चालू घडामोडी - २ फेब्रुवारी २०१५

·        २ फेब्रुवारी १९०७ : दिमित्री मेंडेलीव, मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचे संशोधक स्मृतिदिन.
·        इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेने अपहृत जपानी पत्रकार केनजी गोटो यांची हत्या केली असून, यासंबंधीचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला.
·        काही दिवसांपूर्वी इसीसच्या दहशतवाद्यांनी गोटो आणि जॉर्डनच्या वैमानिकाचे अपहरण केले होते. जगभरातील आणखी जपानी नागरिकांवर हल्ले करण्याची धमकी इसीसने दिली आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी इसीसच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
·        याआधी इसीसच्या दहशतवाद्यांनी हारूना युकावा या जपानी नागरिकाचा शिरच्छेद करून त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.
·        ६० वे फिल्मफेअर60th Filmfare Awards पुरस्कार -
·        सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहीद कपूर (हैदर )
·        सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना रानावत (क्वीन )
·        सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - के. के मेनन (हैदर )
·        सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - तब्बू (हैदर )
·        सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - शंकर एहसान लॉय (टू स्टेट्स )
·        सर्वोत्कृष्ट गीतकार - रश्मी सिंग - मुस्कुराने की वजह (सिटीलाइट )
·        सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अंकीत तिवारी (तेरी गलीया ) एक व्हिलन
·        सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- कनिका कपूर (बेबी डॉल ) रागिनी एमएमएस
·        सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- अहमद खान (जुम्मे की रात ) कीक
·        सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - अमीत त्रिवेदी (क्वीन )
·        सर्वाधिक नॉमिनेशन्स असलेला चित्रपट  - क्वीन (१३ नॉमिनेशन्स); हैदर (९ नॉमिनेशन्स)
·        सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट - क्वीन (६ पुरस्कार); हैदर (५ पुरस्कार)
·        ख्यातनाम गायक, अभिनेते, नाट्यदिग्दर्शक, संगीतकार आणि गीतकार शेखर सेन यांची संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
·        त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी राहिल.
·        तुलसी, कबीर, विवेकानंद, सूरदास या त्यांच्या संगीत एकपात्री नाट्यकृतींसाठी त्यांची प्रशंसा झाली आहे.
·        भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेतली.
·        चीनची राजधानी असलेल्या बीजिंग येथे रशिया, भारत व चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली.
·        भारताचे नवे परराष्ट्र सचिव एस जयशंकर हेदेखील या बैठकीस उपस्थित होते.
·        चीनचे परराष्ट्र मंत्री - वांग यी
·        विश्वकरंडकICC World Cup 2015 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या सामन्यादरम्यान बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन समालोचन करणार आहेत.
·        १५ फेब्रुवारीला होणाऱ्या या सामन्याचे समालोचन बच्चन कपिल देव आणि शोएब अख्तर यांच्यासोबत करताना दिसणार आहेत.
·        ‘शमिताभ’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अमिताभ पुन्हा माईक हातात घेणार आहेत.
·        कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडलेले व गुज्जर नेते अवतारसिंग भदना यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
·        मोबाईल संवादाला नवे परिमाण देणाऱ्या व्हॉट्‌सऍप या मेसेंजर सर्व्हिसने आता युजर्सना व्हॉइस कॉलिंगचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
·        मेरठ (उत्तर प्रदेश) येथील बालसुधारगृहाची खिडकी तोडून ९१ बाल कैदी पळून गेल्याची घटना रविवारी रात्री घडली.
·        यापैकी २६ जणांना विविध भागातून पकडण्यात आले आहे.
·        अद्याप ६५ फरारी असलेल्या बाल कैद्यांचा शोध सुरू आहे.
·        छत्तीसगडमधील कंकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस हुतात्मा तर १२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा