· खगोल
शास्त्रज्ञांच्या
आंतरराष्ट्रीय
पथकास अमेरिकेच्या
केपलर या
दुर्बिणीमधून
अवकाशाचा
वेध घेत
असताना विश्वामधील
सर्वांत
जुनी
सूर्यमाला
शोधण्यात यश आले आहे. या
सूर्यमालेमध्ये
पाच
ग्रह आढळले
असून, ही
सूर्यमाला विश्वाच्या
जन्मानंतर
काहीच
कालावधीत
निर्माण झाल्याचे
संशोधकांनी
सांगितले.
·
या
सूर्यमालेत मुख्य तारा
केपलर ४४४ हा आहे.
केपलर हा
सूर्यासारखाच
तारा असून, तो
सुमारे ११.२ अब्ज
वर्षांपूर्वी
निर्माण
झाला आहे.
पृथ्वी
असलेल्या आपल्या
सूर्यमालिकेचे
वय केवळ ४.५
अब्ज वर्षे आहे.
·
संशोधकांच्या
या
आंतरराष्ट्रीय
पथकाचे नेतृत्व
बर्मिंगहॅम
विद्यापीठाने
केले होते.
या
पथकामध्ये डेन्मार्क, अमेरिका,
ऑस्ट्रेलिया,
पोर्तुगाल, जर्मनी
व इटलीच्या
संशोधकांचा
समावेश होता.
·
केपलर
४४४ हा तारा
सूर्यापेक्षा
सुमारे २५
टक्क्यांनी
लहान आहे.
ही
सूर्यमाला
असून, ११७
प्रकाशवर्षे
दूर
आहे. या
सूर्यमालिकेमधील
पाचही
ग्रहांचे
क्षेत्रफळ
पृथ्वीपेक्षा
कमी आहे.
·
या
सूर्यमालेतील
सर्व
ग्रह दहा
दिवसांपेक्षाही
कमी दिवसांत केपलर
४४४
ताऱ्याभोवतीची
प्रदक्षिणा
पूर्ण करतात.
· या नव्या
संशोधनामुळे
प्राचीन
ग्रहांच्या
निर्मितीसंदर्भातील
बहुमोल
माहिती हाती
लागण्याची
शक्यता आहे.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा