| · २४ फेब्रुवारी २०१५ : राष्ट्रीय उत्पादन शुल्क दिन | 
| 
·     
  ‘इस्लामिक
  स्टेट ऑफ
  सीरिया ऍण्ड
  इराक’ (इसिस) या
  दहशतवादी
  संघटनेने
  वायव्य
  सीरियातील
  एका
  गावामधून ९०
  ख्रिश्चन
  नागरिकांचे
  अपहरण केल्याची
  घटना घडली. | 
| 
·     
  वेस्ट
  इंडीजचा
  स्फोटक
  सलामीवीर ख्रिस गेल याने विश्वकरंडक
  क्रिकेट
  स्पर्धेच्या
  इतिहासात
  द्विशतक
  झळकाविण्याचा
  विश्वविक्रम
  केला
  आहे. तसेच
  त्याने मार्लन
  सॅम्युएल्सच्या
  साथीने ३७१ धावांची
  भागिदारी
  करत
  एकदिवसीय
  क्रिकेटमधील
  सर्वोच्च
  भागीदारीचाही
  विश्वविक्रम
  केला. 
·     
  गेलने
  आपल्या
  एकदिवसीय
  कारकिर्दीतील
  पहिले
  द्विशतक झळकाविले.
  तो शेवटच्या
  चेंडूवर २१५ धावांवर
  बाद झाला.
  त्याने १४७ चेंडूत १० चौकार आणि १६ षटकारांसह २१५ धावा
  केल्या. 
·     
  त्याने
  एकदिवसीय
  क्रिकेटमधील
  सर्वाधिक १६ षटकारांच्या
  रोहित
  शर्माच्या विक्रमाचीही
  बरोबरी केली.
  गेलची ही
  एकदिवसीय
  क्रिकेटमधील
  तिसऱ्या
  क्रमांकाची
  सर्वोच्च
  खेळी ठरली.  
·     
  भारताच्या
  रोहित
  शर्माने
  श्रीलंकेविरुद्ध
  २६४ धावांची
  खेळी करत
  विश्वविक्रम
  केला होता. त्यापाठोपाठ
  दुसऱ्या
  स्थानावर
  भारताचाच
  वीरेंद्र
  सेहवाग आहे.
  त्याने
  वेस्ट
  इंडीजविरुद्ध
  २१९ धावा
  केल्या
  होत्या.  
·     
  एकदिवसीय
  क्रिकेटमध्ये
  आतापर्यंत
  फक्त चार
  खेळाडूंनी
  द्विशतके झळकाविलेली
  आहेत.
  सचिन
  तेंडूलकर,
  वीरेंद्र
  सेहवाग,
  रोहित शर्मा
  (२) आणि ख्रिस
  गेल. | 
| 
·     
  पर्यावरणाच्या
  बेसुमार
  ऱ्हासाला
  पायबंद घालत, कोकणाचे
  सौंदर्य आणि
  पर्यावरण
  संरक्षणाची दिशा
  ठरवणाऱ्या डॉ. माधव
  गाडगीळ आणि
  डॉ.
  कस्तुरीरंगन
  समितीचे अहवाल
  केराच्या
  टोपलीत
  टाकण्याचे
  संकेत राज्य
  सरकारने दिले.
   
·     
  या दोन्ही
  समित्यांचे
  अहवाल
  कोकणच्या
  विकासाला
  मारक असल्याचे
  सांगत
  कोकणाच्या
  सर्वांगीण
  विकासासाठी नवीन समिती
  स्थापन
  करण्याची
  घोषणा पर्यावरणमंत्री
  रामदास कदम
  यांनी आज
  केली.  
·     
  महाराष्ट्र
  आर्थिक
  विकास
  परिषदेच्या
  माध्यमातून
  ही नवी समिती
  स्थापन
  करण्यात
  येईल. आगामी
  सहा
  महिन्यांत ही समिती
  राज्य
  सरकारला
  कोकणच्या
  विकासाबाबतच्या
  शिफारशी
  करणारा
  अहवाल सादर
  करेल, असे
  कदम यांनी
  सांगितले. 
·     
  गाडगीळ
  समितीच्या
  काही
  शिफारशी  
·     
  जवळपास
  संपूर्ण पश्चिम
  घाट विभागच
  इको
  सेन्सेटिव्ह
  झोन जाहीर करण्याची
  सूचना  
·     
  इको
  झोन
  ठरवण्याचा
  अधिकार
  ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत
  समिती, स्थानिक
  संस्थांना
  द्यावा  
·     
  संपूर्ण
  पश्चिम घाट
  क्षेत्रात
  तत्काळ बेकायदा
  खोदकाम व
  खाणकामास
  बंदी घातली.  
·     
  वन
  जमिनीवर वने
  सोडून इतर
  उपयोगासाठी
  पूर्ण बंदी  
·     
  कस्तुरीरंगन
  समितीच्या
  काही
  शिफारशी  
·     
  इको
  सेन्सेटिव्ह
  झोन
  स्थापण्याची
  शिफारस; पण त्याचे
  प्रमाण ३७
  टक्के इतर ६३
  टक्के
  खाणींसाठी
  उपलब्ध
  होणार  
·     
  इको
  झोन
  ठरवण्याचा
  अधिकार
  पर्यावरण व
  वन विभागाकडेच
   
·     
  पाच
  वर्षांत
  किंवा
  भाडेपट्टीचा
  कालावधी संपेपर्यंत
  खाणकामाला
  परवानगी
  दिली.  
·     
  काही
  उपाययोजना
  करून वन, जंगले, जमिनी व
  इतर आर्थिक
  उपयोगांसाठी
  परवानगी  
·     
  गाडगीळ
  समितीने
  सुचविलेला
  दोडामार्ग
  तालुका इको
  सेन्सेटिव्हमधून
  वगळला | 
| 
·      पर्यावरण
  सुरक्षेसाठी
  ५०
  मायक्रॉनपेक्षा
  कमी
  जाडीच्या
  प्लॅस्टिक पिशव्यांच्या
  वापरावर
  पर्यावरण
  विभागाने कठोर
  बंदी
  घातली आहे.
  यापूर्वी राज्यात ४०
  मायक्रॉनपेक्षा
  कमी
  जाडीच्या
  पिशव्या वापरण्यावर
  बंदी होती. 
·      या नियमाला
  बगल
  देणाऱ्या
  दुकानदार
  आणि उत्पादकांना
  १ ते ५
  लाख रुपये
  दंड आणि पाच
  वर्षांचा
  कारावास अशा
  शिक्षेची
  तरतूद
  करण्याचाही
  निर्णय कदम यांनी
  घेतला. | 
| 
·     
  म्हैसूरच्या
  प्रख्यात वडेयर
  राजघराण्याच्या
  उत्तराधिकारीपदी
  दिवंगत
  श्रीकंठदत्त
  नरसिंहराज
  वडेयर यांच्या
  बहिणीचे
  नातू यदुवीर
  गोपाल राय
  अर्स (वय २२)
  यांची आज
  अधिकृतपणे
  नियुक्ती करण्यात
  आली आहे.  
·     
  श्रीकंठदत्त
  वडेयर
  यांच्या
  पत्नी
  प्रमोदादेवी
  यांनी
  यदुवीर
  यांना
  दुपारी १:२०
  वाजता मिथुन
  शुभ लग्न
  मुहूर्तावर
  दत्तक घेतले. | 
| 
·     
  कुख्यात
  चंदन तस्कर वीरप्पनला
  पकडण्याच्या
  मोहिमेवेळी
  जलद कृती
  दलाचे
  प्रमुख शंकर
  बिदरी
  यांच्यासह
  अनेकांनी
  स्थानिक
  महिलांवर
  बलात्कार
  केल्याचे उघड
  झाले
  आहे.  
·     
  याविषयी
  सहा पीडित
  महिलांनी
  सविस्तर
  माहिती दिली
  आहे.
  वीरप्पनला
  पकडण्याच्या
  बहाण्याने
  काही
  महिलांवर
  बलात्कार
  झाले. शंकर
  बिदरी यांनी
  बलात्कार
  करून क्रूरपणाची
  वर्तणूक
  केली.  
·     
  बंगळूर येथील
  पीपल्स
  पॉवरनगरमध्ये
  आयोजित
  पत्रकार
  परिषदेत
  पीडित
  महिलांनी
  त्यांच्या
  छळाची माहिती
  पत्रकारांना
  दिली. | 
| 
·     
  ‘इस्लामिक
  स्टेट ऑफ
  सीरिया ऍण्ड
  इराक’ (इसिस) या
  दहशतवाद्यांनी
  अनेकांची
  क्रूर हत्या
  केली असून, त्यांचे मृतदेह हवे
  असल्यास १० ते २० हजार
  डॉलर द्यावे
  लागतील, अशी मागणी ‘इसिस’ने
  केली आहे. | 
| 
·     
  पाकिस्तानला
  धूळ
  चारल्यानंतर
  लढवय्या भारतीय
  संघाने दक्षिण
  आफ्रिकेसारख्या
  बलाढ्य
  संघालाही सहज
  नमवत दणदणीत
  विजय साजरा केला. 
·     
  शिखर
  धवनने
  झळकाविलेले
  शतक आणि
  त्यानंतर
  गोलंदाजांच्या
  अचूक
  कामगिरीच्या
  जोरावर
  भारताने
  दक्षिण
  आफ्रिकेला १३० धावांनी
  पराभूत केले. 
·     
  या
  विजयासह भारताने
  विश्वकरंडकात
  प्रथमच
  आफ्रिकेस
  हरविले. | 
| 
·     
  केंद्र
  सरकारने
  काढलेल्या भूसंपादन
  अध्यादेशाच्या
  निषेधार्थ
  ज्येष्ठ
  समाजसेवक
  अण्णा हजारे
  यांच्यासह
  देशभरातील
  विविध
  शेतकरी व
  सामाजिक
  संघटनांनी
  जंतरमंतरसमोर
  लाक्षणिक
  धरणे
  आंदोलनाला
  सुरवात केली आहे.  
·     
  सामाजिक
  कार्यकर्त्या
  मेधा
  पाटकर याही
  या आंदोलनात
  सहभागी झाल्या
  आहेत. | 
चालू घडामोडी - २३ व २४ फेब्रुवारी २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
 

 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा