·
१०
फेब्रुवारी १८०३
: मुंबईचा
पाया
घालणारे
जगन्नाथ शेठ
जन्मदिन
|
·
इसिस
या दहशतवादी
संघटनेवर
जॉर्डनने
गेल्या तीन दिवसांत
तब्बल ५६
हवाई हल्ले
केल्याची
माहिती जॉर्डनचे
हवाई
दलप्रमुख
जनरल मन्सूर
अल-ज्बौर
यांनी दिली
आहे.
·
इसिसने
जॉर्डनच्या
वैमानिकास
अत्यंत क्रूरपणे
जाळून ठार
मारल्याचे
चित्रीकरण
प्रसिद्ध झाल्यानंतर
संतप्त
जॉर्डनने
सीरियातील
इसिसचा
वरचष्मा
असलेल्या
राक्का
शहरावर जोरदार
बॉंबफेक
सुरू केली
आहे.
·
“आखलेल्या
योजनेनुसार
आम्ही हल्ले
करत आहोत. आम्ही
इसिसच्या
दहशतवाद्यांची
आश्रयस्थाने,
शस्त्रगारे
व गोदामे उद्ध्वस्त
केली आहेत.
इसिस समूळ
नष्ट
करण्याप्रती
आम्ही
कटिबद्ध
आहोत”, असे
जनरल ज्बौर
यांनी
सांगितले.
|
·
इंटरनेट
क्षेत्रात
व्हिडिओसाठी
प्रसिद्ध असलेल्या
यू-ट्यूब
या
संकेतस्थळावर
पाकिस्तानमध्ये
गेल्या दोन
वर्षांपासून
बंदी आहे.
पाकिस्तान
सरकारने ही
बंदी अनिश्चित
काळासाठी
वाढविली आहे.
·
‘यू-ट्यूब’वरील
‘इनोसेंस ऑफ
मुस्लिम’ या
व्हिडिओमुळे
सप्टेंबर २०१२ मध्ये
यू-ट्यूबवर
बंदी
घालण्याचे
पाकिस्तान
उच्च
न्यायालयाने
आदेश दिले
होते.
|
·
भारताची
विकास
दराबाबतच्या
आकडेमोडीची
पद्धत
बदलण्यात
आली
असून, हा दर यंदा ७.४
टक्के राहण्याचा
अंदाज आहे.
त्यामुळे
भारत चीनलाही
मागे
टाकण्याची
शक्यता आहे.
भारत जगात
सर्वाधिक
वेगाने
विकास साधणारा
देश बनेल.
·
२०१०-११ या
वर्षी
भारताचा
विकास दर ८.७ टक्के
होता.
त्यानंतर
आता बऱ्याच
काळानंतर विकास
दर वाढताना
दिसेल, असा
केंद्रीय
सांख्यिकी
कार्यालयाचा
अंदाज आहे.
·
विकास
दराच्या
आकडेमोडीसाठी
२००४-०५ हे
आधार वर्ष
बदलून ते २०११-१२ असे
करण्यात आले
आहे.
|
·
समलैंगिक
संबंध
प्रकरणासंदर्भात
अन्वर
इब्राहिम (वय ६७) हे
मलेशियामधील
प्रभावशाली
विरोधी
पक्षनेते
दोषी असल्याचा
निर्णय
देशाच्या
सर्वोच्च
न्यायालयाने
सुनाविला.
·
मुस्लिम
बहुसंख्याक
देश
असलेल्या
मलेशियामध्ये
समलैंगिक
सबंध हे
बेकायदेशीर
आहेत; मात्र
या प्रकरणी
शिक्षा
होण्याचे
प्रमाण फार
कमी आहे.
|
·
दिल्ली
विधानसभा
निवडणुकीतील
पराभवाची
जबाबदारी
स्वीकारत काँग्रेसचे
सरचिटणीस
अजय माकन
यांनी आपल्या
पदाचा राजीनामा
दिला.
|
·
मॅसॅच्युसेट्स
इन्स्टिटय़ूट
ऑफ
टेक्नॉलॉजी (एमआयटी)
या
संस्थेच्या
वैज्ञानिकांनी
मधुमेहावर
गुणकारी
ठरणारा इन्सुलिनचा
नवा प्रकार (स्मार्ट
इन्शुलिन)
तयार केला आहे.
·
हे
नव्या
प्रकारचे
इन्सुलिन
रक्तात १०
तास फिरत
राहते व
जेव्हा
रक्तातील
साखर जास्त
होईल
तेव्हाच
क्रियाशील
होते त्यामुळे
मधुमेहाच्या
रुग्णाला
अचानक काही
होण्याची
शक्यता खूपच
कमी होते.
·
त्यामुळे
रुग्णांना
वारंवार
रक्तातील
साखर
तपासण्याची
गरज भासणार
नाही व रोज इन्सुलिनची
इंजेक्शन्स
घ्यावी
लागणार नाहीत.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा