| 
·       
  १६
  फेब्रुवारी १९४४-
  दादासाहेब
  फ़ाळके
  स्मृतिदिन | 
  | 
·       
  भारतीय
  संघाने पाकिस्तान
  संघाला विश्वकरंडक
  स्पर्धेत
  सलग
  सहाव्यांदा
  पराभूत करत इतिहासाची
  पुनरावृत्ती केली. 
·       
  विराट
  कोहलीचे शतक, शिखर धवन, सुरेश
  रैनाची
  उपयुक्त
  खेळी यामुळे
  अखेरच्या
  टप्प्यात
  झटपट विकेट
  गमावूनही
  भारताने ५० षटकांत
  ७ बाद ३००
  धावांचा
  टप्पा
  गाठलाच.  
·       
  त्यानंतर
  महंमद शमीने
  सार्थ
  ठरविलेला
  विश्वास
  आणि फिरकी
  गोलंदाजांची
  मिळालेली
  साथ यामुळे
  भारताने
  पाकिस्तानला
  २२४ धावांत
  गुंडाळले. 
·       
  भारताने
  यापूर्वी १९९२ (४३ धावा), १९९६ (३९ धावा), १९९९ (४७ धावा), २००३ (सहा गडी
  राखून), २०११ (२९ धावा) अशा
  पाच वेळा
  पाकिस्तानला
  धूळ चारली आहे.   | 
  | 
·       
  जानेवारीमध्ये
  घाऊक
  महागाई
  निर्देशांकात
  (डब्ल्यूपीआय)
  लक्षणीय घट झाली आहे.  
·       
  घाऊक
  किंमत
  निर्देशांक
  अपेक्षेपेक्षा
  जास्त चांगला
  आला असून, घाऊक
  महागाई
  निर्देशांक
  जानेवारीमध्ये
  ०.३९ टक्क्यांवर
  पोहोचला आहे. | 
  | 
·       
  इस्लामिक
  स्टेट (इसिस) या
  दहशतवादी
  संघटनेची
  हिंसक
  कृत्ये
  सुरूच असून, काल ‘इसिस’ने
  आपल्या
  ताब्यात
  असलेल्या इजिप्तमधील
  २१ ख्रिस्ती
  नागरिकांचा
  शिरच्छेद
  केल्याचा व्हिडिओ
  प्रसिद्ध करण्यात
  आला आहे.  
·       
  ‘इसिस’च्या
  या कृत्याची
  दखल घेत इजिप्तचे
  अध्यक्ष
  अब्देल फतेह
  अल सिसी यांनी
  सुरक्षाप्रमुखांची
  बैठक
  बोलावली आहे.
  इराक आणि
  सीरियामध्ये
  हिंसक
  कारवाया करत
  असलेल्या ‘इसिस’ने
  लीबियामध्ये
  हे कृत्य
  केल्याचे
  समोर आले आहे. 
·       
  ‘इसिस’च्या
  कृत्यानंतर
  लीबियामधील ‘इसिस’च्या
  तळांवर
  इजिप्तने
  प्रखर हवाई
  हल्ले सुरू
  केले आहेत. गेल्या
  अनेक
  महिन्यांपासून
  दहशतवादी
  हिंसाचाराच्या
  गर्तेत
  सापडलेल्या
  लीबियावर इजिप्तने
  प्रथमच हवाई
  हल्ले केले
  आहेत. | 
  | 
·       
  भ्रष्टाचाराच्या
  आरोपांतर्गत
  मोहम्मद रेझा
  रहिमी या
  इराणच्या
  माजी उप
  राष्ट्राध्यक्षांना
  पाच
  वर्षांच्या
  कारावासाची
  शिक्षा सुनाविण्यात
  आली आहे.  
·       
  इराणचे
  माजी
  राष्ट्राध्यक्ष
  महमूद
  अहमदिनेजाद
  यांचे उजवे
  हात मानले
  जाणारे
  रहिमी हे
  दोषी
  असल्याचा
  निकाल इराणच्या
  सर्वोच्च
  न्यायालयाने
  गेल्या महिन्यामध्ये
  दिला होता.  
·       
  यानुसार
  रहिमी यांची
  रवानगी इराणच्या
  प्रसिद्ध
  एव्हिन
  तुरुंगामध्ये
  करण्यात
  आली. | 
  | 
·       
  आयपीएलसाठी
  लिलावात विश्वकरंडकासाठी
  भारतीय
  संघात स्थान
  न मिळालेल्या
  अष्टपैलू
  खेळाडू युवराजसिंगला
  दिल्ली
  डेअरडेव्हिल्स
  तब्बल १६ कोटी रुपये
  देऊन खरेदी केले आहे. | 
  | 
·       
  पाकिस्तानबरोबर
  असलेल्या
  आपल्या ‘सार्वकालीन
  मैत्री’चे
  प्रतीक
  म्हणून चीनने इस्लामाबाद
  येथे नवा
  दूतावास
  सुरू केला असून, त्यांचा
  हा सर्वांत
  मोठा
  दूतावास आहे. | 
  | 
·       
  लंडनमधील
  कट्टर
  इस्लामवादी
  संघटना असलेल्या
  हिज्ब अत
  ताहरीर ही ‘इसिस’पेक्षाही
  भयानक रूप
  घेऊ शकते, असे
  अमेरिकेतील
  सीटीएक्स
  या संस्थेने
  नुकत्याच
  प्रकाशित
  करण्यात आलेल्या
  अहवालात
  म्हटले आहे.  
·       
  या
  संघटनेचा
  प्रसार दक्षिण
  आशियातही
  झाला
  असल्याने
  भारतासाठी हा
  धोक्याचा
  इशारा आहे. | 
  | 
·       
  पंतप्रधान
  नरेंद्र
  मोदी यांनी
  भारत आणि पाकिस्तानमधील
  संबंध
  सुधारण्याच्या
  दृष्टीने
  पाऊल
  उचलल्यानंतर
  पाकिस्ताननेही
  १७२ भारतीय
  मच्छीमारांची
  तुरुंगातून
  सुटका करत या
  प्रयत्नांना
  पाठिंबा
  दिला आहे.  
·       
  सागरी
  सीमेचे
  उल्लंघन
  केल्याप्रकरणी
  अटक झालेले
  हे सर्व
  मच्छीमार पाकिस्तानमधील
  मालिर आणि
  लांधी या
  जिल्ह्यांमधील
  तुरुंगांत
  होते. यातील
  अनेक जणांनी
  त्यांची
  शिक्षा
  पूर्ण केली
  होती. | 
  | 
·       
  ‘मन पाखरु पाखरु’, ‘प्रिती
  परी तुजवरती’, ‘तरुण
  तुर्क
  म्हातारे
  अर्क’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘पळा
  पळा कोण पुढे
  पळे’ या
  नाटकांमध्ये
  अभिनय
  केलेल्या आत्माराम
  भेंडे यांचे निधन झाले. 
·       
  आत्माराम
  भेंडे यांना २००६-०७ साली महाराष्ट्र
  शासनाच्या
  वतीने राज्य
  सांस्कृतिक
  पुरस्काराने
  सन्मानित करण्यात
  आले. 
·       
  आत्माराम
  भेंडे हे ६१साव्या(नाशिक-१९८१) अखिल
  भारतीय
  नाट्यसंमेलनाचे
  अध्यक्ष होते. | 
  | 
·       
  भारताचे
  माजी दिवंगत
  पंतप्रधान
  राजीव गांधी
  यांचा
  हत्यारा व
  तमिळ टायगर
  रिबेलचा
  नेता कुमारन
  पथमंथम यास
  परदेशात
  जाण्यास
  श्रीलंकन
  न्यायालयाने
  बंदी घातली आहे.  | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा