटस्फोटाच्या
  एक तृतीयांश
  प्रकरणांचे
  कारण हे
  फेसबुक होते. 
·       
  फेसबुकचा
  कोणताही
  युजर मार्क
  झुकेरबर्गला
  फेसबुकवर
  ब्लॉक करू
  शकत नाहीत. 
·       
  अमेरिकेत
  मतदान
  करणाऱ्या
  नागरिकांपेक्षा
  फेसबुकवरील
  युजर्सची
  संख्या
  जास्त आहे. | 
| 
·       
  इसिस
  या
  दहशतवादी
  संघटनेच्या
  ताब्यात
  असलेल्या जॉर्डन या
  देशाच्या
  वैमानिकाला
  जिवंत जाळण्यात
  आल्याचा
  व्हिडिओ ३
  फेब्रुवारी
  रोजी
  ऑनलाइन
  प्रसारित करण्यात
  आला.  
·       
  मोझ
  अल-कसाबेह
  असे या
  वैमानिकाचे
  नाव आहे.
  अमेरिकेच्या
  नेतृत्वाखालील
  लष्करी मोहिमेत
  लेफ्टनंट
  मोझ याचे
  विमान
  सीरियातील रक्का
  येथे
  दुर्घटनाग्रस्त
  झाल्याने
  पडले होते.
  तेव्हापासून
  तो इसिसच्या
  ताब्यात होता. 
·       
  यानंतर
  काही
  तासांतच जॉर्डनने इसिसच्या
  एका
  दहशतवादी
  महिलेसह
  दोघांना
  फाशी दिली. साजिदा
  अल-रिशावी
  आणि जियाद
  कारबोली अशी फाशी
  देण्यात
  आलेल्यांची
  नावे आहेत.  
·       
  अपहरण
  करण्यात
  आलेले पायलट
  मोझ-अलकसाबेह
  यांच्या
  सुटकेसाठी
  रिशावी हिची
  सुटका
  करण्याची
  तयारीही
  जॉर्डनने
  दाखविली
  होती. | 
| 
·       
  इंग्लंडचा
  माजी
  कर्णधार केव्हिन
  पीटरसन विश्वकरंडक
  क्रिकेट
  स्पर्धेदरम्यान
  “बीबीसी”साठी
  समालोचन
  करेल. “टेस्ट
  मॅच स्पेशल” नावाने
  ओळखल्या
  जाणाऱ्या
  कॉमेंट्री
  टीममध्ये
  त्याचा
  समावेश
  करण्यात आला
  आहे. तो उपांत्यपूर्व
  फेरीपासून
  समालोचन
  करेल. | 
| 
·       
  ३१  जानेवारी
  ते १४
  फेब्रुवारी
  ह्या
  कालावधीत
  केरळात होत
  असलेल्या
  राष्ट्रीय
  क्रीडा
  स्पर्धेचे
  उद्घाटन केंद्रीय
  मंत्री
  व्यंकय्या
  नायडू
  यांच्या हस्ते
  झाले. 
·       
  केरळमधील
  राष्ट्रीय
  क्रीडा
  स्पर्धेदरम्यान दुसऱ्याच
  दिवशी महाराष्ट्राच्या
  २१ वर्षीय
  मयुरेश पवार
  या नेट बॉल
  खेळाडूचा हृदयविकाराच्या
  झटक्याने दुर्दैवी
  मृत्यू झाला. | 
चालू घडामोडी - ४ फेब्रुवारी २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
 

 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा